गरोदरपणात मूत्रविसर्जन म्हणजे काय?

वारंवार मूत्रविसर्जन हे गरोदरपणातील एक सामान्य आणि सर्वात लवकर दिसणारे लक्षण आहे. पहिल्या त्रैमासिकेच्या पहिल्या काही आठवड्यात हे चालू होते, बहुतेक महिलांमध्ये, गरोदरपणातील शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहते.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

  • गरोदरपणात वारंवार लघवी लागण्याची चिन्हे प्रत्येक गरोदर स्त्रियांमध्ये वेगळी असू शकतात. काही गरोदर स्त्रियांना संपूर्ण गरोदरपणात बर्‍याचदा लघवीचा त्रास होऊ शकतो, तर काहींना याची कल्पना देखील येत नाही.
  • दुसर्‍या त्रैमासिकेदरम्यान हा त्रास कमी होऊ शकतो, तर वाढणाऱ्या गर्भाचा मूत्राशयावर दबाव वाढून तिसऱ्या त्रैमासिकेत परत हा त्रास वाढू शकतो.
  • गरोदर स्त्रियांमध्ये वारंवार मूत्रविसर्जन हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) शी देखील संबंधित असू शकते, जे गरोदर स्त्रियांमधील सामान्य संसर्ग आहे.

त्याची मुख्य कारणे काय आहेत?

  • वाढणाऱ्या गर्भास सामावून घेण्यासाठी गर्भाशय वाढते, ते मूत्राशयावर दबाव आणून गरोदर स्त्रियांमध्ये लघवीचा त्रास वाढू शकतो.
  • गरोदरपणादरम्यान, शरीरामध्ये तीव्र हार्मोनल बदल होतात, जे किडनी आणि मूत्राशयावर परिणाम करतं आणि शेवटी वारंवार मूत्रविसर्जन होऊ शकतं.
  • शरीरातील रक्ताची मात्रा वाढल्याने किडनी जास्त द्रव तयार करून प्रतिसाद देते. याचा अर्थ असा की मूत्राशयात खूप द्रव तयार होऊन ती मोकळी करण्याची इच्छा अधिक वारंवार होऊ शकते.
  • हे लक्षण गर्भधारणेतील मधूमेहाशी संबंधित आहे, यालाच गर्भाशयाचे मधूमेह म्हणून ओळखले जाते.

याचे निदान व उपचार कसे केले जाते?

हे गरोदरपणातील साधारणपणे एक सामान्य लक्षण आहे. तरीही, जर तुम्ही काही वेदना, रक्तस्त्राव किंवा लघवीच्या रंगातील बदल अनुभवला तर तुमच्या डाॅक्टरांना कळवणे चांगले आहे.

  • जर आवश्यक असेल तर रक्त तपासणी, लघवी तपासणी आणि इतर चाचण्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो.
  • जर तुम्ही मळमळ सुद्धा अनुभवत असाल तर गर्भधारणेच्या मधुमेहास नाकारले पाहिजे.

ही एक सामान्य गोष्ट असल्यामुळे, इतर लक्षणाच्या अनुपस्थितीत वारंवार मूत्रविसर्जनास उपचार आवश्यक नाही.

  • जर संसर्ग असेल, तर तुमचे डाॅक्टर गरोदरपणात सुरक्षित असलेले ॲन्टीबायोटीक्स लिहून देतील.
  • वारंवार मूत्रविसर्जन नियंत्रित करण्यासाठी कॅफिन असलेले पेये टाळा.
  • पेल्व्हीक व्यायाम गरोदरपणात मूत्राशयाच्या स्नायूंवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते.
Read more...
Read on app