कुष्ठरोग/महारोग काय आहे?
कुष्ठरोग किंवा हान्सेन रोग हा त्वचेचा संसर्ग आहे आणि मायकोबॅक्टेरियम लिप्रेमुळे होतो. या स्थितीचा त्वचा, म्युकस मेम्बरनस, पेरिफेरल नर्व्ह, डोळे आणि श्वसन प्रणालीवर परिणाम होतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्लूएचओ) च्या म्हणण्यानुसार, कुष्ठरोग शक्यतो श्वसनमार्गाद्वारे आणि कीटकांद्वारे पसरतो, याव्यतिरिक्त असेही मानले जाते, एखाद्या संक्रमित व्यक्तीशी जास्त संपर्कानेही होऊ शकतो.
त्वचेच्या डागांच्या परिणामांनुसार या स्थितीचे वर्गीकरण केले जाते.
- पॉसिबॅसिलरी कुष्ठरोग (पीबी) - नकारात्मक डाग.
- मल्टीबासिलीरी कुष्ठरोग (एमबी) - सकारात्मक डाग.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
या स्थितीत स्पष्ट लक्षणे दिसतात, ज्यामुळे तो सहज ओळखला जाऊ शकतो.
- त्वचेवर विचित्र पॅच, सामान्यतः सपाट असतात.
- सभोवतालच्या त्वचेपासून वेगळ्या दिसणाऱ्या निस्तेज आणि फिकट जखमा.
- त्वचेवर नोड्यूल.
- कोरडी आणि कडक त्वचा.
- तळपायावर अलसर्स.
- चेहऱ्यावर किंवा कानांवर लम्प्स.
- पापण्या आणि भुवयांचे पूर्ण किंवा थोडे नुकसान.
याची इतर काही लक्षणे अशी आहेतः
- प्रभावित भागावर घाम येणे
- पक्षाघात
- स्नायुंचा कमकुवतपणा
- वाढलेल्या नसा विशेषतः कोपर आणि गुडघ्या जवळ
- चेहऱ्यावरील नसांवर परिणाम झाल्यामुळे अंधत्व येऊ शकते.
पुढील अवस्थेत, असे होऊ शकते:
- पाय आणि हातांना अपंगत्व येणे
- अंगठे आणि बोटं लहान होणे आणि पुनर्वसन होणे.
- पायाच्या अल्सरची जखम भरून न येणे.
- नाक विद्रुप होणे
- त्वचेची आग होणे
- नसा वेदनादायक किंवा नाजूक होणे.
याची मुख्य कारणे काय आहेत?
कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लिप्रामुळे होतो, याचे जिवाणू आपल्या पर्यावरणात आढळून येतात. जीन उत्परिवर्तन आणि भिन्नता यामुळे कुष्ठरोग होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे, रोगप्रतिकार शक्तीमध्ये बदल आणि दाह यामुळेही शक्यता वाढते. संक्रमित व्यक्तीशी दीर्घकाळ संपर्कामुळे हा आजार पसरतो किंवा जिवाणू असलेली हवा नाकावाटे आत घेतल्यास होतो.
कुष्ठरोगाचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
कुष्ठरोग वास्तविक त्वचेच्या रंगापेक्षा, वेगळ्या दिसणाऱ्या त्वचेवरील गडद किंवा हलक्या रंगाच्या पट्टयांमुळे ओळखला जातो. पॅचेस लालसर रंगाचे पण दिसू शकतात. परीक्षणाच्या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी, डॉक्टर त्वचा किंवा नर्व्ह बायोप्सी करू शकतात.
अँटीबायोटिक्सच्या संयोजनासह स्थितीचा उपचार केला जाऊ शकतो. अँटीबायोटिकचा प्रतिरोध टाळण्यासाठी बहु-औषधोपचार आवश्यक आहेत. यात डॅप्सन, क्लोफाझिमिन आणि रिफाम्पिसिन यांचा समावेश आहे. या औषधांची ॲलर्जी झाल्यास, मिनोस्लाइकिन, क्लारिथ्रोमायसीन आणि ऑफ्लोक्सॅकिन प्रभावी पर्याय आहेत.
बधिरता दूर करण्यासाठी, पायांचे रक्षण करणारे विशेष बूट निवडा आणि सामान्य चाल पुन्हा स्थापित करण्यासाठी मदद मिळवा. शस्त्रक्रिया स्पष्ट दिसणारी विकृती सुधारण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करू शकते. एकूणच, एका वर्षाच्या कालावधीत ही स्थिती हाताळली जाऊ शकते.
त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. आक्रमक आणि वेळेत केलेले उपचार हा रोग पूर्णपणे बरा करण्यास मदत करतात.