गालगुंड काय आहे?
गालगुंड ज्याला मम्प्स असे देखील म्हणतात हा पसरणाऱ्या विषाणूपासून होणारा संसर्ग आहे जी लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो. आशा परिस्थितीत सलायवरी ग्रंथी ज्या चेहऱ्याच्या आत दोन्ही बाजूला कानाच्या खाली असतात तिला वेदनादायक सूज आल्यामुळे होते.
याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहे?
विषाणूच्या संसर्गाच्या 14 ते 25 दिवसानंतर मम्प्सची लक्षणे वाढतात. काही लक्षणे खाली दिलेली आहे :
- सुजलेला, नाजूक जबडा.
- डोकेदुखी.
- स्नायूंचे दुखणे.
- सांध्याचे दुखणे.
- जबड्यामध्ये सूज येणे.
- तोंड कोरडे पडणे.
- भूक कमी होणे.
- ताप.
- अशक्तपणा.
- वृषणांमध्ये दुखणे.
- गोंधळणे.
- चिडचिडेपणा.
याचे मुख्य कारणे काय आहे?
गालगुंड हा विषाणू मूळे होतो जो पॅरामिक्सओ विषाणू च्या जमतीतला आहे. हा विषाणू तोंडावाटे किंवा नाकावाटे हवेच्या कणांच्या मार्फत प्रवेश करतो. त्यामुळे हा हवेवाटे पसरतो. प्रभावित व्यक्तीला त्याचे तोंड आणि नाक शिंकताना आणि खोकताना इतर व्यक्तीला संसर्ग पसरू नये म्हणून झाकून ठेवणे आवश्यक आहे.
याचे निदान आणि उपचार काय आहे?
निदान
- गालगुंड साठी लस घेतली आहे की नाही हे लक्षात घेतले जाते.
- शारीरिक तपासणी मुख्यतः गळ्याची आणि कानाची तपासणी करणे.
- विषाणू आणि त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज आहे का यासाठी रक्ताची तपासणी करणे.
- तोंडाची/लाळेच्या बोळ्याची विषाणूसाठी तपासणी करणे.
- लघवीची चाचणी.
उपचार
हा रोग विषाणू मूळे होत असल्याने अँटिबायोटिक्स काम करत नाही. जोपर्यंत शरीराची इम्युनिटी विषाणूच्या विरुद्ध लढत नाही तोपर्यंत उपचारांमध्ये लक्षणांना आराम देण्यावर भर दिला जातो. आराम होण्यासाठी खालील गोष्टींचा समावेश केला जातो:
- इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून वेगळे राहणे.
- तापासाठी पॅरासिटामॉल घेणे.
- सुजेसाठी आयब्युप्रोफेन घेणे.
- सूज आली असेल तर थंड किंवा गरम पाण्याने शेकणे.
- चावायला लागणारे अन्न टाळावे; पातळ अन्न घ्यावे.
- जास्तीत जास्त द्रव पदार्थ घ्यावे.
प्रतिबंध
मिझल्स, मम्प्स, रुबेला (एमएमआर) लस द्यावी. सीडीसी च्या अनुषंगानुसार, सगळ्या मुलांना एमएमआर लसी चे दोन डोस अवश्य द्यावे; पहिला डोस 15 महिन्यांचे असतांना आणि दुसरा डोस 4-6 वर्षाचं असतांना द्यावा. जन्माच्या 28 दिवसानंतर हे दिले जाते कारण ज्या अँटीबॉडीज आईकडून बाळाकडे जातात त्या बाळाचे काही रोगापासून रक्षण करतात.