कावासाकी रोग काय आहे?

कावासाकी रोग जगभरातील हृदयविकारा चे एक प्रमुख कारण आहे. याची बाधा 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो. यापैकी, 70 टक्के प्रकरणे 3 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतात. लवकर निदान आणि उपचार केल्यास, मुलांच्या विकासावर रोगाचा कोणताही प्रभाव पडत नाही.  हा आजार चिंजाजनक असून अत्यंत दुर्मिळ आहे.

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कावासाकी रोगामध्ये विशिष्ट लक्षणे आणि चिन्हे दिसून येतात जे खालीलप्रमाणे आहे:

  • 5 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ताप असणे.
  • पुरळ.
  • हात आणि पायाला सूज येणे.
  • डोळे चुळचुळणे आणि लालसर होणे  (अधिक वाचा: लालसर डोळ्यांचे उपचार).
  • मानेमधील लिम्फ नोडस् सुजणे.
  • तोंड, होठ आणि घसा चुरचुरणे आणि सूज येणे.

दोन्ही डोळ्यांना संसर्ग होत असला तरी त्यात पस होत नाही. हातापायाला पुरळ आणि सूज येते. संपूर्ण शरीरातील धमन्यांना सूज येते.

हृदयाच्या कोरोनरी आर्टरीज सुजल्यामुळे धोकादायक परिणाम होऊ शकतो. धमन्यांचे आतील स्नायू, जे सामान्यतः गुळगुळीत असतात, कमकुवत होतात आणि रक्तवाहिन्या फुगायला लागतात ज्याला एन्युरीसिम असे म्हणतात. जर ते फुगतच राहिले तर एन्युरीसिम फुटतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कावासाकी रोगाचे कोणतेही स्पष्ट कारण नाही आहे. संशोधनामुळे असे दिसून येते की व्हायरसमुळे हा आजार होऊ शकतो. तसेच, काही मुलांना अनुवांशिक पूर्वस्थिती मुळे हा रोग होतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

कावासाकी रोगाचे निदान करण्यासाठी कोणतेही विशिष्ट चाचणी नाही आहे. अशा प्रकारे, निदान मोठ्या प्रमाणात क्लिनिकल असते, म्हणजे, इतर संबंधित रोगांची शक्यता नकारून करावे लागते. रक्तवाहिन्यांवरील कावासाकी रोगाचा प्रभाव तपासण्यासाठी डॉक्टर ईसीजी, अँजियोग्राफी करायला सांगू शकतात. कोरोनरी धमन्यांवरील कोणताही प्रभाव न आढळल्यास, मुले पूर्णपणे बरे होण्याची शक्यता असते. 95% रुग्णांच्या बाबतीत हेच होते.

वेदना, ताप आणि सूज कमी करण्यासाठी औषधे देऊन उपचार सुरु केले जातात. हे ॲस्परिन देऊन सुरक्षितपणे केले जाऊ शकते, जे रक्तातात क्लॉट बनणे प्रतिबंधित करते. शिरेत जवळजवळ 12 तासांसाठी इम्युनोग्लोब्युलिन ए दिले जाते. जी मुले चांगला प्रतिसाद देत नाही अशा मुलांना स्टेरॉईड्स देण्यात येतात.

Dr. Vikas Patel

Orthopedics
6 Years of Experience

Dr. Navroze Kapil

Orthopedics
7 Years of Experience

Dr. Abhishek Chaturvedi

Orthopedics
5 Years of Experience

Dr. G Sowrabh Kulkarni

Orthopedics
1 Years of Experience

Medicines listed below are available for कावासाकी रोग. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Human Normal Immunoglobulin Injection1 Injection in 1 Vial9990.0
IMMUNOREL 2.5GM INJECTION 50ML5143.6
PENTAGLOBIN INJECTION 10ML4199.3
Gamma IV Injection1 Injection in 1 Packet1961.0
PLASMAGLOB 5GM INJECTION 100ML10287.9
Fixderma Cosmetic Laboratories AHA Lightening Gel 30ml30 ml Gel in 1 Bottle1625.0
Gammaren Infusion100 ml Iv Fluid in 1 Bottle19404.8
Gamma IV 2500 Infusion50 ml Infusion in 1 Bottle9232.0
Igwok 5% Infusion100 ml Infusion in 1 Bottle10288.32
Gamma IV 5000 Infusion100 ml Infusion in 1 Bottle17036.0
Read more...
Read on app