मॅक्युलर डिजनरेशन काय आहे ?
डोळ्यांचा मॅक्युला तीक्ष्ण आणि केंद्रित नजरेसाठी आवश्यक असतो आणि रेटिनाच्या केंद्राजवळ एक लहान ठिपक्यासारखा दिसतो. मॅक्युला आपल्या डोळ्याच्या समोर येणाऱ्या कुठल्याही वस्तूला शोधण्यासाठी मदत करतो. मॅक्युलर डिजनरेशन याच मॅक्युलाचे नुकसान झाल्यामुळे उद्भवणारी सामान्य स्थिती आहे. या रोगामुळे काही लोकं आपली दृष्टीदेखील गमावू शकतात .मॅक्युलर डिजनरेशनचे दोन प्रकार आहेत,कोरडे (ड्राय) आणि ओले (वेट)
त्याच्याशी संबंधित मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत ?
मॅक्युलर डिजनरेशनच्या चिन्हे आणि लक्षणांमध्ये समावेश होतो:
- लालसर, वेदनादायी डोळे (अधिक वाचा :डोळे लाल होण्याची कारणं).
- असे वाटणे जसे की एखादी छाया किंवा एक काळा पडदा डोळ्याच्या समोर उपस्थित आहे.
- सरळ रेषा वाकडीतिकडी दिसणे.
- अस्पष्ट किंवा विकृत दृष्टी (अधिक वाचा:अस्पष्ट दृष्टीचे उपचार).
- सामान्य आकारापेक्षा वस्तू लहान दिसणे.
- भ्रम (ज्या वस्तू उपस्थित नाही, त्या दिसणे).
- डोळ्याच्या समोरील वस्तू दृष्टीच्या मधात बघण्यात अडचण येणे.
- आंधळेपणा किंवा दृष्टी कमजोर होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
मॅक्युलर डिजनरेशन मुख्यतः रेटिनाचे नुकसान झाल्याने होत असते ज्यामुळे रेटिनाचा मध्य भाग खराब होऊन बसतो. मॅक्युलर डिजनरेशन होण्याच्या मुख्य घटकांमध्ये समावेश होतो:
- आनुवंशिकता.
- पर्यावरण.
- वय.
- जेनेटिक(अनुवंशिकता), जसे स्टारर्गार्ड रोगात आढळते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
मॅक्युलर डिजनरेशनचे निदान नेत्र रोग विशेषज्ञांद्वारे केले जाते जे पुढील पद्धतींद्वारे डोळ्यांची पूर्ण तपासणी करतात:
- अमस्लर ग्रीड: अमस्लर ग्रीडमध्ये पाहताना एका विशेष लेंसचा वापर करून डोळ्यांची तपासणी केली जाते जी रेटिना आणि मॅक्युला मधील बदल ओळखण्यासाठी मदत करते.
- विस्तारित डोळ्यांची तपासणी (डायलेटेड आय एक्समिनाशन): परिक्षणादरम्यान रेटिनाला बघण्यात सोपे व्हावे यासाठी, आपले डोळे आणि प्युपिल विस्तारित किंवा मोठे करण्यासाठी आय ड्रॉप्स चा वापर केला जातो.
- डोळ्यांना दिसणाऱ्या मेजरमेन्ट चार्ट चा वापर करून व्हिज्युअल ॲक्युटि चाचणी.
- रेडिओलॉजिकल तंत्र ज्यामध्ये समाविष्ट आहे:
- फ्लुरोसीन अँजियोग्राफी, फ्लुरोसीन (पिवळा रंग) वापरून.
- ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी (ओसीटी-OCT), जे रेटिना स्कॅन करण्यास मदत करते.
मॅक्युलर डिजनरेशनच्या उपचारांमध्ये समाविष्ट आहे:
- ड्राय मॅक्युलर डिजनरेशनचा उपचार मिनरल (खनिज) आणि व्हिटॅमिन च्या साहाय्याने केला जातो जसे की:
- झिंक (80 मिलीग्राम.
- कॉपर (2 मिलीग्राम).
- व्हिटॅमिन सी (500 मिलीग्राम) आणि / किंवा व्हिटॅमिन ई (400 आययू-IU).
- लुटीन (10 मिलीग्राम).
- झैक्सॅंथिन (2 मिलीग्राम).
- वेट मॅक्युलर डिजनरेशनचा उपचार पुढील पद्धतींनी होऊ शकतो:
- फोटोडायनेमिक थेरपी, ज्यामध्ये शिरेच्या आत, ड्रग वर्टेफोर्फीन देण्याचा समावेश असतो.
- अँटी-व्हेस्कुलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर (अँटी-व्हीईजीएफ-VEGF) औषधे असलेले उपचार, जे आपल्या रेटिनामध्ये असामान्य रक्तवाहिन्या कमी करण्यात मदत करते.
- लेझर शस्त्रक्रिया.