चक्कर येणे - Dizziness in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

January 14, 2019

March 06, 2020

चक्कर येणे
चक्कर येणे

सारांश

आपण उभे असताना तोल गेल्याचे जाणवणें किंवा स्थिर राहिल्यावर हलत असल्यासारखे जाणवणें याला चक्कर येणें असे म्हणतात. हे सामान्यपणें कमी रक्त शर्करा, निर्जलीकरण, कमी रक्तदाब आणि मोशन सिकनेस यामुळे होते. कधीकधी, चक्कर येण्याचे कारण अज्ञात असते.चक्कर येणे ही एखाद्या मूलभूत समस्येचे लक्षण असू शकते जसे की माइग्रेन, मोशन सिकनेस किंवा काही कानाचे विकार, जे तोलाच्या जाणिवेला प्रभावित करू शकतात. संखोल इतिहासाद्वारे आपले डॉक्टर त्याचे निदान करू शकतात. चक्कर येण्यासाठी उपचार मूलभूत स्थितीप्रमाणें केला जातो, ज्यामध्ये निर्धारित औषधांसह काही सावधगिरी बाळगणे असे असते. उपचार न केल्यास, घसरण किंवा शुद्धी गेल्यामुळे इजा होऊ शकते. चक्कर येण्यामागील अंतर्निहित कारण उपचारयोग्य असल्याने, बहुतांश प्रसंगी परिणाम चांगला होतो.

चक्कर (भोवळ) येणे काय आहे - What is Dizziness in Marathi

चक्कर येणे, ज्याला डोक्याच्या हलकेपणा असेही म्हटले जाते , ती अस्थिरता किंवा तोल गेल्याची जाणीव असते. ही ज़ाणीव शुद्धीत किंवा त्याशिवाय असू शकते आणि ही एक सामान्य परिस्थिती आहे. मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्ये हे सामान्य आहे. बर्र्याच वेळा ते उपचारयोग्य असते. बहुतांशी गंभीर कारण असल्यास, रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता असू शकते. तुम्हाला चक्कर येण्याची अस्पष्ट लक्षणे दिसू शकतात, जे काही काळानंतर स्बतःहून जातात, परंतु या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये आणि चक्कर येणे प्रकरण वारंवार असल्यास आपल्या डॉक्टरांना त्वरित भेट द्यावे. कधीकधी तुम्हाला प्रवासादरम्यान त्रास होऊ लागते (जसे की हलणार्या बस किंवा कारमध्ये) आणि अशा प्रकारचे चक्कर मोशन सिकनेसमुळे येते . डॉक्टरांनी सुचवलेली मोशन सिकनेसची औषधे घेतल्यास ते बरे केले जाऊ शकते. परंतु, कधीकधी चक्कर येण्याचे अंतर्निहित आरोग्यव्यवस्थेचे परिणाम होऊ शकते. म्हणून, चक्कर येणे आणि योग्य उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणें आणि आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.

चक्कर येणें म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही उभे राहता किंवा तुम्हाला शुद्धी गमावण्याआधीच चक्कर येणे किंवा संतुलन गमावण्याची जाणीव होते. तुम्हाला चक्कर येत असल्यास, तुम्ही एक ठिकाणी उभे राहिले, तेव्हाही हलत असल्यासारखे वाटू शकते.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹712  ₹799  10% OFF
BUY NOW

चक्कर (भोवळ) येणे ची लक्षणे - Symptoms of Dizziness in Marathi

चक्कर येणें एक अस्पष्ट लक्षण आहे. आपल्या डॉक्टरांना नेमके काय वाटत आहे ते सांगणे कठीण होऊ शकते. आपल्याला असे वाटू शकतेः

  • आपण झोपायला लागलेल्या स्थितीपासून उभ्या राहिल्याबरोबरच आपला तोल गमावत आहोत.
  • एक अस्थिर भावना ज्यामध्ये आपण उभे राहू शकत नाही.
  • आपण एक ठिकाणी उभे आहात, तेव्हाही हलत असल्यासारखे वाटत .
  • अशी भावना आहे की आपण कधीही बेशुद्ध व्हाल.

आपल्याला अशा लक्षणांचा अनुभव असल्यास आपण ताबडतोब आपल्या डॉक्टरांची सल्ला घ्यावी.

चक्कर (भोवळ) येणे चा उपचार - Treatment of Dizziness in Marathi

कोणत्याही औषधाशिवाय चक्कर येणे स्वतःस बरे होऊ शकते. चक्कर येणे जर एखाद्या मूलभूत स्थितीमुळे असेल तर रोगाचा उपचार केल्याने चक्कर येणे सुधारेल. पूर्ण तपासणी आणि चाचण्या झाल्यानंतर, आपल्या डॉक्टरांना विकाराचे कारण सापडल्यावर, उपचार सुरू केला जाईल ज्यामुळे त्यावर उपचार करण्यात मदत होईल. ते नंतर ही टिकल्यास, आपले डॉक्टर काही औषधे आणि व्यायाम लिहून देऊअ शकतात.

