एम्फिसिमा काय आहे?
एम्फिसिमा हा एक प्रकारचा क्रॉनिक ऑबस्ट्रकटीव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी-COPD) असतो ज्यामध्ये फुफ्फुसातील टीश्यूची हानी होते. एम्फिसिमा श्वासोच्छवासाच्या अडचणींसाठी कारणीभूत असतो आणि एखाद्या व्यक्तीला विविध दैनंदिन क्रियांमध्ये आणि खेळांमध्ये गुंतण्यापासून रोखू शकतो. क्रॉनिक ब्रॉन्कायटीस आणि सतत खोकल्यासारख्या श्वसनाचे इतर त्रास यासोबत होऊ शकतात. एम्फिसिमामध्ये फुफ्फुसातील ऍल्व्होलीचे (वायुची पिशवी) नुकसान होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
एम्फिसिमाच्या मुख्य लक्षणांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- धाप लागणे.
- श्वास न येणे.
- सतत खोकला येणे.
- थकवा.
- छातीच्या आकारात बदल (छाती वर येणे).
- ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचेवर निळ्या रंगाची कातडी दिसणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
एम्फिसिमा पुढील कारणांनी होतो:
- दीर्घकाळापर्यंत वायूजनित इरिटंट्ससोबत संपर्क.
- धूम्रपान.
- भयंकर वायुप्रदूषण.
- दुर्मिळ प्रकरणात, एम्फिसिमा अनुवांशिक असू शकतो.
एम्फिसिमासाठी धूम्रपान हा सर्वात मोठा धोका असतो. सिगारेट चा धुराच्या संपर्कात येणाऱ्यांना (पॅसिव्ह स्मोकिंग) सुद्धा याचा धोका असतो. एम्फिसिमा खाण उद्योगात काम करणाऱ्या लोकांसाठी व्यावसायिक धोका असू शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
एम्फिसिमाच्या निदानामध्ये फुफ्फुसाच्या कार्याचे परीक्षण समाविष्ट असते. हे परीक्षण श्वासोच्छ्वासाचा दर आणि ऑक्सिजनची किती मात्रा आत घेतली जाते हे ठरविण्यात मदत करते. इतर निदान चाचण्यांमध्ये एक्स-रे आणि सीटी स्कॅनचा समावेश आहे.
एम्फिसिमाचे उपचार अद्याप उपलब्ध नाही आहेत आणि हा रोग केवळ लक्षणांद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो.
फुफ्फुसातील सूज कमी करण्यासाठी डॉक्टर अँटी-इंफ्लॅमेटरी औषधे पुरवू शकतात.
छातीत संसर्ग झाल्यास अँनटीबायोटिक्स दिले जाऊगंभीर प्रकरणांमध्ये ऑक्सिजन उपचाराची आवश्यकता भासू शकते.
इथे प्रतिबंधक उपाय आहेत, ज्याचा वापर रोगास उत्तेजित होण्यापासून आणि अधिक गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. यात पुढील समाविष्ट आहेः
- धूम्रपान थांबवा.
- वायू प्रदूषणाच्या संपर्कात राहणे टाळा.
- ब्रिदींग मास्क वापरणे.
- नियमित व्यायाम करा.
- छातीतील संसर्गा विरुद्ध संरक्षण मिळविण्यासाठी लस घ्या.