नखाला बुरशी येणे काय आहे?
नखाला येणारी बुरशी हा सर्वात सामान्यपणे दिसणारा हाताच्या नखांचा किंवा पायाच्या नखांचा फंगल संसर्ग आहे. हा नखांच्या काठापासून सुरु होतो आणि मध्यापर्यंत पसरतो ज्यामुळे नखांवर डाग निर्माण होतात किंवा त्याचा रंग बदलतो. जरी नखांचा फंगल संसर्ग हा गंभीर नसला तरी तो बरा होण्यासाठी जास्त वेळ घेतो.
त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
नखांच्या फंगल संसर्गाने पुढील लक्षणे उद्भवू शकतात:
- नखांच्या सभोवती वेदना.
- नखांच्या सभोवतालच्या क्षेत्रावर सूज.
- नखाच्या आकारात बदल.
- नखं जाड होणे.
- नखांवर डाग निर्माण होणे किंवा त्याचा रंग बदलणे.
- नखं ठिसूळ होणे.
- नखांच्या खाली मळ जमा होणे.
- तुटलेली नखं.
- चमक आणि चकाकी गमावणे.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
पायाच्या नखाला होणाऱ्या संसर्गाच्या घटना या हातांच्या नखांना होणाऱ्या संसर्गापेक्षा जास्त सामान्य आहेत. खालील स्थिती नखाच्या संसर्गाची जोखीम वाढवतात:
- किरकोळ नखाची किंवा त्वचेची जखम.
- कमकुवत प्रतिकार शक्ती.
- नखांमध्ये विकृती.
- नखांचा विकार.
- बंद पादत्राणे (फूटवेअर) जे वायूच्या प्रवाहाला नखांपर्यंत पोहोचवण्यापासून थांबवतात.
- त्वचा लांब काळापर्यंत ओली राहणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
डॉक्टर नखाच्या फंगल संसर्गाचे निदान पुढील तपासण्या करून करतात:
- नखांची शारीरिक तपासणी.
- नखं खरवडली जातात आणि टिशुंचा अभ्यास सूक्ष्मदर्शकाखाली केला जातो. हे फंगल संसर्गाचा प्रकार ओळखण्यास मदत करते.
उपचार:
मेडिकल स्टोरमधे मिळणारे टॉपिकल क्रीम आणि मलम परिस्थिती व्यवस्थित करू शकत नाहीत. नखांच्या फंगसच्या उपचारांमध्ये खालील उपचार पद्धती प्रभावी आहेत:
- तोंडावाटे दिले जाणारे अँटीफंगल औषधं - उपचाराचा कालावधी पायांच्या नखांसाठी हातांच्या नखांपेक्षा जास्त असतो.
- फंगस मारण्यासाठी लेझर उपचारपद्धती उपयुक्त आहेत.
- संसर्गापासून मुक्तता मिळवण्यासाठी कधीकधी नखं काढुन टाकणे हा एकचं पर्याय शिल्लक राहतो.
नखांच्या फंगल संसर्गाचा उपचार बरा होण्यात वेळ घेतो म्हणून नखांच्या संसर्गाचा उपचार करण्यापेक्षा संसर्ग थांबवण्याचा सल्ला दिला जातो
संसर्ग थांबवण्यासाठी:
- आपली नखं आणि त्याच्या सभोवतालची त्वचा नेहमी स्वच्छ आणि कोरडी ठेवा.
- तुमच्या स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या फंगल संसर्गाच्या संपर्कात आल्यास तुमचे हात पुर्णपणे स्वच्छ धुवा.
- मॅनिक्युअर आणि पेडीक्युअर ची साधने शेयर करणे टाळा.
- तुमच्या नखांची आणि त्वचेची उत्कृष्ट काळजी घ्या.