हायपोपॅराथायरॉडिझम(अंतर्गत सक्रीय थायरॉईड) काय आहे?

पॅराथायरायड ग्रंथी या मानेत थायरॉईड ग्रंथीजवळ असलेल्या चार लहान ग्रंथी असतात. हे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि राखण्यासाठी पॅराथायरायड हार्मोन तयार करतात. पॅराथायरायड ग्रंथीद्वारे पॅराथॉर्मोनचे अपर्याप्त उत्पादनामुळे हायपोपॅराथायरॉडिझम होतो. याच्या परिणामस्वरुप रक्तातील कॅल्शियमचा स्तर कमी होतो (हायपोकॅलेसीमिया) आणि सीरम फॉस्फरसचा (हायपरफॉस्फेटीया) स्तर वाढतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

हायपोपॅराथायरॉडिझमची चिन्हे आणि लक्षणे रक्तात कॅल्शियमच्या कमी झालेल्या पातळ्यांचे परिणाम असतात.

  • स्थितीच्या सौम्य ते मध्यम तीव्रतेस सूचित करणाऱ्या लक्षण अशी आहेत:
  • तीव्र विकार दर्शविणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
    • स्नायू अखडणे, ज्यामुळे लॅरिन्स्पोस्पॅम (व्होकल कॉर्ड आखडणे) किंवा ब्रोन्कोस्पाझम (फुफ्फुसाच्या वातनलिकांमध्ये आतील टिश्यू आखडणे) - परिणामदेखील होऊ शकतो.
    • स्नायूमध्ये पेटके
  • तीव्र प्रकरणांमध्ये उद्भवणाऱ्या असामान्य लक्षणे ही आहेत:
    • दातांच्या विकासात्मक त्रुटी ज्या मुलांमध्ये एनामल हायपोप्लासिआ म्हणून ओळखल्या जातात.
    • दाताचे मूळं विकृत होतात.
    • दात किडण्याचा धोका संभवतो.
    • घोगरा आवाज.
    • खरखर.
    • डिस्पनोइआ (श्वासांची कमतरता).
    • झटके.
    • चक्कर येणे.
    • कार्डियाक एरिथिमिया (हृदयाचे ठोके असामान्य होण्याची परिस्थिती - खूप वेगवान, खूप मंद किंवा अनियमित).
    • डोळ्यात अंधुकपणा किंवा मोतीबिंदू.

याची मुख्य कारणं काय आहेत?

पॅराथायरायड ग्रंथीद्वारे पॅराथायरायड हार्मोन कमी स्रवल्यामुळे हायपोपॅराथायरॉडिझम होतो.

  • सामान्य कारणं अशी आहेत:
    • थायरॉईड किंवा मानेच्या शस्त्रक्रियेदरम्यान पॅराथायरायड ग्रंथींना दुखापत होणे किंवा त्या काढणे.
  • इतर कारणं ही आहेत:
    • हायपोपॅराथायरॉडिझमसाठी रेडिओॲक्टिव्ह आयोडीन थेरपी देताना आनुशंगिक नुकसान.
    • हे क्रोमोझोम (अनुवांशिक सामग्री वाहणारी संरचना)शी निगडित डिजीर्ज सिंड्रोम, एड्रेनल हार्मोनचा कमतरता किंवा याबरोबरच ॲडिसन रोग यासारख्या विशिष्ट आजारांशी संबंधित असू शकते.
    • सीरम मॅग्नेशियमच्या सामान्य पातळीपेक्षा कमी होते.
    • ऑटिमिम्यून रोग (एक रोग ज्यात एखाद्या व्यक्तीची स्वतःची रोगप्रतिकार प्रणाली शरीराच्या पेशींवर आणि टिश्यूंवर हल्ला करते) पॅराथ्रॉइड ग्रंथींना प्रभावित करते.
    • जन्मापासूनच पॅराथ्रॉइड ग्रंथीची अनुपस्थिती (जन्मजात हायपोपॅराथायरॉडिझम).

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदान लक्षणे, चिन्हे, तपशीलवार वैद्यकीय इतिहास आणि पूर्णतः क्लिनिकल मूल्यांकनावर आधारित असते.

  • खालील चाचण्या केल्या जाऊ शकतात:
    • कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि क्रिएटिनिनच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी रक्त तपासणी.
    • पॅराथायरायड हार्मोन तपासणी.
    • कॅल्शियम विसर्जनचे मूल्यांकन करण्यासाठी मूत्र तपासणी.
    • मोतीबिंदू तपासण्यासाठी हृदयाचे ठोके आणि नेत्र तपासणीसंबंधी सल्ला तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी)चा देखील सल्ला दिला जातो.

लक्षणांपासून आराम देणे आणि हाडं आणि रक्तात कॅल्शियम आणि फॉस्फरसची पातळी पुनर्संचयित करणे हा उपचारांचा उद्देश असतो. इतर उपचार पद्धतींमध्ये खालील समाविष्ट असतात:

  • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी साठी ओरल पर्याय आणि पूरक आहार दिले जातात.
  • पॅराथायरायड हार्मोन इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते.
  • गंभीर प्रकरणांमध्ये, कॅल्शियमचे इंजेक्शन्सन नसांमध्ये  दिले जातात.
  • अत्यावश्यक वैद्यकीय तपासण्या (रक्तदाब, हृदयाचा वेग, श्वासोच्छ्वासाचा वेग आणि शरीराचे तापमान) आणि हृदयाची तालबध्दता यांचे निरीक्षण करणे गंभीर प्रकरणांमध्ये आवश्यक असते.

Medicines listed below are available for हायपोपॅराथायरॉडिझम(अंतर्गत सक्रीय थायरॉईड). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Maha Herbals Thyro Peace Tablet60 Tablet in 1 Bottle153.0
Shuddhi Divya Thyri Capsule60 Capsule in 1 Bottle1500.0
Becute 2 K Plus Tablet299.0
SIDCAL TABLET 10S196.0
Sol Week Capsule4 Capsule in 1 Strip97.5
CMD3 60K TABLET4 Tablet in 1 Strip69.65
CPOWER TABLET 15S69.3
Read more...
Read on app