आयर्नची विषबाधा काय आहे?

जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात आयर्न खातो तेव्हा, सामान्यतः काहीच कालावधीत शरीरात आयर्न खूप जास्त होते ज्यामुळे आयर्नची विषबाधा होते. प्रौढांपेक्षा मुलांमध्ये आयर्नची विषबाधा अधिक सामान्य आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

  • आयर्नची विषबाधेचे प्राथमिक लक्षण ओटीपोटात चमक येणे आणि गॅस्ट्रिक अस्वस्थता ही आहेत.
  • ज्या व्यक्तीने खूप जास्त आयर्न खाल्ले असेल त्याचे मल काळे किंवा रक्तयुक्त देखील असू शकते.
  • आयर्नची विषबाधेचे इतर लक्षण डिहायड्रेशन आणि खूप उलट्या आहेत.
  • जर वरील / आरंभिक लक्षणांचे 24 तासांच्या आत निराकरण केले गेले नाही तर अधिक गंभीर लक्षणे दिसून येतात. यात श्वास घेण्यात अडचण, अनियमित नाडी, चक्कर येणे, त्वचा निळसर होणे, शरीराचे तापमान वाढणे यांचा समावेश असू शकतो.
  • लक्षणांची तीव्रता आयर्न किती प्रमाणावर घेतले आहे अवलंबून असते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

मुलांमध्ये आयर्नची विषबाधाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे अति आयर्न पूरक वस्तू दिले जाणे. असे मुलांकडे दुर्लक्ष केले गेल्याने किंवा टॅब्लेट्स मुलांच्या हाती सहज लागतील अश्या प्रकारे ठेवल्याने होते.

ॲनिमिया पीडित मुलं आणि प्रौढांना आयर्न पूरक आहार दिला जातो. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा अनियमित प्रमाणात घेतल्यास आयर्नची विषबाधा होऊ शकते.

जेव्हा एखादी व्यक्ती प्रति किलो वजनाच्या 20 मिलीग्रॅमपेक्षा जास्त आयर्न घेते तेव्हा विषारीपणाचे लक्षण दिसू लागतात.

60 मिलीग्रॅम/किलो घेतले गेले तर त्याचे परिणामस्वरुप गंभीर कॉम्प्लिकेशन निर्माण होतात ज्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. 

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

  • जर एखाद्या मुलात आयर्नची विषबाधेचे लक्षण दिसून आले तर डॉक्टर आयर्नच्या डोजचा सविस्तर इतिहास घेतात.
  • रक्ताच्या तपासणीचा सल्ला दिला जातो, जे रक्तातील आयर्नचे प्रमाण स्पष्ट करते. याला आयर्नचा अभ्यास असे म्हणतात.
  • इमेजिंगद्वारे, एक वैद्यकीय तज्ज्ञ अन्ननलिकेत आयर्नच्या गोळ्या तपासू शकतात, मात्र हे नेहमीच विश्वसनीय नसते.

आयर्नच्या विषबाधेच्या उपचार खालील प्रकारे केले जातात:

  • काही तासातच आयर्नच्या विषबाधेची लक्षणं कमी झाल्यास उपचारांची गरज नसते.
  • मात्र, कोणत्याही शमनाशिवाय लक्षणं सतत राहिल्यास, तपासणीची आवश्यकता आहे.
  • तात्काळ उपचारांमध्ये अन्ननलिका धुण्याचा समावेश आहे. याचा अर्थ रासायनिक पदार्थांचा वापर करून पोट संपूर्ण रिकामे करणे आहे.
  • शरीरात आतड्यांमधून (IV) एक विशेष रसायन टाकण्याची आणखी एक पद्धत आहे. डिफेरोक्सामाइन नावाचे रासायन आयर्न एकत्रित करतू आणि मूत्रमार्गे ते काढून टाकण्यास मदत करते. मात्र, ह्या रसायनामुळे श्वसनाचे साइड इफेक्ट्स होतात.

Medicines listed below are available for आयर्नची विषबाधा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Defrijet 250 Mg Tablet10 Tablet in 1 Strip241.0
Defrijet 500 Mg Tablet10 Tablet in 1 Strip402.0
Desirox 500 Mg Tablet30 Tablet in 1 Strip1521.84
Asunra 400 Mg Tablet6 Tablet in 1 Strip827.0
Deferasirox Tablet6 Tablet in 1 Strip827.0
Desferrioxamine Injection1 Injection in 1 Vial167.0
Asunra 100 Mg Tablet6 Tablet in 1 Strip275.0
Oleptiss DT 360 Tablet10 Tablet in 1 Strip1493.33
Deferoxamine + Desferrioxamine Injection1 Injection in 1 Vial165.0
Desirox 250 Mg Tablet30 Tablet in 1 Strip830.0
Read more...
Read on app