बोटाला मार लागणे - Finger injury in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 01, 2018

March 06, 2020

बोटाला मार लागणे
बोटाला मार लागणे

बोटाला मार लागणे काय आहे?

बोटाला मार लागणे, जसे नाव सुचवते, ही एक स्थिती आहे ज्यात बोटाची रचना आणि कार्य  बदलले जाते. ही एक विस्तृत संज्ञा आहे आणि विविध कारणामुळे होणाऱ्या जखमा समाविष्ट असू शकतात. संधिवात किंवा फ्रॅक्चर झालेल्या बोटाप्रमाणे जखम तीव्र असू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बोटाला मार लागल्याने सामान्य चिन्हे आणि लक्षणे यात समाविष्ट आहेत:

  • दुखणे.
  • सूजणे.
  • लालसर होणे.
  • बोटं सरळ करायला किंवा वाकवायला त्रास होणे.
  • रक्तस्त्राव.
  • जखम.
  • कापणे आणि जखमा.

याची मुख्य कारणं काय आहेत?

बोटांच्या दुखापतींपैकी काही सामान्य कारणेः

  • फ्रॅक्चर.
  • बोटांच्या हाडांचे विस्थापन.
  • अंगठीमुळे.
  • संधिवात.
  • मुरगळलेल्या बोटांनी.
  • गेमकीपरच्या अंगठासारखे अंगठा विस्थापन होणे.
  • बोटांचे विच्छेदन.
  • बंदुकीचा छाप ओढण्याचे बोट, एक स्थिती जिथे बोटांतील स्नायूंच्या अवघडलेपणामुळे वेदना होतात.

याची निदान आणि उपचार कसे केले जातात?

जर वरीलपैकी कोणतेही  चिन्हे आणि लक्षणे आढळले,  आणि लक्षणे आणखी खराब होत असल्यास डॉक्टरकडे जाणे सुनिश्चित करा.

डॉक्टर तुमची जखम किंवा बोट किंवा अंगठा वरील जखमा तपासतील आणि कारण, गंभीरता, लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि वैयक्तिक इतिहास यासंबंधित चौकशी करतील. नंतर दुखापतीच्या कारणानुसार तुम्हाला  वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर आणि औषधे लिहून देतील.

फ्रॅक्चर, लिगामेंट फाटणे किंवा दुखापतीची पृष्ठभागाची खात्री करण्यासाठी निदान करण्यासाठी एक्स-रे आवश्यक असू शकतो. रक्त तपासणी आणि सीटी / एमआरआय स्कॅन क्वचितच आवश्यकता भासू शकते.

बोटाला मार लागल्यास ती स्थिती हाताळण्यासाठी काही प्रभावी आणि घरगुती उपचार करावे ज्यात खालील बाबींचा समावेश आहे:

  • एक प्रभावी प्राथमिक मदत म्हणून थंड कॉम्प्रेस वापरावे.
  • आईस थेरेपी, ज्यामध्ये आपण जखमी भागात बर्फ पॅक ठेवू शकता, जखमी बोटावरील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत होऊ शकते. तथापि, बोटाचा बर्फाशी थेट संपर्क आणू नका. त्याऐवजी बर्फ टॉवेलमध्ये गुंढाळा आणि मग त्याचा वापर करावा.
  • कॉम्प्रेशन थेरेपी, ज्यात जखमी बोटाला बँडेज बांधले जाते. हे वेदना आणि सूज दूर करण्यात मदत करते.
  • जखमी बोटाचा रक्त प्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न करा.
  • सूज आणि वेदना कमी करण्यासाठी स्प्लिंटिंग/बंधफलकाद्वारे हालचाली प्रतिबंधित करणे शक्य आहे.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Finger Injuries and Disorders
  2. Cheung K, Hatchell A, Thoma A. Approach to traumatic hand injuries for primary care physicians. Can Fam Physician. 2013 Jun;59(6):614-8. PMID: 23766041
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Finger pain
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Wounds and Injuries
  5. Leggit JC, Meko CJ. Acute finger injuries: part I. Tendons and ligaments. Am Fam Physician. 2006 Mar 1;73(5):810-6. PMID: 16529088