कोरोनरी आर्टरी डिझीज (हृदय धमनी रोग) म्हणजे काय?
कोरोनरी हार्ट डिझीज हा एक असा आजार आहे ज्यात ह्रदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिझीज असेही म्हटले जाते आणि हा ह्रदय रोगा चा सर्वात सामान्य प्रकार आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कोरोनरी हार्ट डिझीज ची लक्षणे काही व्यक्तींमध्ये स्पष्टपणे दिसून येत नाहीत. रोगाच्या सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये हे शक्य आहे.
कोरोनरी हार्ट डिझीज ची सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे:
- छातीत वेदना (अँजीना).
- छातीत जडपणा.
- पोट आणि पाठीच्या वरच्या भागामध्ये जडपणा.
- धाप लागणे.
- थकवा.
याची मुख्य कारणे काय आहेत?
ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागामध्ये रक्त आणि ऑक्सिजन पुरवतात त्यांच्या कडांवर प्लेक जमा होणे आणि तयार होणे हे कोरोनरी हार्ट डिझीज चे मुख्य कारण आहे. प्लेक म्हणजे फॅटी पदार्थांचे डिपाॅझिशन ज्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित आणि कडक होतात. यात हृदयला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यावर परिणाम होत असल्यामुळे, हृदयातील रक्त प्रवाह कमी होतो आणि छातीत वेदना आणि धाप लागणे यासारखी लक्षणे दिसू लागतात.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
कोरोनरी हार्ट डिझीज चे उपचार करण्यासाठी, डाॅक्टर खालील चाचण्या करू शकतात:
- हृदय आणि फुफ्फुसांचे मूल्यांकन करण्यासाठी छातीचा एक्स-रे.
- शारीरिक व्यायामाच्या वेळी हृदयाची गती आणि क्रियाकलाप मोजण्यासाठी एक्सरसाईज स्ट्रेस टेस्ट.
- अल्ट्रासाऊंड चा वापर करून हृदयाचे चित्र मिळवण्यासाठी इकोकार्डियोग्राम.
- हृदयाची कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी कार्डियाक कॅथेटराइझेशन.
- आर्टरींमध्ये काही अडथळा आहे का याचे परीक्षण करण्यासाठी कोरोनरी ॲन्जिओग्राम.
कोरोनरी हार्ट डिझीज चा धोका कमी करण्यासाठी खालीलप्रमाणे काही घटके आहेत:
- जीवनशैलीत बदल जसे की कमी चरबी युक्त परंतु संतुलित आहारा चे सेवन करणे, सक्रिय जीवनशैली, धूम्रपान सोडणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे यामुळे हार्ट डिझीज कमी होण्यास खूप मदत होते.
- ज्यांना आधीच जास्त धोका आहे ते उच्च कॉलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि अनियमित हृदयास्पंदन यांसारख्या विकारांसाठी औषधे वापरून जोखीम कमी करू शकतात.
कोरोनरी हार्ट डिझीजच्या उपचारांमध्ये निरोगी जीवनशैलीसह लक्षणे नियंत्रित करण्यासाठी औषधे वापरणे यांचा समावेश आहे.
कोरोनरी हार्ट डिझीज वर उपचार करण्यासाठी काही प्रक्रिया आणि सर्जरी सुद्धा केल्या जाऊ शकतात:
- ॲन्जिओप्लास्टी (स्टेन्ट प्लेसमेंट).
- कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी.
- मिनिमली इन्व्हेन्सिव्ह हार्ट सर्जरी.