मार (इजा) काय आहे?
आपल्या शरीरावर बाहेरील घटकांमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानाला मार किंवा इजा म्हणून ओळखले जाते. इजा शरीराच्या कोणत्याही भागाला डोक्यापासून ते अंगठ्यापर्यंत होऊ शकते. काही इजा सहजपणे उपचारात्मक असतात, तर मोठ्या इजा एकतर अक्षम करू शकतात किंवा घातक ठरू शकतात. इजेला अवयव, तीव्रता आणि कारणासारख्या अनेक घटकांच्या आधारावर वर्गीकृत केले जाऊ शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मार लागलेला अवयव आणि जखमांची तीव्रता यानुसार चिन्हे आणि लक्षणे भिन्न असतात. काही सामान्य लक्षणं खालीलप्रमाणे आहेत:
- वेदना.
- सूज आणि अलवारपणा.
- शारीरिक ॲक्टिव्हिटी चालू ठेवण्याची गति कमी होणे किंवा अक्षमता.
- जखमेतून रक्तस्त्राव.
- हेमॅटोमा (टिश्यूमध्ये घट्ट रक्त जमा होणे).
- उलट्या.
- चक्कर येणे.
- शुद्ध हरपणे.
- योग्यरित्या पाहण्यास अक्षम.
- समन्वय न साधता येणे.
- स्मृती भ्रंश.
याची मुख्य कारणं काय आहेत?
इजेचे मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत:
- दुर्घटना.
- पडणे.
- भाजणे.
- शारीरिक आघात.
- आत्महत्या करण्याचा प्रयत्न.
- खेळताना दुखापत.
- हिंसा किंवा युद्ध.
- वारंवार येणारा ताण.
- औषधांची विषबाधा.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
इजेचे निदान प्रामुख्याने चिन्हे आणि लक्षणांद्वारे केले जाते जे बाह्य (दृश्यमान) किंवा अंतर्गत (अदृश्य) असू शकतात. इन्ज्युरी सिव्हिरियटी स्कोअरचा वापर करून दुखापतीचा दर्जा ठरवणे हा निदानाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण तो आघाताची तीव्रता दर्शवितो. निदान खालील प्रमाणे केले जाते :
- शारीरिक चाचणी:
निर्णय घेण्यासाठी इजेच्या जागेची व्यवस्थित शारीरिक तपासणी आवश्यक आहे. हाड आणि स्नायूंच्या दुखापतीसाठी, डॉक्टर तुमच्या हालचाली आणि प्रभावित भागांच्या हालचालीचे आकलन करतात.
- न्यूरोलॉजिकल चाचणी:
चेतातंतूंच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यासाठी डॉक्टर डोळ्यांच्या हालचाली, संवेदना आणि स्नायूंवरील नियंत्रण यांचे परीक्षण करतात.
- इमेजिंग:
- एक्स-रे.
- एमआरआय.
- अल्ट्रासाऊंड.
- सीटी स्कॅन.
- रक्त तपासणी:
मेंदूला दुखापत झाली असल्यास दोन महत्त्वपूर्ण प्रोटिन्स (GFAP आणि UCH-L1) ची उपस्थिती ओळखण्यासाठी रक्त तपासणी केली जाते.
दुखापतीचा उपचार मुख्यत्त्वे रुग्णालयात दाखल होण्याआधीच प्राथमिक प्रथमोपचाराने सुरू होतो. उपचार सामान्यपणे खालीलप्रमाणे केले जातात:
- वेदनाशामक, अँटी-इंफ्लॅमेटरी आणि अँटी-एमेटिक औषधे आणि ट्रॅन्क्विलाइझर्स यासारखे औषधोपचार.
- शरीराच्या प्रभावित भागाला थोडे उंचावर ठेवणे.
- फ्रॅक्चरच्या असल्यास लवचिक कॉम्प्रेशन पट्ट्या, स्लिंग्स किंवा कास्ट्स.
- फिजियोथेरेपी.
- शस्त्रक्रिया.
मार गंभीर स्वरूपाचा असल्यास तज्ञांकडून सल्ला घेऊ शकता. मोठ्या आघातापेक्षा किरकोळ इजेतून लवकर बरे वाटते. पुनर्वसन, सौम्य व्यायाम, योग्य आहार आणि तुमचे डॉक्टर आणि फिजिओथेरेपिस्टकडून नियमितपणे सल्ला घेण्यामुळे त्वरित बरे होण्यास मदत मिळते.