मूत्रपिंडांचा संसर्ग काय आहे?
मूत्रपिंडांचा संसर्ग हा किडनीवर होणारे जिवाणूची उपस्थिति किंवा आक्रमण आहे, जे मूत्राशयात सुरू होते आणि मूत्रपिंडांमध्ये पसरते. याला पायलोनेफ्रिटिस असेही म्हणतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मूत्रपिंडांचा संसर्ग सामान्य आहे, यात आणि खालील लक्षणे आढळून येतात:
- लघवीमध्ये रक्त किंवा पस.
- लघवी करताना वेदना आणि जळजळ.
- लघवीला दुर्गंधी आणि गर्द रंग.
- वारंवार लघवी होणे.
- पाठीचा खालचा भाग आणि ओटीपोटात वेदना.
- थंडी वाजून खूप ताप येणे.
- पोटात अस्वस्थ वाटणे.
- भूक न लागणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
मूत्रपिंडांचा संसर्ग सामान्यपणे बॅक्टेरियामुळे होतो आणि क्वचितप्रसंगी मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेनंतर होतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे कारण गुदाशय आणि मूत्रमार्गाचे द्वार एकमेकांच्या जवळ असतात, ज्यामुळे बॅक्टेरियाला मूत्राशयापर्यंत पोहोचणे सोपे होते. गर्भवती महिलांना जास्त धोका असतो, कारण बाळाचा मूत्रपिंडावर भार असतो आणि ते मूत्र प्रवाहात अडथळा आणते. मूत्रपिंडाच्या संसर्गाची मुख्य कारण पुढीलप्रमाणे आहेतः
- मूत्रमार्गात किडनी स्टोन.
- वाढलेले प्रोस्टेट किंवा त्यांना संसर्ग.
- आकुंचलेला मूत्रमार्ग किंवा युरेटर्स सारखी संरचनात्मक समस्या.
- रिफ्लेक्स, ज्यात मूत्राशया पासून मूत्रपिंडापर्यंत मूत्र परत येते.
- मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही.
- कमकुवत प्रातिकारशक्ती .
- मूत्राशयातील मज्जातंतूंना नुकसान.
- युरिनरी कॅथेटरचा वापर.
सामान्यपणे मूत्रपिंडाच्या संसर्गास कारणीभूत ई.कोलाय हे जिवाणू असतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वेळेवर निदान आणि मूत्रपिंडांना संसर्गाचा उपचार आवश्यक आहे, कारण विलंब झाल्यास त्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो.
- पस, रक्त आणि बॅक्टेरिया शोधण्यासाठी मूत्र तपासणी.
- बॅक्टेरियाचा प्रकार जाणून घेण्यासाठी युरीन कल्चर.
- स्टोन्स किंवा संरचनात्मक असामान्यता तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन.
- कोणत्याही अडथळ्यांची शक्यता नाकारण्यासाठी सिस्टोयुरेथ्रोग्राम.
- मूत्रमार्गाची रचना,आकार आणि कार्य तपासण्यासाठी डीएमएसए (डायमेरेप्टाटोसकिनिक ॲसिड) स्किन्टीग्राफी.
मूत्रपिंडाच्या संसर्गासाठी पुढील उपचार पद्धतीचा सल्ला दिला जातो:
- बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी तोंडावाटे अँटीबायोटिक्स आणि ताप नियंत्रित करण्यासाठी अँटीपायरेटिक्स दिले जातात. गंभीर संसर्गाच्या बाबतीत, अंतःशिरेतून (नसांमधून) अँटीबायोटिक्स आणि द्रवपदार्थांच्या व्यवस्थापनासाठी हॉस्पिटल मध्ये जाणे आवश्यक आहे.
- वारंवार होणाऱ्या संक्रमणांसाठी, मूळ कारण शोधायला युरॉलॉजिस्टचा सल्ला घेणे सोईस्कर असते.
- स्ट्रक्चरल असामान्यता सुधारण्यासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाऊ शकतो.
काही स्वास्थवर्धक सवयींचा वापर करून मूत्रपिंडांचा संसर्ग टाळला जाऊ शकतो, जसे भरपूर पाणी पिणे, गुप्तांगावर डिओडोरन्ट टाळणे, आंत्र रिक्त झाल्यानंतर प्रत्येक वेळी पुढून मागेपर्यंत भाग व्यवस्थित कोरडा करणे आणि लघवी लागताच लघवीला जाणे. लक्षणे उद्भवल्यास, कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.