पांढरे पाणी - White Discharge (Leucorrhea) in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

February 05, 2019

September 10, 2020

पांढरे पाणी
पांढरे पाणी

सारांश

श्वेतप्रदर स्त्रींमध्ये आढळून येणारी सामान्य व सहज परिस्थिती आहे. याचे अर्थ स्त्रीची योनी आर्द्र व स्निग्ध ठेवण्यासाठी व तिच्या योनीतील संक्रमण टाळण्यासाठी म्युकस नावाच्या पारदर्शक पदार्थाची गळती. श्वेतप्रदर स्त्रीच्या प्रौढावस्थेत प्रजनन क्षमतेकडून रजोनिवृत्तीकडे जातांना होणार्र्या हार्मोन स्तरांतील बदलांमुळे होतो. याची लक्षणे उदा न खाज होणारी पांढरी गळती आणि ओलसरपण्याची संवेदना हानिरहित असून कोणत्याही गुंतागुंती न होता सुटू शकतात. श्वेतप्रदर या रोगाची इतर कारणे लैंगिक संबंधातून पसरणारी व इतर संक्रमणे असू शकतात. अशा वेळी, खाज, लालसरपणा, दुर्गंधी आणि गैरसोय किंवा वेदनाही अनुभवली जाते. अशा संक्रमणांमध्ये औषधांसह, गुंतागुंती होणें किंवा संक्रमणांचे स्थलांतरण टाळण्यासाठी इतर निवारणात्मक उपायांचीही गरज असते. अत्यधिक किंवा असामान्य असेपर्यंत, श्वेतप्रदर रोगावर उपचार करावे लागत नाही.

पांढरे पाणी काय आहे - What is Leucorrhea in Marathi

वैश्विक लोकसंखेच्या पचमांश भागात प्रजननक्षम वयोगटातील स्त्रिया येतात. भारतात अशा स्त्रियांची टक्केवारी लोकसंख्येची 19% एवढ्या स्त्रिया, 2001 च्या जनगणनेनुसार आहे. भारतीय स्त्रियांमध्ये, विशेष करून ग्रामीण भागांत, योनीतून स्राव ही दुर्लक्षिली जाणारी समस्या आहे. भारत आणि बांग्लादेश यांसारख्या अनेक विकसनशील देशांमध्ये स्त्री प्रजननतंत्राचे संक्रमण एक सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे, जिथे यांची टक्केवारी 52-92% एवढी आहे. तरी, श्वेतप्रदर हा योनीमधील नैसर्गिक स्राव असूनही, तिला आजारच मानले जाते. श्वेतप्रदर हे प्रौढ महिलांमधील लक्षण असले, तरी किशोरपूर्व मुलींमध्ये 3 ते10 वर्षे वयोगटातही योनीमधून स्राव आढळते.

श्वेतप्रदर म्हणजे कोणत्याही अंतर्निहित वैद्यकीय समस्या नसतांना योनीतून पांढरसर स्राव. वैद्यकीय भाषेत, अत्यधिक स्रावाचे सगळे प्रकार, पांढरा असो की पिवळसर, रक्त गळत नसले, तर श्वेतप्रदर हेच मानले जाते. सामान्य योनीतील तरळ पदार्थ स्राव होणार्र्या स्त्रीच्या ऋतुचक्राच्या चरणानुसार रंग, प्रमाण आणि घटकांमध्ये फरक आढळतो. श्वेतप्रदरमध्ये रंग किंवा गंध नसतो, पण स्राव हिरवा किंवा पिवळा असल्यासह खाज, लालसरपणा व दुर्गंध ये असली, तर प्रजननतंत्राच्या संक्रमणाचे लक्षण आहे.

Women Health Supplements
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

पांढरे पाणी ची लक्षणे - Symptoms of Leucorrhea in Marathi

सामान्यपणें, संक्रमण नसलेल्या श्वेतप्रदर या रोगामध्ये पातळ, पारदर्शक पाण्यासारखा स्राव होतो. संक्रमणांमध्ये, प्रमाण, जाडी व रंग विविध असतात. त्याच्या जोडीला इतर लक्षणेही असू शकतात, उदा. :

  • जाड, पांढरे, पिवळसर किंवा हिरवे स्राव होणें.
  • माशासारखे तीव्र दुर्गंध येणें.
  • स्त्रीच्या जननेंद्रियांच्या आजूबाजूला लालसरपणा व खाज येणें
  • जळजळ किंवा वेदनायुक्त लघवी येणें.
  • पुरुष जोडीदाराशी संभोग झाल्यानंतर रक्तस्राव होणें
  • ऋतुचक्रांच्या मध्ये रक्तस्राव किंवा डाग पडणें (अधिक वाचा - योनीमधून रक्तस्रावाची कारणे आणि उपचार)