  • प्रवासाच्या आधी अर्धा तास आधी आपल्या डॉक्टरांकडे घेऊन मोशन सिकेनेसमुळे येणारे चक्कार टाळता येतात. अशा परिस्थितीत, अँटीहास्टामाइन्स सारख्या औषधे उपयुक्त ठरू शकतात.
  • कमी रक्त शर्करामुळे चक्कर येत असल्यास, रक्त शर्करा पातळी नियंत्रित करून उपचार केले जाऊ शकते. वारंवार अंतराळाने कमी व निरोगी आहार घेतल्यास, साखर पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करू शकतात.
  • माइग्रेनमुळे चक्कर आल्यास, आपला डॉक्टर आपल्याला मायग्रेन-विरोधी औषधोपचार देतील.
  • कमी रक्तदाबला रुग्णालयात भरती होणें व रक्तनलिकेच्या माध्यमातून द्रव्ये देणें आवश्यक आहे जे आपल्या रक्तदाबाला सामान्य करते आणि चक्कर येण्याची जाणीव कमी करते
  • तुम्ही मद्यपान करत असल्यास, डॉक्टर भरती होण्याचा आणि औषधोपचाराचा सल्ला देऊ शकतात जे मद्याच्या प्रभावाचा प्रतिकार करू शकतात.
  • रोगाचे उपचार करण्यासाठी आपला डॉक्टर आतील कानासाठी औषधे लिहून देऊ शकतात आणि आवश्यक असल्यास शस्त्रक्रियेचाही सल्ला देऊ शकतात.
  • जर एखाद्या औषधाच्या दुष्परिणामाची समस्या असेल, तर आपले डॉक्टर औषध कमी करू किंवा थांबवू शकतात.

जीवनशैली व्यवस्थापन

जीवनशैलीतील काही मूलभूत बदलांमुळे तुम्ही चक्कर येण्याला रोखू शकता:

  • निर्जलीकरण टाळण्यासाठी 3-4 लीटर पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.
  • मेनेयरसच्या आजारामुळे मिठावर निर्बंध उपयुक्त असू शकते. फळे, सलाद किंवा अन्न यावर मीठ शिंपडणें टाळा.
  • आपल्या डॉक्टरांद्वारे सल्ला दिल्याप्रमाणे इंसुलिन इंजेक्शनच्या वेळेचे पालन करा आणि हायस्कॉग्लेसेमिया बरे करण्यासाठी बिस्किटे, किंवा कॅंडीसारख्या ग्लूकोजचे स्रोत घ्या.
  • अतीप्रमाणात मद्यपान टाळा. पुरुषांसाठी दररोज 1-2 पेग आणि स्त्रियांसाठी एक पेग घ्यावे किंवा शक्य असल्यास पूर्णपणे थांबवावे.
  • शांत वातावरणास प्राधान्य द्या आणि जेव्हा तुम्हाला चक्कर येते तेव्हा अधिक आवाज व प्रकाश टाळा.
  • झोपतांना किंवा उठतांना अचानक स्थितीत बदल करणें टाळावे
  • बसून व आधार घेऊन चक्कर असल्यास, पडण्यापासून टाळावे.
  • पडण्यामुळे इजा टाळण्यासाठी नेहमी मदत मागून घ्या.
  • तुम्हाला चक्कर येत असल्यास वाहन आणि यंत्र चालवणें टाळा.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Energy & Power Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like physical and sexual weakness and fatigue, with good results.
Power Capsule For Men
₹495  ₹799  38% OFF
BUY NOW


संदर्भ

  1. Wipperman J. Dizziness and vertigo.. Prim Care. 2014 Mar;41(1):115-31. PMID: 24439886
  2. Jahn K, Langhagen T, Heinen F. Vertigo and dizziness in children.. Curr Opin Neurol. 2015 Feb;28(1):78-82. PMID: 25502049
  3. Merck Manual Consumer Version [Internet]. Kenilworth (NJ): Merck & Co. Inc.; c2018. Dizziness or Light-Headedness When Standing Up.
  4. Sloane, P. D. (2001). Dizziness: State of the Science. Annals of Internal Medicine, 134 (9_Part_2), 823.
  5. Herr, R. D., Zun, L., & Mathews, J. J. (1989). A directed approach to the dizzy patient. Annals of Emergency Medicine, 18(6), 664–672. PMID: 2729692
  6. National Institutes of Health; U.S. Department of Health & Human Services; National Institute on Deafness and Other Communication Disorders (NIDCD).
  7. Michael Strupp, Prof. Dr. med.1, Thomas Brandt. Diagnosis and Treatment of Vertigo and Dizziness. Dtsch Arztebl Int. 2008 Mar; 105(10): 173–180. PMID: 19629221
  8. Shannon J.R., Diedrich A., Biaggioni I., et al. (2002) . Water drinking as a treatment for orthostatic syndromes. . Am J Med.112(5):355-360. PMID: 11904109
  9. L M Luxon. Evaluatiom and management of dizzy patient. J Neurol Neurosurg Psychiatry 2004;75(Suppl IV):iv45–iv52.
  10. Radtke, A., Lempert, T., von Brevern, M. et al. Prevalence and complications of orthostatic dizziness in the general population. Clin Auton Res. 2011 Jun;21(3):161-8. PMID: 21279415

चक्कर येणे साठी औषधे

Medicines listed below are available for चक्कर येणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for चक्कर येणे

Number of tests are available for चक्कर येणे. We have listed commonly prescribed tests below: