कपोसी सारकोमा काय आहे ?

कपोसी सारकोमाचे नाव हंगेरियन त्वचा रोगतज्ञ, डॉ मोरिट्झ कपोसी यांच्या नावावर आहे, ज्यांनी 1872 मध्ये प्रथम या रोगाची माहिती दिली होती. हा त्वचेच्या रक्तवहिन्यासंबंधीचा एक अत्यंत घातक कर्करोग आहे आणि पॅचेस किंवा रक्तवाहिन्यांची जखम च्या रुपात दिसतो. ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही-HIV) संवेदनशील रुग्णांमध्ये कपोसी सारकोमाची जास्त प्रवृत्ती दिसून येते. याला बऱ्याचदा ॲकवयार्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स-AIDS) रोगाने परिभाषित केल्याचे मानले जाते. हा रोग समलैंगिक पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?

याचे परिणाम त्वचेवर आणि आतील थरावर किंवा श्लेष्मल त्वचेवर(म्युकोसा) वर दिसून येतात. पॅचेस शरीरावर कुठेही दिसू शकतात. जखम बहुतेक वेळा सपाट पिग्मेंटेड मॅक्यूल्स किंवा उच्च नोडुलर पॅपुल्स म्हणून दिसतात. रक्ता वाहिन्यांनी भरपूर प्रमाणात रक्त पुरवठा केल्यामुळे ते रंगात लाल किंवा जांभळ्या रंगाचे दिसतात. ते वेदनादायी नसतात पण त्यांचे नकारात्मक मनोवैज्ञानिक परिणाम होतात. कालांतराने, या जखमा त्रासदायक होऊ शकतात आणि पायात सूज देखील येऊ शकते.

जखम आंतरिक अवयवांमध्ये उपस्थित असल्यास जीव धोक्यात आणू शकते. ते मूत्रमार्गात किंवा गुदाच्या नलिकेत अडथळा आणू शकते. फुफ्फुसात ते ब्रोन्कोस्पाज्म, श्वासांची कमतरता आणि प्रोग्रेसिव्ह लंग फेलियरचे कारण होऊ शकते. त्वचेवरील पॅच कालांतराने ट्युमरमध्ये विकसित होऊ शकतात.

याची मुख्य कारणं काय आहेत ?

कपोसी सारकोमा हा हर्पेसव्हायरस 8 नावाच्या व्हायरसच्या संसर्गाने होतो ज्याला कपोसी सारकोमा-संबंधित हर्पेसव्हायरस म्हणून देखील ओळखले जाते. एचआयव्ही (HIV) संसर्ग झालेल्या लोकांना हा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.एकदा संसर्गित झाल्यानंतर, पेशींच्या प्रतिकृती तयार होण्याच्या सामान्य चक्रामध्ये व्यत्यय येण्यामुळे एंडोथेलियल सेल्स (रक्त वाहिन्यांच्या अंतर्गत पृष्ठभागावर असलेल्या पेशी) असामान्य प्रकारे विभाजन होऊन वाढतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

एकदा क्लिनिकल चिन्हांनी सूचित झाले की रुग्ण कपोसी सारकोमापासून पीडित आहे, की जखमेची बायोप्सी करून निदानाची पुष्टी केली जाऊ शकते. ट्युमर पासून थोड्याप्रमाणात टिश्यू गोळा केले जातात.ही प्रक्रिया ॲनस्थेसिया देऊन केली जाते आणि म्हणून वेदनादायक नसते. जखमेवर जास्त प्रमाणात रक्तवाहिन्या असल्यामुळे थोड्या प्रमाणात रक्तस्त्राव दिसून येतो सोबतच एक किंवा दोन दिवस सौम्य अस्वस्थता देखील होऊ शकते. निदानाची पुष्टी करण्यासाठी उच्च कार्यक्षम  सूक्ष्मदर्शिकेखाली टिश्यूंचे नमुने तपासले जातात. असामान्य सेल्समधील डिस्प्लास्टिक वैशिष्ट्ये आणि रक्तवाहिन्यांची उपस्थिती निदानाची पुष्टी करते.

उपचार एचआयव्ही संसर्गाच्या स्थितीवर आणि प्रतिरक्षा प्रणालीवर(इम्युन सिस्टीम) कसे परिणाम झाले यावर अवलंबून असतात. उपलब्ध उपचार पर्याय म्हणजे अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी-ART). किमोथेरपी आणि एआरटी(ART) एकत्र वापरली जाऊ शकते. जखमेचे शीतकरण किंवा शस्त्रक्रिया करून जखम काढून टाकणे, हे करणे देखील शक्य आहे.

 

Medicines listed below are available for कपोसी सारकोमा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Lipodox 20 Mg Injection1 Injection in 1 Packet8040.0
Oncodox 10 Injection1 Injection in 1 Packet171.05
Advadox Injection1 Injection in 1 Packet8064.0
Mitomycin C 10 Injection1 Injection in 1 Packet491.69
Mitomycin C 40 Injection1 Injection in 1 Packet2245.69
Oncodox 50 Injection1 Injection in 1 Packet611.62
Wellpeg Injection10 ml Injection in 1 Vial6230.0
Nudoxa 2 Injection 10 Ml1 Injection in 1 Packet9650.0
Lippod 50 Injection 25 Ml1 Injection in 1 Packet7904.21
Nudoxa 20 Injection1 Injection in 1 Packet4353.04
Read more...
Read on app