हेपेटायटिस काय आहे?
हेपेटायटिस हे शरीरातील सर्वात मोठा अवयव, यकृत, यावर सूज येणे होय. यकृत हा शरीरातील महत्वाचा भाग आहे जो जेवणाचे पचन करण्यात, ऊर्जा जमा ठेवण्यात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतो. अल्पकालीन हेपेटायटिस 6 आठवड्यापर्यंत राहू शकतो तर दीर्घकालीन हेपेटायटिस आयुष्यभर टिकून राहू शकतो. हेपेटायटिसचे अनेक प्रकार आहेत, ज्यात हे समाविष्ट आहेत:
- हेपेटायटिस ए.
- हेपेटायटिस बी.
- हेपेटायटिस सी.
- अल्कोहोलिक हेपेटायटीस.
- ऑटोइम्युन हेपेटायटीस.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
हेपेटायटीसच्या मुख्य लक्षणांमध्ये समाविष्ट आहे:
- स्नायूंच्या वेदना.
- सांध्यांमध्ये वेदना (अधिक वाचा:सांधेदुखीचे उपचार).
- ताप.
- डोकेदुखी.
- दीर्घकालीन थकवा.
- कावीळ.
- उदासीनता (डिप्रेशन).
- अस्वस्थ आणि सुस्त वाटणे.
- भूक न लागणे.
- परत-परत पोट दुखणे.
- मळमळ.
याची मुख्य कारणं काय आहेत?
हेपेटायटीस हा अनुवांशिक संसर्ग आहे जो विषाणूजन्य संसर्गासारख्या बऱ्याच कारणांनी होऊ शकतो.
- हेपेटायटीस ए, बी, सी, डी किंवा ई विषाणूंसोबत विषाणूजन्य संसर्ग.
- मद्यप्राशन करणे.
- अनुवांशिक किंवा पर्यावरणीय घटकांमुळे ऑटोइम्युन रोग.
- यकृतावर अतिरिक्त वसा जमा झाल्यामुळे.नॉन-अल्कोहोल स्टीटोहेपेटायटीस सारखे मेटॅबॉलिक रोग.
- वेदना-शामक आणि ताप कमी करणारी औषधं जास्त प्रमाणात घेणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
हेपेटायटीस चे निदान रक्ताची चाचणी करून आणि लिव्हर बायोप्सी (यकृतातून घेतलेल्या ऊतींच्या नमुन्यांचे विश्लेषण) करून केले जाते. अँटीबॉडीजची उपस्थिती माहिती करून घेण्यासाठी इतर चाचण्या केल्या जाऊ शकतात. हेपेटायटीसच्या प्रत्येक प्रकारासाठी रक्ताच्या चाचण्या ठराविक असतात.
अल्पकालीन हेपेटायटीस बहुतेकदा बेड रेस्ट आणि औषधं घेतल्याने बरा होऊ शकतो. मद्यप्राशन न केल्याने आणि चरबीयुक्त आहार न घेतल्याने लक्षणे लवकर कमी करण्यास मदत होते. गंभीर प्रकरणात, जेथे यकृताला बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे, तेथे लिव्हर सिरॉसिस होऊ शकतो किंवा यकृत निकामी पडु शकते, यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असू शकते.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की व्हायरल हेपेटायटीस बी, सी हे संसर्ग झालेल्या शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्याने पसरले जाऊ शकते. म्हणून संसर्ग झालेल्या व्यक्तीची वैयक्तिक वस्तू वापरण्याचे टाळावे (टूथब्रश, रेझर्स, इत्यादी). लैंगिक संपर्क (योनी द्रव किंवा वीर्य यांच्याशी संपर्क) देखील विषाणू प्रसारित करू शकतो, आणि म्हणूनच प्रसार थांबविण्यासाठी कंडोम वापरणे महत्वाचे आहे.
हेपेटायटीस बी साठी लसीकरण उपलब्ध आहे आणि प्रत्येक नवजात मुलांसाठी आपल्या देशात अनिवार्य आहे. हेपेटायटीस ए साठी देखील लस अनिवार्य आहे.