पांढरे पाणी ची कारणे - Causes of Leucorrhea in Marathi

कारणे

श्वेतप्रदर प्रजननक्षम होणें, मासिक धर्म, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीदरम्यान झालेल्या हार्मोन बदलांच्या परिणामी होते. त्याची पुढील कारणे ही असू शकतात:

  • स्त्री स्वच्छता उत्पादने उदा. इंटिमेट वॉश, टॅंपून, पॅड आणि पॅंटी लायनर यांचा वापर.
  • गर्भनिरोधक म्हणून शुक्राणूनाशक जेली आणि लेपनांचा वापर (अधिक वाचा- सुरक्षित संभोग कसे करावे)
  • संभोगादरम्यान सर्विक्स आणि योनीला झालेली इजा.
  • मधुमेह आणि रक्तक्षय यांसारख्या अवस्था.

श्वेतप्रदराचे कारण ठरणार्र्या विषाणू व जिवाणूजन्य संक्रमणांमध्ये सामील आहेत:

  • बॅक्टिरिअल व्हॅजाइनोसिस
    बॅक्टिरिअल व्हॅजाइनोसिस (बीव्ही) योनीमधील जिवाणूंच्या संख्येत वाढ झाल्याने होते. ते 15 आणि 44 या वयोगटातील, विशेष करून लैंगिकरीत्या सक्रीय असलेल्या स्त्रियांमधील सर्वांत प्रचलित असे योनीचे संक्रमण आहे.
  • थ्रश
     याला कॅंडिडिएसिस असे ही म्हणतात. हे एक प्रकारच्या यीस्टमुळे होणारे संक्रमण आहे. कॅंडिडा सामान्यपणें शरिरात होणार्र्या वनस्तपींचा एक भाग आहे आणि तो तोंड, घसा, गट तसेच योनी मध्येही आढळतो. पण कॅंडिडामुळे काही लक्षणे उद्भवत नाहीत.
  • ट्रायकोमॉनिअसिस
     ट्रायकोमॉनिअसिस ट्रायकोमोनास व्हॅजिनॅएलिस या परजीवीमुळे होणारे एक लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार आहे. हा एक बरा होण्यासारखा रोग असून पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आढळतो. ट्रायकोमोनास संक्रमणे वयस्कर महिलांमध्ये होण्याची शक्यता अधिक असते.
  • क्लॅमिडिआ
    क्लॅमिडिआ एक लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार आहे. याचा धोका योनी, गुदाशय किंवा तोंडातून होणार्र्या संभोगातूनसुद्धा वाढतो. लैंगिक रीत्या सक्रीय असलेल्या तरुणांना या आजाराचा अधिक धोका असतो.
  • गॉनॉरिआ
    गॉनॉरिआ एक लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार आहे. याचा प्रभाव तरुण, विशेष करून 15-24 वर्षे या वयोगटांतील मुलींना अधिक असतो.
  • जॅनिटल हर्प्स
    दोन प्रकारचे विषाणू असतात, म्हणजेच हर्प्स सिंप्लेक्स विषाणू (एचएसव्ही-I) आणि हर्प्स सिंप्लेक्स विषाणू (एचएसव्ही-II) ज्यांमुळे जॅनिटल हर्प्स होते. एचएसव्ही-I मुळे तोंडात हर्प्स होऊन कोल्ड सोर (ओठांवर आणि त्यांच्या भोवती फोडी) होतात. या फोडी सामान्य सर्दी किंवा तापाच्या एका प्रसंगानंतर होतात.
  • पेल्व्हिक इन्फ्लॅमॅटरी डिसीझ
    लैंगिक संबंधांतून पसरणार्र्या आजारांवर उपचार न करता सोडल्यास, पेल्व्हिक इन्फ्लॅमॅटरी डिसीझ नावाची अवस्था उद्भवू शकते. या आजारामुळे स्त्री जननतंत्रातील अंगांवर प्रभाव पडतो. अनेक लैंगिक जोडीदार, पेल्व्हिक इन्फ्लॅमॅटरी डिसीझचे पूर्व इतिहास, गर्भनिरोधक उपकरणांचे वापरही पेल्व्हिक इन्फ्लॅमॅटरी डिसीझचा धोका वाढवतात.

इतर कारणे:

  • सर्व्हिक्सचे कर्करोग
  • सर्व्हिसाइटीस (सर्व्हिक्सचे दाह)
  • व्हॅजिनल एट्रोफी (रजोनिवृत्तीनंतर वाढते वय आणि हार्मोनच्या असंतुलनामुळे योनीचे तंतू निकामी पडणें).
  • रेक्टोव्हॅजिनल फिस्ट्यूला (योनी आणि रेक्टम यांच्या मध्ये बनलेली एक असामान्य फट जिच्या माध्यमातून विष्ठा योनीत प्रवेश मिळवू शकेल).
  • योनीचे कर्करोग.
  • व्हॅजिनायटीस (योनीचे दाह)
  • मासिक धर्मादरम्यान टॅंपून तसेच ठेवणें
  • डाउच, सुगंधी फवारणींचा वापर.

