नाकात वाढलेले मास म्हणजे काय?
नाकात वाढलेले मास म्हणजेच नॅझल पॉलिप्स हे मऊ, वेदना नसलेली, पिशवी सारखी कर्करोग नसणारी नाकाच्या आत किंवा साइनस मध्ये होणारी वाढ आहे. ते सहसा हानिकारक नसते पण, जर त्याचा उपचार केला नाही तर ते तुमचे नाक बंद पाडू शकतात ज्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो. ही परिस्थिती सुमारे 4% लोकसंख्येला प्रभावित करते. पॉलिप्स होण्याची शक्यता 1,000 व्यक्तींपैकी एक ते 20 लोकांमध्ये आहे आणि वयाच्या 60 वर्षानंतर ती आणखी कमी होते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
नाकात वाढलेले मास ची चिन्हे पुढील प्रमाणे आहेत:
- बंद झालेली किंवा भरलेली नाक (अधिक वाचा:बंद नाकेचे उपचार).
- वाहते नाक.
- शिंका.
- वास न येणे.
- चव जाणे.
- जर तुम्हारला सायनस संसर्ग असेल तर तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते.
- सायनस झालेल्या क्षेत्रात किंवा वरच्या दातात वेदना आणि दाबासह संवेदना.
- नाकातून रक्त येणे.
- घोरणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
या स्थितीचे अचूक कारण अज्ञात आहे पण अशी व्यक्ती ज्यांना पुढील स्थिती आहेत, त्यांना नॅझल पॉलिप्स होण्याचा जास्त धोका असतो :
- सिस्टिक फाईब्रोसिस.
- दमा.
- हे फिव्हर.
- ॲलर्जी.
- दीर्घकालीन असणारा सायनस संसर्ग.
- ॲस्पिरिन संवेदनशीलता.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
नॅझल पॉलिप्स च्या उपचारामध्ये समावेश आहे:
- तुमच्या अनुनासिक मार्गाची तपासणी. नाकांच्या पोकळीत बाह्यवृद्धी म्हणून पॉलीप्स दिसतात.
- सायनस चे सिटी (CT) स्कॅन नाकाच्या मार्गाच्या प्रतिमा देतात. पॉलिप्स हे काळ्या डागा सारखे दिसतात. जुने पॉलिप्स कधीकधी सायनसच्या आतील हाड तोडू शकतात.
औषधे लक्षणे दूर करतात परंतु परिस्थिती ठीक करीत नाहीत. नॅझल पॉलिप्सच्या उपचारासाठी सामान्यतः पुढील औषधे लिहून दिली जातात:
- नॅझल स्टेरॉईड्स आणि कॉर्टिकोस्टेरॉइडच्या गोळ्या किंवा द्रवपदार्थ जे पॉलीप्स कमी करतात आणि नाक साफ करतात.
- ॲलर्जीसाठी औषधं.
- संसर्गा साठी अँटीबायोटिक्स.
अशी परिस्थिती ज्यात औषधं प्रभावी ठरत नाहीत किंवा पॉलिप्स जेव्हा मोठा असतो, तेव्हा आराम मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते. नॅझल पॉलिप्स चा उपचार करण्यासाठी सामान्यतः एंडोस्कोपिक सायनस सर्जरी केली जाते.