सारांश
लघवीतून रक्त येणे हे एक धोकादायक लक्षण आहे. लघवीमधे रक्त असणे बरेचदा इतर लक्षणांसोबत असते जसे लघवी करताना वेदना होणे, ताप येणे, मळमळ होणे आणि उलट्या होणे. लघवीतील रक्ताची तक्रार असल्यासत्या व्यक्तीला मूळ कारण निश्चित करण्याकरिता संपूर्ण वैद्यकीय चिकीत्सा करावी लागते. शिवाय, नेमके कारण निश्चित करण्यासाठी रक्त आणि मूत्राची विशिष्ट चाचणी आवश्यक आहे. निदानासाठी पोटाच्या आणि ओटीपोटीजवळील भागाच्याएक्स-रेकिंवा अल्ट्रासोनोग्राफीची देखील आवश्यकता भासते. लघवीतील रक्ताची कारणे मूत्रमार्गातील संसर्गासारख्या सामान्य पासून (यूटीआय) मूतखडा किंवा कर्करोगासारख्या जटिल आजारांपर्यंतची असू शकतात. लघवीतून रक्त येण्यावरील उपचार या सर्व कारणांवर अवलंबून आहेत. काही लोक प्रतिजैविकांच्या वापरासारख्या अल्पकालीन उपचाराने बरे होऊ शकतात तर काहींना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासू शकते. परिणाम सामान्यतः,दुर्मिळ गुंतागूंतींव्यतिरिक्त, चांगले आहेत.