कान खाजवणे म्हणजे काय?
कान खाजवणे हे एक लक्षण आहे जे बऱ्याचदा कानांच्या संसर्गा मुळे उद्भवते. हे सामान्यत: कानाच्या नलिकेतील त्वचेच्या नैसर्गिक असंतुलनामुळे होते. कान खाजवणे एक सामान्य समस्या आहे आणि सामान्यतः अंतर्निहित रोगाची उपस्थिती दर्शवते. कानातील मळाची अतिरीक्त स्वच्छता केल्याने त्वचा फाटू शकते आणि कानत संसर्ग होण्याची शक्यता असते. क्यू-टिप्स, टूथपिक्स आणि सेफ्टी पिनसारख्या वस्तू कान खाजवायला वापरल्याने कानाला नुकसान होऊ शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कान खाजवण्याशी संबंधित लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
याची मुख्य कारणं काय आहेत?
कान खाजवणे या समस्येचा त्रास खालील कारणांमुळे होऊ शकतो:
- सोरायसिस.
- नाकात जळजळ (र्हानायटिस).
- पोहणाऱ्याचा कान (बाह्य कानाच्या नलिकेत संक्रमण).
- कानात मळ झाल्यामुळे अडथळा.
- ॲलर्जी.
- एक्झिमा.
- कोरडी त्वचा.
कान खाजवण्याचे एक सामान्य कारण फंगल इन्फेक्शन आहे. काही व्यक्तींचा, कान इतका संवेदनशील असतो की अगदी बारीक धुळीचा कण किंवा कोणताही बाहेरचा कण खाज सुरू करू शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तुमचे डॉक्टर तपशीलवार इतिहास घेतील आणि कान खाजवण्याची स्थिती तपासण्यासाठी शारीरिक तपासणी करतील. कानांचे परीक्षण करण्यासाठी आणि कानाच्या विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑटोस्कोपचा वापर केला जाऊ शकतो. नंतर निदानाच्या आधारावर उपचार केले जातात.
उपचारांमध्ये खालील पद्धतींचा समावेश आहे:
- इन्फेक्शनचा उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक किंवा अँटिफंगल इयर ड्रॉप्स दिले जाऊ शकतात.
- सौम्य स्टेरॉइड ड्रॉप्स खाजवणाऱ्या कानांसाठी वापरले जाऊ शकतात.
- इअरवॅक्स विरघळवणारे ड्रॉप्स अडथळा दूर करण्यात मदत करू शकतात.
प्रतिबंधक उपाय :
- सौम्य प्रकरणे घरी सहजपणे हाताळली जाऊ शकतात, पण लक्षणे टिकून राहिल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे.
- तुम्ही ENT (कान नाक घसा)तज्ज्ञ किंवा त्वचारोग डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यास वारंवार होणाऱ्या संसर्गाचे कारण समजू शकते.
- तुम्ही कानाची मशीन वापरत असल्यास, त्यांचे संसर्ग टाळण्यासाठी त्याला नियमितपणे स्वच्छ करायचा सल्ला देण्यात येतो.
- तुम्हाला असामान्य रक्तस्त्रावाचा अनुभव होत असल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.