सारांश
यकृत मानवी शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी आणि शरिरांतर्गत असलेले सर्वात मोठे अवयव आहे. ते खूप महत्वाच्या शारीरिक क्रिया करते उदा. पचन,पौष्टिक तत्वांचे चयापचय आणि साठवणूक, चयापचयाच्या वेळी निर्माण होणारे घातक रासायनिक पदार्थ आणि औषधे व अल्कोहोल पासूनच्या विषापासून सुरक्षित ठेवणें, आणि विशिष्ट प्रथिनांचे व क्लॉटिंग घटकांची निर्मिती करणे. यकृताच्या कार्यातील व संरचनेतील कोणत्याही विसंगतीला यकृताचे आजार असे म्हणतात. यकृताचे आजार अल्कोहोलमुळे,लठ्ठपणामुळे, परजीवी जंतूंमूळे, रोगजंतूंमूळे, सुक्ष्मजंतुंमूळे, आणि ठराविक औषधे आणि विषांमुळे होतात. यकृताची अनेक कार्ये असल्यामुळे त्याच्या आजारांच्या लक्षणांमधे विविधता दिसून येते, परंतू यकृताच्या आजारांपैकी सर्वात वेधक कावीळ आहे. कावीळ या आजारात, कातडी आणि डोळे मलीन पिवळे होतात, आणि लघवी गडद पिवळी होते. निदान करण्यासाठी मुख्यतः रक्ताच्या तपासण्या, अल्ट्रासोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन, आणि लिव्हर बायोप्सी करतात. मुलभूत कारणांमध्ये यकृतावरील उपचार ठरवीले जातात. लिव्हर सीर्होसिसमध्ये यकृतावर तीव्र व्रण उमटतात. सीर्होसिसचे पर्यावसान शेवटी यकृताच्या बंद पडण्यात होते, जी यकृताच्या आजारातील अंतिम अवस्था आहे. असे होणे साधारणपणें वेळेवर पूर्वनिदान न झाल्यामुळे होते.