औषधाचा दुरुपयोग म्हणजे काय?
औषधाचा दुरुपयोग म्हणजे औषधांवर शारीरिक आणि मानसिकरित्या अवलंबून राहणे, ज्यामुळे त्या व्यक्तीस वारंवार औषधें घ्यावीशी वाटतात. जगभरातील किशोरवयीन आणि प्रौढांमध्ये औषधाचा दुरुपयोग ही सर्वात घातक समस्या आहे. असे आढळून येते की जवळजवळ सर्व व्यसनाधीन औषधे मेंदूला अतिसंवेदनशील बनवून काही न्यूरोट्रांसमीटर तयार करतात. यामुळे सुखद असा हर्षातिरेक करतात आणि त्या व्यक्तीला वारंवार औषधे घेण्याची इच्छा होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
औषधाचा दुरुपयोग ही भारतात एक गंभीर समस्या आहे आणि तिचा कुठल्याही सामाजिक-आर्थिक स्थराच्या लोकांवर परिणाम होऊ शकतो. बहुतांश वेळा, किंचितही जाणीव न होता, तरुण प्रिस्क्रिप्शन किंवा नॉन-प्रिस्क्रिप्शन ड्रग्स किंवा अवैध पदार्थांच्या गैरवापराकडे आकर्षित होतात. औषधाच्या दुरुपयोगाची लक्षणे शारीरिक, वर्तनात्मक आणि जैविक म्हणून वर्गीकृत केली जातात.
शारीरिक लक्षणे:
- अति झोप येणे किंवा झोप न येणे.
- डोळे लाल होणे.
- विस्तृत किंवा संकुचित बुबुळ.
- वजनात अचानक बदल होणे.
- उलट्या.
- भूक न लागणे.
वर्तनात्मक लक्षणे: औषधाच्या दुरुपयोगामुळे काही सवयी आणि वर्तणुकींवर फरक पडतो. खालील कारणे जर लक्षात आली तर परिस्थिती अधिक खराब होण्यापासून रोखता येते.
- सामाजिक संघटन बदलणे.
- निराशा.
- आक्रमक वर्तन.
- चिडचिड वाढणे.
- एकटे राहण्याची प्रवृत्ती.
- कुटुंब आणि सामाजिक संमेलन टाळणे.
जैविक लक्षण: औषधाचा दुरुपयोग आपल्या अवयवांवर प्रतिकूल परिणाम करू शकतो. औषधांचा गैरवापर झाल्यामुळे खालील समस्या येऊ शकतात:
- लिव्हर सिर्होसिस.
- हेपिटायटीस.
- एचआयव्ही संसर्ग.
- क्षयरोग.
- तोंडाच्या समस्या.
याची मुख्य कारणं काय आहेत?
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ड्रग अब्युजच्या म्हणण्यानुसार दुरुपयोग करणाऱ्या औषधांमध्ये ऍनाबॉलिक स्टेरॉइड्स, ओव्हर-द-काउंटर औषधे, हिरोइन, मेथाम्फेटामाइन आणि इतर बरीच औषधें सामील आहेत. औषधांचा दुरुपयोग भावनात्मक किंवा सामाजिक असू शकतो. याची काही कारणे अशी आहेत:
- औषधांचा दुरुपयोग प्रोत्साहित करणाऱ्या लोकांसोबत राहणे.
- एखादा मित्र किंवा कौटुंबिक सदस्य आधीपासून ड्रग्सचे व्यसन करीत असणे.
- लहान वयात दुरुपयोग करणारे पदार्थ घेणे.
- एकाकीपणा आणि उदासीनता.
- पालकांच्या देखरेखीचा अभाव किंवा कठीण कौटुंबिक परिस्थिती.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
व्यक्तीच्या लक्षणांद्वारे विशिष्ट पदार्थांच्या व्यसनाचे निदान केले जाऊ शकतात. संपूर्ण तपासणीमध्ये खालील चाचण्यांचा करवल्या जातील:
- डॉक्टरांच्या प्रश्नावलीचे उत्तर देणे.
- रक्त तपासणी.
- लघवीचे परीक्षण.
औषधाचा दुरुपयोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. पुनर्वसन कार्यक्रमांचे योग्य रीतीने पालन केल्याने रुग्णाला मदत होते. सल्ला आणि औषधं हे औषधाचा दुरुपयोग या समस्येच्या उपचाराचे दोन खांब आहेत. मनोचिकित्सक आणि मनोवैज्ञानिकांचा सल्ला आणि औषधोपचार आश्चर्यकारक परिणाम देऊ शकतात. उपचारासाठी सामान्यतः वापरली जाणारी औषधे अशी आहेत:
- अँटिडिप्रेसंट्स.
- अँटिसायकोटिक्स.
- अल्कोहोलसाठी अँटिडोट.
- ओपोईड दुरुपयोगासाठी अँटीओपोओपईड्स.
जीवनशैलीतील काही बदल जसे योग आणि नियमितपणे ध्यान करणे याने मनाची शांती मिळते आणि पुनर्प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. औषधाचा दुरुपयोग थांबवणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, मात्र सामान्य, निरोगी आयुष्य पुन्हा सुरू करणे पूर्णपणे शक्य आहे. नियमित फॉलो-अप्स आणि उपचार सख्तपणे पाळणे यामुळे आपण पूर्ण बरे होऊ शकता. ही सवय बंद करण्यासाठी रुग्णाच्या कुटुंब आणि मित्रपरिवाकडून पूर्ण सहकार्य अतिशय महत्वाचे आहे.