इटिंग डिसॉर्डर काय आहे?

इटिंग डिसॉर्डर अनियमित खाण्याच्या सवयीशी संबंधित असून त्यामध्ये अति खाणे किंवा अल्प प्रमाणात खाण्याचा समावेश असतो. रुग्णांमध्ये हा आजार हळूहळू वाढू शकतो आणि म्हणूनच जर तो योग्य वेळी लक्षात आला तर चांगलं असतं.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

असे दिसून आले आहे की इटिंग डिसॉर्डर चे लवकर निदान झाले तर वेळेत उपचार मिळण्यास त्याची महत्वाची भूमिका असते. म्हणूनच, विकारांच्या सामान्य चिन्हे आणि लक्षणांबाबत जागरूक असले पाहिजे:

  • ॲनोरेक्झिया म्हणजे जे लोकं कमी जेवण करतात त्यांची भूक कमी होणे.
  • अशक्तपणा आणि क्षीणता.
  • चिंता.
  • समाजातून वगळले जाणे किंवा एकटेपणा.
  • बुलिमिया, ज्यामध्ये रुग्ण वारंवार जास्त प्रमाणात अन्न खातो.
  • बिंज इटिंग, ज्यामध्ये रुग्ण विशिष्ट कालावधीत मोठ्या प्रमाणात अन्न गिळतो.
  • भूक लागलेली नसताना देखील खाणे.
  • कमी आत्म-सम्मान.
  • मुड्स बदलणे.
  • शरीराचे वजन आणि आकार यावर एकाएकी लक्ष केंद्रित केल्याने.
  • शरीरातील वजनात लक्षणीय आणि अचानक बदल होणे.

त्याची मुख्य कारणं काय आहेत?

इटिंग डिसॉर्डर हा वेगवेगड्या कारणांमुळे उद्भवू शकतो. तरी सर्वात सामान्य कारणं खालील प्रमाणे असू शकतात:

  • मानसशास्त्रीय कारणांमध्ये तणाव, आत्म - सम्मानाची कमतरता आणि शारीरिक प्रतिमेची कमतरता असू शकते.
  • जैविक घटकांमध्ये पौष्टिक अपर्याप्तता, अनुवांशिक मेकअप, हार्मोनल इंटरप्ले किंवा इतर वैद्यकीय समस्या असू शकतात.
  • वैयक्तिक समस्या जसे भुतकाळातील कआहि प्रसंग जे रुग्णांना दुखवू किंवा अस्वस्थ करू शकतात.
  • अचानक सांस्कृतिक बदल.
  • व्यवसायिक आवश्यकता ज्यामध्ये ठराविक पद्धतीचे अन्न सेवन करण्याची जबरदस्ती.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

जर तुम्हाला वे उल्लेख केलेले चिन्हे आणि लक्षणे दिलेत असतील तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. तुमच्यात दिसून येणारी लक्षणे, खाण्याच्या सवयी आणि दररोजच्या दिनचर्येच्या इतर प्रश्नांवरून डॉक्टर हे ठरवू शकतील की तुम्हाला इटिंग डिसॉर्डर आहे की नाही.

  • निदानाच्या वेळी, ते शारीरिक तपासणी करतील आणि जर गरज असली, तर संपूर्ण आरोग्याच्या माहिती आणि काही विशेष पौष्टिक तत्वांच्या कमतरतेसाठी लॅब टेस्ट सांगू शकतील.
  • निदानाची खात्री करण्यासाठी डॉक्टर मनोवैज्ञानिक तपासण्या देखील करायला सांगू शकतात.

इटिंग डिसॉर्डरच्या उपचारामध्ये निरोगी खाणे आणि निरोगी जीवनशैलीशी संबंधित अनेक पैलूंचा समावेश आहे. तरी इटिंग डिसॉर्डरचा उपचार करण्यासाठी काही सामान्य थेरपी वापरल्या जाऊ शकतात:

  • ध्यान.
  • निरोगी खाणे.
  • कॉगनिटीव्ह बिहेव्होरिअल थेरपी ज्यामध्ये बदलणाऱ्या मूड्स आणि खाण्याच्या सवयींचे परीक्षण केले जाते आणि तुम्ही बदलणाऱ्या मूड्स ताबा मिळविण्यासाठी खात नाही आहात
  • इटिंग डिसॉर्डर बरे करण्यासाठी कोणतंही औषध नाही आहे, तरी, चुकीच्या वेळी खाण्याची इच्छा टाळण्यासाठी अँटिप्रेसंट्स आणि चिंता विरोधी औषधं दिली जाऊ शकतात.
  • कोणत्याही कमतरतेवर मात करण्यासाठी पौष्टिक पूरक दिले जाऊ शकतात.

Dr. Sumit Kumar.

Psychiatry
9 Years of Experience

Dr. Kirti Anurag

Psychiatry
8 Years of Experience

Dr. Anubhav Bhushan Dua

Psychiatry
13 Years of Experience

Dr. Sumit Shakya

Psychiatry
7 Years of Experience

Read more...
Read on app