स्नायूंचा अशक्तपणा काय आहे?
स्नायूंचा अशक्तपणा म्हणजे स्नायूंची सामान्य क्रिया करण्याची कमी झालेली क्षमता होय. ही विशिष्ट क्रिया करण्यासाठी स्नायूची कमी झालेली शक्ती आहे. स्नायूचा अशक्तपणा अस्थायी असू शकतो, उदाहरणार्थ, कठीण व्यायाम केल्यानंतर स्नायूंचा अशक्तपणा अनुभवला जातो जो आराम केल्यानंतर सामान्य स्थितीत येतो. तरी, स्पष्ट कारणांशिवाय स्नायूंचा सतत अशक्तपणा काही अंतर्निहित गंभीर स्थितीमुळे होऊ शकतो, तरीही स्नायुंचा अशक्तपणा थकव्या पासून वेगळा आहे.
त्याच्याशी संबंधित मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
स्नायूंचा अशक्तपणा खालील संबंधित लक्षणे दर्शवू शकतात:
- कुठलीही वस्तू धरतांना कमी झालेली स्नायूंची शक्ती.
- बधिरपणा किंवा संवेदना नष्ट होणे.
- अंगांना हलवणे, उभे राहाणे, चालणे किंवा सरळ बसणे यात अडचण येणे.
- चेहऱ्याचे स्नायू हलवण्यास किंवा बोलण्यास अक्षमता.
- श्वास घेण्यात अडचण.
- चेतनाची हानी.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
स्नायूंच्या अशक्तपणाची अनेक अंतर्निहित कारणे आहेत. ते खालील प्रमाणे आहेत:
- मस्क्यूलर डिस्ट्रॉफी.
- स्ट्रोक.
- इलेक्ट्रोलाइट असंतुलन.
- व्हिटॅमिन डी ची कमतरता.
- तंत्रिकेचे नुकसान.
- अपघात किंवा जखम.
- स्नायुंवर सूज येणे.
- पोलिओ.
- मायस्टेनिया ग्रॅव्हिस.
- ग्रेव्हस डिसीज.
- गुलीयन-बॅरे सिंड्रोम.
- मल्टीपल स्क्लेरोसिस.
- काही औषधे आणि मद्य.
- उदासीनता.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
थकव्याला स्नायूंच्या अशक्तपणापासून वेगळे करणे आवश्यक आहे. थकवा हा पुन्हा-पुन्हा प्रयत्न केल्यानंतर हालचाल करण्यात येणारे अपयश आहे. तर स्नायूंचा अशक्तपणा हे पहिल्याच प्रयत्नात हालचाल करण्यात येणारे अपयश आहे. तुमचे डॉक्टर निदान करण्यासाठी एक प्राथमिक पाऊल म्हणून संपूर्ण वैद्यकीय इतिहास घेतील, त्यानंतर संपूर्ण शारीरिक तपासणी करतील. सामान्य निदान चाचण्या पुढील प्रमाणे आहेत:
- मोटर ॲक्टिव्हिटी टेस्टिंग.
- फुफ्फुस आणि हृदयाच्या कार्याचे मूल्यांकन.
- व्हिटॅमिन, इलेक्ट्रोलाइट्स आणि हार्मोची पातळी तपासण्यासाठी रक्त तपासणी.
- तंत्रिका कार्यप्रणाली तपासण्यासाठी इलेक्ट्रोमायोग्राफी.
- एमआरआय आणि सीटी स्कॅन (MRI आणि CT स्कॅन).
- स्नायू बायोप्सी.
उपचार पद्धती खालील प्रमाणे आहेत:
- अंतर्निहित आजारांवर आधारित औषधे जसे व्हिटॅमिन सप्लीमेंट्स, वेदना-शामके, अँटी-इंफ्लॅमेटरी किंवा इम्यूनोसप्रेसस औषधे.
- स्नायू मजबूत करण्यासाठी आणि गतिशीलता सुधारण्यासाठी फिजियोथेरपी आणि इलेक्ट्रोथेरपी.
- दुर्घटना किंवा दुखापती झाल्यास शस्त्रक्रिया.
फिजियोथेरेपिस्टच्या देखरेखीखाली नियमित व्यायाम आणि आवश्यक खनिजे (मिनरल) आणि जीवनसत्वांनी समृध्द निरोगी आहार तुम्हाला तुमच्या स्नायूंची ताकद पुन्हा मिळविण्यात मदत करू शकतील. कृपया लक्षात घ्या की योग्य निदान आणि त्वरित उपचार आवश्यक आहे कारण याची लक्षणं गंभीर आरोग्य समस्या सूचित करतात म्हणून, लक्षणे कायम राहिल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.