यकृताचा कर्करोग म्हणजे काय?
यकृताचा कर्करोग किंवा हेपॅटिक कॅन्सर हा प्रायमरी आणि सेकंडरी या दोन प्रकारचा असतो.म्हणजेच या आजाराचे मूळ जर यकृतामध्ये असेल तर त्यास प्रायमरी आणि इतर अवयवांपर्यंत पसरणारा असेल तर त्यास सेकंडरी कर्करोग म्हणतात.सेकंडरी कर्करोग, प्रायमरी पेक्षा जास्त सामान्य असतो.
कर्करोग हा पेशींच्या असामान्य वाढीतून उद्भवतो,जेव्हा पेशींच्या संयमी वाढीच्या यंत्रणेवर परिणाम होतो याच कारणामुळे अवयवांच्या नियमित कार्यामध्ये पेशींचा अडथळा निर्माण होतो. कर्करोगाचे हानिकारक परिणाम होत असतानाही शरीरात यकृताचे नियमित कार्य सुरू असते त्यामुळे दीर्घ काळ कर्करोग लक्षात येत नाही.
प्रायमरी यकृताच्या कर्करोगामध्ये हेपॅटोसेल्यूलर कार्सिनोमा चा समावेश होतो.
- फाइब्रोलामेल्लर कॅन्सर.
- इंटरहेपॅटिक चोलांगिओकार्सिनोमा.
- लिव्हर अँजिओसारकॉम.
- हेपॅटॉब्लास्टोमा.
याची मुख्य संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
वर सांगितल्याप्रमाणे प्रायमरी यकृताचा कर्करोगाचे दीर्घ काळ निदान होत नाही, त्याची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात
- कारणाशिवाय वजन कमी होणे.
- जेवण कमी असतानाही पोट भरल्यासारखे वाटणे.
- भूक कमी होणे.
- उलटी.
- कावीळ (पिवळसर डोळे,नख आणि लघवी).
- पोटाजवळील भागात दुखणे किंवा सुजणे.
- अशक्तपणा.
- त्वचेला खाज सुटणे.
याची मुख्य करणे काय आहेत?
खालील कारणांमुळे अवयव निकामी झाल्याने यकृत कर्करोग होतो:
- सिर्होसीस ज्यामध्ये मद्यपानामुळे यकृताच्या उतकांवर दुष्परिणाम होतो.
- हिपॅटायटीस विषाणू बी सी किंवा डी.
- आर्सेनिक एक्सपोजर.
- धूम्रपान.
- मधुमेह.
- आंत्र किंवा छातीचा सेकंडरी कर्करोग.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर निदान करायला पुढील पद्धतींचे अनुसरण करतात:
- यकृताचे कार्य तपासायला रक्त चाचणी.
- यकृताची बायोप्सी.
- मॅग्नेटीक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅन.
- पोटाची एंडोस्कोपी.
- सीटी स्कॅन.
- अल्ट्रासाऊंड.
- लॅप्रोस्कोपी.
सेंटीमीटर पेक्षा लहान जखमेसाठी प्रत्येकी 3 महिन्यांनी घेतलेला आढावा पुरेसा असतो.काही प्रकरणात यकृताच्या पेशींचे नुकसान भरून काढण्यासाठी तसेच पुनरुत्पादक वाढीसाठी शस्त्रक्रिया पुरेशी ठरते.
यकृताच्या कर्करोगाची उपचारपद्धती ही कर्करोगाचे प्रमाण आणि स्वरूप यांवर अवलंबून असते.
यकृताच्या कर्करोगाची उपचारपद्धती ही कर्करोगाचे प्रमाण आणि स्वरूप यांवर अवलंबून असते.त्यासाठी पुढील पर्याय उपलब्ध आहेत:
- निकामी पेशी व प्रभावित भाग काढून टाकणारी शस्त्रक्रिया.
- यकृताचे प्रत्यारोपण.
- ट्युमर सप्रेसर यंत्रणा जसे कि रेडिओ किंवा मायक्रोवेव्ह. पण या पद्धतीने सामान्य पेशीही निकामी होतात.
- किमोथेरपी च्या माध्यमातुन कर्करोग उपचारासाठी औषधे देणे.
- एम्बोलायझेशन थेरपी (काही वैद्यकीय कारणास्तव शस्त्रक्रिया करू न शकणाऱ्यांसाठी).
- टारगेटिंग थेरपी पेशींची वाढ रोखण्यासाठी.