अन्नविषबाधा (फूड पॉइझनिंग) काय आहे?
अन्नविषबाधा हे दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिल्याने होते. अन्न जीवाणूमुळे, छोटे कीटक, किंवा रोगाणुंमुळे दूषित होते.
ह्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या सिस्टम वर परिणाम होतो, पण पॉट आणि आतड्याच्या सिस्टम वर जास्त परिणाम होतो.
याचे मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहे?
अन्नविषबाधेचे लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- मळमळ.
- उलट्या.
- ताप.
- कावीळ.
- पोटात दुखणे.
- भूक कमी होणे.
- याव्यतिरिक्त व्यक्तीला थंडी, चक्कर, आणि जास्तीचा घाम येऊ शकतो.
- कोणत्या जीवाणूमुळे त्रास झाला आहे, त्यावर लक्षणे दूषित अन्न खाल्ल्यावर किंवा पाणी पिल्यावर लगेच दिसून येते, किंवा काही दिवसांनी दिसते.
याचे मुख्य कारण काय आहे?
- कोणताही जीवाणू,विषाणू, किंवा परजीवी अन्न किंवा पाण्याला दूषित करू शकते आणि असे दूषित अन्न खाल्ल्याने आणि पाणी पिल्याने अन्नाची विषबाधा होते.
- आरोग्यास हानिकारक जीवाणूंच्या वाढीची परिस्थिती, चूकीचे अन्न शिजवण्याची पद्धत, प्रोसेसिंग, किंवा पॅकेजींग मूळे अन्न दूषित होऊ शकते.
- साल्मोनेला टायफी, व्हीबरो कॉलरा, क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल, स्टॅफिलोकॉकस ओरियस आणि कॅंफिलोबॅक्टर ह्या जीवाणूमुळे अन्न दूषित होते.
- रोटाव्हायरस आणि हेपेटायटिस ए विषाणू सुद्धा अन्नाला दूषित करतात.
- दूषित पाणी हे अन्नविषबाधेच्या कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे. हे घाणपाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या मिश्रणामुळे, पाण्याच्या चुकीच्या स्वच्छ करण्याच्या पद्धतीमुळे किंवा चुकीच्या पद्धतीने पाण्याची ने आण केल्याने होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे करतात?
याचे निदान खालीलप्रमाणे करतात:
- अन्नविषबाधेचे निदान हे तुमच्या लक्षणावर अवलंबून असते, आणि तुम्ही आधी काय खाल्ले याचा अभ्यास केला जातो.
- कोणत्या जीवाणूमुळे ही विषबाधा झाली आहे याचा शोध घेण्यासाठी स्टूल कल्चर केले जाते.
- ब्लड टेस्ट ने संसर्गाचे कारण कळू शकते, जर पांढऱ्या पेशींची (डब्लूबीसी) ची संख्या जास्त असेल तर संसर्ग झालेला असतो. हेपेटायटिस विषाणू साठी विशिष्ट टेस्ट केली जाते.
अन्नविषबाधेवर खालील उपचारपद्धती उपलब्ध आहे:
- अन्नविषबाधेवर लक्षणांमध्ये सुधारणा आणि ज्या कारणामुळे हे झाले आहे त्यांना कमी करणे हे उपचार आहे.
- शरीरातील विशेष जीवाणू ला मारण्यासाठी अँटिबायोटिकस दिल्या जातात. जीवाणू नुसार यावर अँटिबायोटिक्स दिल्या जातात. शरीरातून जीवाणू पूर्णपणे नष्ट होण्यासाठी, सांगितल्याप्रमाणे अँटिबायोटिक्स चा कोर्से पूर्ण करणे आवश्यक आहे.
- डिहायड्रेशन वर उपचार करण्यासाठी फ्लुइड रिप्लेसमेंट पद्धती आणि इलेक्ट्रोलाइट्स पद्धती वापरतात. तोंडावाटे द्रवाची पातळी भरून काढण्यासाठी भरपूर पाणी, शरबत, ताजे फळांचा रस, नारळ पाणी आणि ताक पिणे आवश्यक आहे.