धोक्याची घटके

कोणत्याही निदानाशिवाय श्वेतप्रदराचा धोका अनेक घटके उदा. स्त्रीचे वय, शैक्षणिक दर्जा, कौटुंबिक पार्श्वभूमी, गर्भावस्थांची संख्या, गर्भनिरोधकांचे वापर आणि शिशुजन्माची पद्धत यांवर अवलंबून असतो. योनीमधून असमान्य गळतींचा धोका यांमुळे वाढतो:

  • लैंगिकरीत्या सक्रीय व्यक्ती.
  • अनेक लैंगिक जोडीदार
  • आधीचे उपचार न केलेली संक्रमणे.
  • असुरक्षित लैंगिक संपर्क
  •  25 वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या तरुण स्त्रिया.
  • लैंगिक संबंधातून पसरणार्र्या आजारांचे पूर्व इतिहास
  • एचआयव्ही संक्रमण
  • अशक्त रोगप्रतीकार
  • निरोध बहुतांशी न वापरणें
  • गर्भनिरोधक उपकरणे न वापरणें
Pushyanug Churna
₹449  ₹499  10% OFF
BUY NOW

पांढरे पाणी चा उपचार - Treatment of Leucorrhea in Marathi

औषधोपचार

प्रतिजंतुकीय औषधांच्या लहान क्रमानेच श्वेतप्रदर या रोगावर उपचार होऊ शकते. रुग्ण स्त्रीच्या योनीमधील असमान्य रक्तस्रावाच्या बाबतीत, ही उपचारपद्धत निदान केलेल्या संक्रमणाच्या प्रकारावर अवलंबून राहील. कॅंडिडा संक्रमणांसाठी, बुरशीरोधी औषधांचा सल्ला साधारणपणें दिला जातो. बीव्हीची लक्षणे उपचाराशिवाय शमतात. हर्प्ससाठी कोणतेही उपाय उपलब्ध नाही. विषाणूरोधी औषधे गळतीचा काळावधी कमी करू शकतात. या औषधांनी संक्रमणाचा पसार कमी करण्यातही साहाय्य होते. सांप्रत, हर्प्ससाठी एखादी लसही उपलब्ध नाही, तरी अनेक वैद्यकीय प्रयोग केले जात आहेत.

आहारात मेथी, सुकलेले कोथिंबीर व पिकलेली केळींची मात्रा घेण्यासाराखे वनस्पतीमय उपाय केल्यास सौम्य श्वेतप्रदरवर नियंत्रण मिळवता येते. पिंपळाच्या झाडापासून बनवलेले आयुर्वेदिक पदार्थ उदा. फायकस रेसेमोसा आणि थेस्पिआ  यांद्वारेही गळती कमी करण्यात मदत होते.

जीवनशैली व्यवस्थापन

औषधीय व वनस्पतीमय उपायांसोबत, योग्य स्वच्छता ठेवणें सर्वोत्तम उपाय असेल.

  • कृत्रिम (सिंथेटिक) अंतर्वस्त्रे घालणें टाळावे. सूती किंवा लिनेनच्या चड्ड्या घालाव्यात. खाजरोधी साबणाने धुवावे. जननेंद्रियांच्या आजूबाजूला अत्यधिक धुतल्यामुळेही पीएच संतुलन विस्कळीत होऊन, जिवाणूंच्या अतीवाढीचे कारण होते.
  • मलनिःसारणानंतर, योनीचे संक्रमण टाळण्यासाठी, पुढून मागे धुवावे.
  • शौचालयात गेल्यानंतर प्रत्येक वेळी योनीचा भाग स्वच्छ करावे.
  • संतुलित आहार घ्यावे.
  • विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी दररोज 10 ते 12 पेले पाणी प्यावे.
  • चालणें, जॉगिंग, योगासने, ध्यान यांसारखे हलके व्यायाम करावे, कारण अतीप्रभावी व्यायाम श्वेतप्रदराला वाढवू शकते.
  • एकावेळी एकापेक्षा अधिक लैंगिक भागीदार ठेवू नये.
  • प्रत्येक लैंगिक गतिविधीदरम्यान लॅटेक्स निरोध वापरावेत.
Patrangasava
₹449  ₹500  10% OFF
BUY NOW


पांढरे पाणी साठी औषधे

Medicines listed below are available for पांढरे पाणी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.