भ्रम काय आहे?
भ्रम हा निश्चितच रोग नाही आहे पण एक लक्षण आहे ज्यात व्यक्तीला काल्पनिक अनुभव येतात. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष बाह्य उत्तेजनाशिवाय ऐकू शकतो,त्याला गंध येऊ शकतो, इतरांची जाणीव होऊ शकते किंवा इतर लोकांच्या उपस्थितीचा अनुभव येऊ शकतो. हे बऱ्याच मनोवैज्ञानिक आणि वैद्यकीय परिस्थितींशी निगडीत आहे, ज्यात डिमेंशिया आणि डिलिरियम चा समावेश होतो. भ्रम हा सहसा वयस्कर लोकांमध्ये अधिक बघायला मिळतो जो वाढत्या वयाचा एक भाग आहे.
भ्रम पाच प्रकारांमध्ये वर्गीकृत केलेले आहे:
- श्रवणविषयक.
- दृष्टीविषयक.
- घाणेंद्रिय विषयक.
- चवी विषयक.
- स्पर्श विषयक.
- ज्ञानेंद्रिय विषयक.
भ्रम हा आभासासारखा नाही आहे जिथे प्रत्यक्षात जे घडत आहे त्या परिस्थितीचा चुकीचा तर्क लावण्यात येतो.
त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
- श्रवणविषयक (आवाज विषयक) भ्रम:
अशा प्रकारात, रुग्णाला वास्तविक बाह्य स्रोताशिवाय एक किंवा अधिक आवाज ऐकू येतात.
कधीकधी, तुम्हाला असे वाटेल की एक तिसराच व्यक्ती तुम्हा दोन व्यक्तींचे बोलणे ऐकत आहे. हे आवाज जे तुम्ही एकता ते तुमच्या डोक्याच्या आत किंवा बाहेर असू शकतात. कधीकधी, आपण आपले विचार मोठ्याने ऐकू शकता.
- दृष्टीविषयक भ्रम:
तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीचा किंवा चमकदार प्रकाशाचा भास होतो.
- घाणेंद्रिय विषयक (वास संबंधी) भ्रम
एखाद्या अंतर्गत किंवा बाह्य स्रोतांपासून आपल्याला गंध येत आहे असे वाटू शकते. काही रुग्ण जास्त प्रमाणात अंघोळ करू शकतात, जास्त परफ्यूम किंवा डिओडरंट वापरतात, किंवा इतरांपासून स्वतःला वेगळे करतात जर ते स्वत: ला खराब वासेचा स्रोत मानत असतील तर.
- चवी विषयक भ्रम:
आपल्याला चवीमध्ये बदल, वाढलेली तहान आणि वाढलेली लाळ यासारखे अनुभव येण्याची शक्यता असते.
- स्पर्श विषयक भ्रम:
कीटक आपल्या त्वचेवर किंवा खाली चालत असल्यासारख्या संवेदना जाणवू शकतात.
- ज्ञानेंद्रिय विषयक भ्रम:
तुम्ही असामान्य शारीरिक भावना अनुभवू शकता जसे की इतरांच्या शरीरास स्पर्श करणे आणि त्यांची उपस्थिती न जाणणे.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
भ्रमाचे अचूक कारण अज्ञात आहे. सामान्य परिस्थिती ज्यामुळे भ्रम होऊ शकतो त्या म्हणजे:
- श्रवनविषयक भ्रम::
- मज्जसंस्थेचा विकार.
- कानाचा रोग.
- मानसिक विकार (अधिक वाचा: मानसशास्त्रीय लक्षणे)
- औषधांमुळे.
- दारू सोडल्याने.
- झटके येणे.
- स्ट्रोक.
- चिंता.
-
घाणेंद्रिय विषयक (वास संबंधी):
- डोळ्यांचा विकार.
- न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर.
- मायग्रेन.
- औषधे.
- मानसिक विकार.
- साइनुसायटिस.
- झोपेची उणीव.
- चवी विषयक भ्रम:
- साइनुसायटिस.
- स्पर्श विषयक भ्रम:
- मनोग्रसीत बाध्याता विकार (ऑब्सेसिव्ह-कंपलसिव्ह डिसऑर्डर).
- काही औषधांचा ओव्हरडोज.
- स्किझोफ्रेनिया.
- ज्ञानेंद्रिय विषयक भ्रम:
- मज्जसंस्थेचा विकार.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
तूमचे डॉक्टर सर्वप्रथम भ्रमाचे कारण माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतील आणि परिस्थितीनुसार औषधं लिहून देतील. रक्त चाचणी, मेंदूचे सीटी स्कॅन, इलेक्ट्रोएन्सेफोलोग्राफी (ईईजी-EEG), आणि एमआरआय (MRI) केले जाऊ शकते. स्थिती ओळखल्यानंतर, उपचाराचा उद्देश कारणाचे निराकरण करण्याचे आहे.
अँटी-सायकोटिक औषधे सामान्यत: भ्रम ठीक करण्यासाठी दिले जातात. जर एखाद्या औषधा च्या साइड इफेक्टमुळे आपणास भ्रम होत असेल तर डॉक्टर औषधाचा डोस कमी करतील.