सारांश
पायदुखी म्हणजे टाचपासून मांडीपर्यंतच्या सांध्यादरम्यान कोणत्याही भागामधील त्रासदायक अस्वस्थता. पायातील वेदना हा काही आजार नव्हे. पण रक्ताभिसरणाच्या समस्या, स्नायूंची इजा, अस्थिभंग किंवा मज्जातंतूंच्या समस्या यांची लक्षणे पायांतील वेदनांच्या रुपात दिसतात. पायदुखीचे अचूक कारण शोधण्यासाठी निदान करण्याचे बरेच मार्ग आहेत.या निदान चाचण्यांमधे रक्ताचे परीक्षण आणि इमेजिंग चाचण्या जसे संगणित टोमोग्राफी स्कॅन (सीटी स्कॅन) आणि क्षकिरण तपासणी समाविष्ट आहेत.पायदुखीच्या मूळ कारणांवर उपचार अवलंबून आहेत आणि पुरेपूर विश्रांती घेणे, औषधोपचार करणे, शस्त्रक्रिया करणे, फिजियोथेरपी करणे, पायांत बूट घालणे व कब्जे घालणे यांचा उपचारांमध्ये समावेश असू शकतो.थकवा किंवा स्नायूंतील मुरगड यांसारख्या तात्पुरत्या कारणांमुळे होणारे पायदुखी विश्रांती घेतल्याने आणि उष्ण गादी आणि बर्फ लावल्याने बरी होती.