नार्कोलेप्सी काय आहे?

नार्कोलेप्सी एक रोग आहे ज्यात झोपण्याच्या आणि जागेहोण्याच्या चक्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या तुमच्या मेंदूच्या क्षमतेवर प्रभाव पडतो. व्यक्तीला जागे झाल्यानंतर असे वाटते की त्यांचा आराम झाला आहे पण नंतर त्यांना दिवसभर झोप येत असल्याचे वाटते. हा विकार 2,000 लोकांपैकी एकाला प्रभावित करतो आणि महिला व पुरुष दोघांना सारख्या प्रमाणात प्रभावित करण्यासाठी ओळखला जातो. हा दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण करतो आणि वाहन चालविणे, खाणे, बोलणे इ. कामे करत असताना त्या व्यक्ती ला झोप आल्यासारखे वाटू लागते.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?

नार्कोलेप्सी ही आजीवन राहणारी परिस्थिती आहे आणि ती वाढत्या वयासोबत वाढत नाही. त्याच्या लक्षणांमध्ये वेळेसोबत सुधार होत जातो. सामान्यपणे पाहिली जाणारी लक्षणे आहेत:

  • दिवसा खूप वेळ झोपणे.
  • स्नायूंवरती अचानकपणे ताबा न राहणे (कॅटाप्लेक्सी).
  • भ्रम.
  • झोपे दरम्यान हलण्याची किंवा बोलण्याची क्षमता तात्पुरती गमावणे (झोपेत होणारा पक्षाघात).

इतर कमी सामान्य लक्षणे जी पहिली जातात:

याची मुख्य कारणं काय आहेत ?

जरी नार्कोलेप्सीचे अचूक कारण अज्ञात असले तरी असा विचार आहे की नार्कोलेप्सीच्या घटनेसाठी अनेक घटक जबाबदार आहेत. कॅटॅप्लेक्झीसोबत नार्कोलेप्सी असलेल्या जवळपास सर्व व्यक्तींमध्ये शरीरात हायपोक्रेटिन नावाच्या रसायनाची पातळी कमी असते जे जागृतपणाला प्रेरणा देतो. कॅटॅप्लेक्झीशिवाय नार्कोलेप्सी असलेल्या व्यक्तींमध्ये हायपोक्रेटिनची पातळी सामान्य असते.

हायपोक्रेटिनच्या कमी पातळी शिवाय इतर कारणं ज्यामुळे नार्कोलेप्सी होऊ शकते ते आहेत :

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

क्लिनिकल चाचणीनंतर आणि व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास घेतल्यानंतर, डॉक्टर निदानाची पुष्टी करण्यासाठी दोन विशिष्ट निदान उपायांची शिफारस करतील:

  • पॉलीसोम्नोग्रामः हे रात्रीतील श्वासोच्छवासाचे, डोळ्याच्या हालचाली आणि मेंदू आणि स्नायूंच्या क्रियांचा आढावा देतात.
  • मल्टीपल स्लिप लॅटेन्सी टेस्ट: ही चाचणी व्यक्ती दिवसभर काम करत असताना मध्येच किती वेळा झोपला हे माहिती करून घेतं.

जरी नार्कोलेप्सीसाठी कोणताही उपचार नसला तरी, जीवनशैलीत बदल करणे आणि औषधं यांमुळे लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते आणि परिस्थिती व्यवस्थापित केली जाऊ शकते. औषधं जी डॉक्टरांद्वारे लिहून दिली जातात ती आहेत अँटीडीप्रेसंट, एम्फेटामाईन-सारखे उत्तेजक इ.

खालील जीवनशैलीतील बदल नार्कोलेप्सीसोबत लढा देण्यात मदत करू शकतात :

  • नियमित व्यायाम करा.
  • अल्प झोप घेणे.
  • झोपेआधी मद्य आणि कॅफिन घेणे टाळा.
  • धुम्रपान टाळा.
  • झोपेसाठी जाण्याआधी आराम करा.
  • झोपण्याआधी जड जेवण घेणे टाळा.

Medicines listed below are available for नार्कोलेप्सी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Waklert 50 Mg Tablet10 Tablet in 1 Strip164.35
Modafil 100 Tablet MD10 Tablet in 1 Strip139.65
Wellmod Tablet10 Tablet in 1 Strip85.0
Modafil 200 Tablet10 Tablet in 1 Strip132.5
Modfil Tablet10 Tablet in 1 Strip75.0
Modalert 100 Tablet10 Tablet in 1 Strip155.0
WAKACTIVE 200MG TABLET125.3
Modalert 200 Tablet10 Tablet in 1 Strip245.0
Modafil 100 Tablet10 Tablet in 1 Strip106.25
Armod 50 Tablet10 Tablet in 1 Strip133.8
Read more...
Read on app