अन्नाचे व्यसन काय आहे?
अन्नाचे व्यसन ही अशी गंभीर समस्या आहे ज्यात लोक स्वात:च्या खाण्याच्या प्रमाणावरचा ताबा गमावतात, म्हणजेच ते अन्नाच्या व्यसनाला बळी पडतात. अन्नाच्या व्यसनामुळे शरीराच्या मानसिक तसेच एकूण आरोग्यावर परिणाम होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मुख्य चिन्हं आणि लक्षणांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- व्यक्तीला शारीरिक अस्वस्थता किंवा आजारी वाटेपर्यंत ही व्यक्ती खात राहते.
- अस्वस्थता, चिडचिडेपणा आणि सामाजिक अलिप्तता ही काही चिन्हे आहेत जी एखादी व्यक्ती विशिष्ट वेळी इच्छित असलेले अन्न मिळत नसल्यास दर्शवते.
- जास्त प्रमाणात खाण्यामुळे व्यक्तीची एकूण कार्यशीलता कमी होते. हे लठ्ठपणाचे कारण
- होऊ शकते.
- अन्नाची व्यसनाधीन व्यक्ती त्यांचे अन्न इतरांपासून लपवतात किंवा विशिष्ट अन्न खाण्याकरिता तर्कहीन कारणं देतात.
- बऱ्याच प्रयत्नांनंतरही, त्यांना आहार योजना राखण्यात किंवा विशिष्ट प्रमाणात किंवा वेळेपेक्षा जास्त खाण्यापासून स्वतःला परावृत्त करता येत नाही.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अन्नाच्या व्यसनांची कारणे एकापेक्षा अधिक असतात आणि व्यक्तीला ह्या न त्या कारणाने प्रभावित करतात.
सामाजिक एकटेपणा, कौटुंबिक समस्या किंवा एकाकीपणा यासारख्या मानसशास्त्रीय कारणामुळे एखाद्या व्यक्तीला समाधानासाठी किंवा आनंद मिळविण्यासाठी अन्न घ्यावे वाटू शकते.
- विक कारणांमधे दोषपूर्ण चयापचय, हार्मोनल असंतुलन, मेंदूच्या आकारात असामान्यता किंवा काही औषधे यांचा समावेश होतो.
- म्हणूनच, अन्नाचे व्यसन मानसिक आरोग्य समस्या किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्यांमुळे होऊ शकते. कधीकधी, ते दोघांचे मिश्रण देखील असू शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
स्थितीच्या निदानात खालील बाबींचा समावेश आहे:
- अन्नाचे व्यसन ओळखणे म्हणजे रुग्णाने समस्या असल्याचे मान्य करण्यास सुरूवात करणे. रुग्णांना हे समजते की हा गंभीर आजार आहे ज्याला उपचारांची गरज आहे तेव्हाच डॉक्टर किंवा मनोचिकित्सक हस्तक्षेप करून इलाजला सुरवात करू शकतात.
- रुग्णाचे वागणे आणि इतर लक्षणांवर आधारित, अन्नच्या व्यसनाचे निदान केले जाते. जरी त्यावर काम केले जात आहे तरी या स्थितीसाठी निश्चित चाचण्यांचा अभाव आहे.
या परिस्थितीच्या उपचारात खालील बाबींचा समावेश आहे:
- अन्नाचे व्यसन उपचार हे इतर व्यसन उपचारांपेक्षा वेगळे आहेत. कारण अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि ते पूर्णपणे सोडले जाऊ शकत नाही.
- जर कारणे जैविक समस्या म्हणून ओळखली गेली तर त्याचे काही औषध आणि जीवनशैलीत बदल केले जातात.
- रुग्णांना मनोविकारिक समस्यांशी निगडित सल्ला आणि उपचारांचा सल्ला देण्यात येतो.
- थकवा आणि सुस्ती कमी करण्यासाठी व्यायाम देखील महत्वाचा आहे.
- आहारातील बदलांमध्ये जेवणाची निश्चित वेळ राखणे, दुषित पदार्थांपासून दूर राहणे आणि नियमित अन्नपदार्थांचे प्रमाण कमी प्रमाणात खाणे ह्याचा समावेश असतो.