कुरुप - Foot Corn in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 01, 2018

March 06, 2020

कुरुप
कुरुप

कुरूप म्हणजे काय?

कुरूप किंवा कॉर्न म्हणजे, अशी जागा जिथली त्वचा सततच्या घर्षणामुळे किंवा प्रेशर वाढल्यामुळे जाड होते. हे पायाची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे किंवा योग्य फिटिंग चे पादत्राणे न घातल्यामुळे होते. भारतातील संख्याशास्त्रानुसार जनसंख्येच्या एकूण 10.65 करोड लोकांमधून 2.6 करोड लोकांना हा होतो.

याचे मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहे?

कुरूप ची  लक्षणे फक्त प्रभावित जागेवरच दिसून येतात. ही लक्षणे खालीलप्रमाणे आहे:

  • त्वचा कठीण होणे.
  • प्रभावित जागा कोणासारखी/ शंकूसारखी किंवा गोल होते.
  • दुखणे.
  • पांढरा, पिवळा किंवा ग्रे रंगाचा डाग प्रभावित जागेवर पडतो.
  • चालतांना त्रास होतो.

हे होण्याचे मूख्य कारण काय आहे?

कुरूप सामान्यतः योग्य फिटिंग चे पादत्राणे न घातल्यामुळे आणि चपलेचे सोल वारंवार पायाच्या त्वचेला घासल्यामुळे होऊ शकते. उंच टाचेच्या जोड्यांमुळे पायावर दाब येतो, त्यामुळे परिस्थिती आणखी खराब होते. पायातील असामान्यत्व जसे हॅमर किंवा पंज्याच्या आकाराची बोटे असल्यामुळे सुद्धा कुरूप होऊ शकतो.

याचा उपचार आणि निदान कसे करतात?

याचे निदान डॉक्टर किंवा पोडियाट्रिस्ट करू शकतात. यामध्ये पायाची तपासणी आणि रुग्णाची वैद्यकीय माहिती घेतली जाते. पायबघून सुद्धा कुरूप झाला आहे की नाही हे ठरवता येते. कुरूपच्या निदानासाठी किंवा उपचारासाठी रक्त किंवा इमेजिंग चाचणीची गरज नसते.

डॉक्टर यावर उपचार म्हणून कठीण झालेली त्वचा खरवडून काढून टाकते. काही विशिष्ट परिस्थितीत,जसे मधूमेह, कुरूप परत होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज असते. कुरूप च्या उपचारासाठी मोठ्या वैद्यकीय हस्तक्षेपाची काहीही गरज नसते, फक्त पायाच्या त्वचेचे कमी घर्षण व्हावे एवढी काळजी घ्यावी. बरेचदा वेदना कमी होण्यासाठी औषधे घेतात त्यामुळे आराम मिळतो.

स्वतः काळजी घेण्यासाठी टीपा:

  • पायाच्या त्वचेचे/सोलचे आणि चपलेचे घर्षण कमी करण्यासाठी घट्ट पादत्रानांचा वापर टाळावा.
  • नेहमी आरामदायक पादत्राणे वापरावे, कुठेही अनवाणी जाऊ नये.
  • पायाच्या बोटामध्ये आणि प्रभावित जागेच्या मध्ये लोकरीचा वापर करावा त्यामुळे आराम मिळेल.
  • पायांची नखे छोटी असावी त्यामूळे प्रभावित जागेवर वेदना किंवा दाब पडणार नाही.
  • गरम पाण्याच्या टब मध्ये 20 मिनिटे पाय ठेवून प्युमिक स्टोन ने घासावे.
  • कुरूप च्या जागेवर आणि आजूबाजूला क्रीम लावावे त्यामुळे त्वचा सॉफ्ट व्हायला मदत होते.

सर्वात शेवट लक्षात ठेवा की कुरूपाची व्यवस्थित काळजी घेतल्याने तो आरामात बरा होऊ शकतो.



संदर्भ

  1. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Corns
  2. American Orthopaedic Foot & Ankle Society. About Foot and Ankle Orthopaedic Surgeons. Rosemont, Illinois. [internet].
  3. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; How to treat corns and calluses
  4. Health Navigator. Calluses & corns. New Zealand. [internet].
  5. American Podiatric Medical Association. Corns and Calluses. Bethesda, Maryland. [internet].