मॅन्टल सेल लिम्फोमा म्हणजे काय?
मॅन्टल सेल लिम्फोमा (एमसीएल) एक प्रकारचा नॉन-हॉजकिन लिम्फोमा आहे जो आक्रमक आणि दुर्मिळ आहे. एमसीएलमध्ये, लिम्फोमाचा मॅन्टल झोन किंवा लिम्फ नोडच्या कोरोनामधून आरंभ होतो. मॅन्टल सेल लिम्फोमा हे सामान्यतः पाचन तंत्र आणि हाडांच्या मज्जामध्ये समाविष्ट होतात.
त्याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
एमसीएलचे लक्षणं हे इतर लिम्फोमाच्या लक्षणांसारखेच आहेत. एमसीएलच्या सुरुवातीच्या लक्षणांना सहजपणे दुर्लक्षित केले जाऊ शकते किंवा सामान्य आरोग्य समस्या म्हणून घेतले जाऊ शकते. एमसीएलच्या काही प्रारंभिक लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- मान किंवा ग्रोइन किंवा काखेच्या लिम्फ नोड्समध्ये सूज.
- थकवा.
- अस्थिर किंवा अधूनमधून येणारा ताप.
- रात्र घाम येणे.
- अचानक आणि अस्पष्ट रितीने वजन कमी होणे.
एमसीएलच्या काही प्रगत अवस्थेतील लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- हाडांच्या वेदना.
- श्वास घेण्यात समस्या.
- दीर्घकाळ अशक्तपणा आणि थकवा.
- वरती उल्लेख केलेल्या लक्षणामध्ये वृद्धी.
त्याचे मुख्य कारण काय आहेत?
एमसीएल होण्याचे अनेक कारणे आहेत आणि एमसीएल होण्याचे अद्यापही अचूक कारण माहीत नाही आहे. एमसीएल असलेल्या 90% पेक्षा अधिक रुग्णांमध्ये प्रोटीन सायक्लीन डी 1 चे अधिक उत्पादन होत असल्याचे आढळून आले आहे. लॅक्टेट डिहायड्रोजेनेज आणि बीटा 2 मायक्रोग्लोबुलिनसारखे प्रोटीन देखील जास्त प्रमाणात आढळतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
रुग्णाच्या लक्षणांमध्ये संभाव्य लिम्फ ट्यूमर किंवा कर्करोगा चे संकेत आल्यास तर, डॉक्टर किंवा पॅथॉलॉजिस्ट कर्करोगाच्या वाढीतील पेशीचा प्रकार निश्चित करण्यासाठी आणि परीक्षण करण्यासाठी बायोप्सी सूचित करतील.
लिम्फोमा पेशींच्या तपासणीनंतर पुढील चाचण्या केल्या जातात ज्यामध्ये छातीचा एक्स-रे, रक्त तपासणी, इमेजिंग स्कॅन जसे कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) किंवा मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय) ज्यात वाढ आणि प्रभावित क्षेत्र ओळखून निश्चित केले जाते.
कर्करोगाच्या स्थितीवर आधारित एमसीएलचा उपचार केला जातो.
सुरुवातीच्या अवस्थेत सर्वात सामान्य उपचार म्हणजे औषधे /फार्माकोलॉजिक आहेत; परंतु, नंतरच्या अवस्थेत केमोथेरपी आणि रेडिएशन थेरेपी सुरू केली गेली. रिट्क्सिमॅबसारख्या औषधे कर्करोगाच्या बी-पेशींना लक्ष्य करते जे प्रगत अवस्थेमध्ये देखील उपयोगी असल्याचे आढळले आहे. विशिष्ट प्रकरणच्या गंभीर स्थितीमध्ये प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, डॉक्टर अस्थिमज्जा बाहेर टाकतात किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट करतात जे नवीन आणि निरोगी प्रतिकारक पेशी तयार करण्यास मदत करते.