सारांश
कावीळ हा असा रोग आहे,ज्यामध्ये संपूर्ण सीरमबिलीरुबिन (टीएसबी)ची पातळी 3 मि.ग्रा. प्रती डिसीलिटरपेक्षा जास्त होते.लक्षणांमध्ये तुमच्या कातडीला, डोळ्यांच्या पांढऱ्या भागाला आणि म्युकस पडद्याला (तोंडासारख्या आतल्या सौम्य अवयवाचे काठ) पिवळेपणा येणे सुमार आहे. साधारणपणे जन्मजात बाळांना कावीळ होतो, परंतु प्रौढसुद्धा त्याच्या त्रासापासून अलिप्त राहत नाहीत. प्रौढांमध्ये इतरही लक्षणे जसे पोटदुखी , भूक ना लागणे , वजन कमी होणे, इतर दिसतात. लहान बाळांमध्ये प्रकाशोपचार आणि रक्त संक्रमण, तर प्रौढांमध्ये प्रयोजक घटकांचे काढून टाकणे, औषधोपचार आणि कधी शल्यक्रिया देखील वापरली जाते. उपचार न करता सोडून दिल्यास , मुलाच्या मेंदूवर परिणाम होतो, आणि इतरही समस्या जसे सेप्सीस, यकृत आणि मूत्रपिंडाच्या पूर्णपणे बंद पाडण्याचे किंवा रोगाचे धोके संभवतात.
बिलरुबीनचे चयापचय
आपले शरीर नव्या लाल रक्तपेशी बनवीत असते आणि जुन्या लाल रक्तपेशी संपवीत असते. या प्रक्रिये दरम्यान, जुन्या लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिन तुटून ग्लोबीन, लोह, आणि बिलिव्हरडीन मोकळे होते. ग्लोबीन आणि लोह आपल्या हाडांच्या मज्जेमध्ये जाऊन परत वापरल्या जाते आणि नवे हिमोग्लोबिन बनते, तर बिलिव्हरडीन पुन्हा तुटून बिलिरुबिन नावाचे सहउत्पाद तयार होते. आपले यकृत पुढील चयापचयासाठी हे बिलिरुबिन घेते. हे प्रक्रिया झालेले बिलिरुबिन पित्ताच्या नळीतून आतड्यांमध्ये प्रवेश करते. यकृत त्याला आणखीन विभागून युरोबिलिनोजेन आणि स्टरकोबिलिनोजेन मध्ये रूपांतरित करते. युरोबिलिनोजेनशोषल्या जाऊन पुन्हा रक्त अभिसरणात सोडल्या जाते, ज्यातला एक भाग यकृतात पुनः प्रवेश करतो तर उरलेला भाग मूत्रपिंडाच्या मदतीने लघवीद्वारे बाहेर काढल्या जाते. स्टरकोबिलिनोजेनशौचाद्वारे बाहेर काढल्या जाते.