भोवळ येणे म्हणजे काय?
वैद्यकीय भाषेत ज्याला सिंकोप म्हणतात ती भोवळ आहे म्हणजे एक वैद्यकीय स्थिति ज्यात काही काळासाठी रुग्णाची शुद्ध हरपते. सर्वसामान्यपणे या प्रकारची अनेक कारणे दिसून येतात. बहुतेक सर्व रुग्णांमध्ये भोवळ येण्यामागे एखादे अंतर्गत वैद्यकीय कारण असू शकते त्यामुळे याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
काही सेकंदांकरता मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होणे हे भोवळ येण्याचे मूलभूत कारण असते. रक्त पुरवठ्यामध्ये येणार्या अशा अडथळ्यांची वेगवेगळी कारणे असू शकतात. सुदैवाने भोवळ ही फार थोड्या वेळासाठी येते आणि बहुतेक सर्व प्रकरणांमध्ये धोकादायक नसते परंतु ते एखाद्या अंतर्गत स्थितीचे लक्षण असू शकते ज्यामुळे जीवाला धोका संभावू शकतो.
याच्याशी निगडीत चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
भोवळ येण्याशी संबंधित सामान्यत: दिसून येणारी चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- पांढरे पडणे.
- मळमळ.
- डोके हलके होणे.
- हृदयाच्या ठोक्यांची गती बदलणे (वाचा: ॲरेथीमिया उपचार).
- धुरकट किंवा अस्पष्ट दृष्टी.
- ताप.
- थंड आणि दमट त्वचा.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
वर सांगितल्याप्रमाणे मेंदूला होणार्या रक्त प्रवाहात अडथळा येणे हे भोवळ येण्याचे प्रमुख कारण आहे. असा अडथळा अनेक कारणांमुळे येऊ शकतो. काही कारणे पुढीलप्रमाणे:
- हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर मुळे हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते.
- स्ट्रोकमुळे मेंदूला होणारा ऑक्सीजनचा पुरवठा बंद होणे.
- योग्य प्रमाणात रक्त किंवा द्रव पंप न होणे (डिहायड्रेशन, गंभीर प्रकारचा डायरिया).
- रक्त वाहिन्यांची मेंदूला रक्त पुरवठा करण्याची स्थिति नसणे.
भोवळ येण्यास कारणीभूत असणार्या इतर गोष्टी:
- अति उष्णतेच्या सान्निध्यात बराच काळ असणे.
- अति ताण किंवा तणाव.
- अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता.
- डिहायड्रेशन.
- अति प्रमाणात दारूचे सेवन.
- न्याहारी न केल्यामुळे रक्तातील साखर कमी होणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
भोवळ येणे हे अनेक वैद्यकीय स्थितींचे लक्षण असते आणि तिच्यासाठी निदानाची गरज भासत नाही. तरी जर रूग्णाला भोवळ आली आणि त्याला डॉक्टरांकडे नेले गेले तर डॉक्टर रुग्णाचे आरोग्य तपासतील आणि त्यामागचे कारण शोधून काढतील.
सतत येणारी भोवळ थांबवण्यासाठी त्यामागचे कारण शोधून काढणे गरजेचे असते.
शरीराचे कार्य व्यवस्थित चाललय की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर काही तपासण्या करायला सुचवतील. त्या म्हणजे:
- हृदयाचे कार्य तपासण्यासाठी एलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG).
- रक्तक्षय (अॅनिमिया) तपासण्यासाठी रक्त चाचणी.
- मधुमेह किंवा एखादा संसर्ग, हार्मोनल विकृती हे आहे का हे बघण्याठी रक्त चाचणी.
- कवटीचा एक्स–रे किंवा सीटी स्कॅन करण्याची गरज भासू शकते.
अंतर्गत कारणांवर उपचार अवलंबून असतात. भोवळ ही जारी काही सेकंदांकरता येत असली तरी ती जास्त वेळासाठी येत असेल तसेच परत परत येत असेल तर त्याकडे ताबडतोब लक्ष देणे गरजेचे आहे. उपचार कारणांवर अवलंबून असल्यामुळे ते अनेक प्रकारचे असतात जसे की आहारात बदल, हृदय विकार आणि मधुमेहावर नियंत्रण.