डोळे येणे म्हणजे काय?
डोळे येणे म्हणजे कॉनजेक्टाइव्हाचे सुजणे. ही डोळ्यांच्या पांढऱ्या भागावरील एक पातळ अस्तर असते आणि पापण्यांच्या आत असते. डोळे सहसा लहान मुलांचे येतात आणि संसर्गजन्य असल्यास पसरतात.
याचे मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहे?
डोळे येण्याचे लक्षणे खालीलप्रमाणे आहे:
- प्रभावित डोळ्याचा पांढरा भाग लालसर किंवा गुलाबी होणे.
- डोळ्यातून पाणी येणे.
- डोळ्यात जळजळ होणे आणि खाज सुटणे.
- खूप जास्त प्रमाणात म्युकस निघणे.
- कॉनजेक्टिवा आणि पापण्या सुजणे.
- डोळ्यात चुरचुर होणे.
- डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे जाणवणे.
- दृष्टीक्षेपात अडथळे निर्माण होणे.
- प्रकाशाची संवेदनशीलता.
- सकाळी उठल्यावर पापण्याचा केसांवर चिकट पदार्थ जमा होणे.
याचे मुख्य कारण काय आहे?
डोळे येण्याचे मुख्य कारण वातावरणातील संसर्ग, ॲलर्जी आणि त्रासदायक घटक आहे.
- संसर्ग सामान्यपणे स्टॅफिलोकोकस, क्लॅमिडीया आणि गॉनोकोकस ह्या जिवाणू आणि व्हायरसमुळे होतो. हा संसर्ग कीटकांद्वारे, संक्रमित लोकांशी शारीरिक संपर्क झाल्यावर आणि संक्रमित डोळ्यांचे सौंदर्यप्रसाधने वापरल्याने पसरतो.
- ॲलर्जी होण्याचे कारणं परागकणशी संपर्क, धुळीतले जिवाणू, प्राण्यांचे पंख किंवा केस, खूप काळापर्यंत न बदलता,कडक किंवा मऊ, कॉन्टॅक्ट लेंसचा वापरणे आहे.
- वातावरणातील सामान्यतः पाहिले जाणारे त्रासदायक घटक जसे प्रदूषण (धूर,धूके), पूल मधील क्लोरीन आणि विषारी रसायने आहेत.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
इतिहास, चिन्हे आणि लक्षणे आणि डोळ्याची तपासणी यावर आधारित, डॉक्टर (नेत्र रोगतज्ञ) डोळे आल्याचे निदान करण्यात सक्षम होतात. डोळे तपासताना दृष्टीक्षेपावरील परिणाम, कॉनजेक्टिवा , डोळ्याचे बाह्य ऊतक आणि डोळ्याच्या आतील रचना तपासतील. साधारणपणे हा आजार ४ आठवड्यापेक्षा कमी राहतो. दीर्घकालीन संसर्गाच्या बाबतीत किंवा उपचारांना चांगला प्रतिसाद न मिळाल्यास, स्वॉब( म्युकस किंवा डिस्चार्जचा सॅम्पल घेणे) ची तपासणी केली जाते.
डोळे येणे याचा उपचार कारणांवर अवलंबून असतो. जिवाणूंच्या संसर्गासाठी अँटीबायोटिक दिले जातात, पण व्हायरल संसर्गासाठी नाही. व्हायरल संसर्ग सहसा आपोआप बरे होतात. आरामासाठी थंड पट्ट्या आणि कृत्रिम अश्रूंचा वापर केला जातो.ॲलर्जीमुळे डोळे आल्यास , अँटीहिस्टामाइन आणि आय ड्रॉप्स दिले जातात. डोळे आल्यावर कॉन्टॅक्ट लेंसचा वापर टाळावा.
आपण आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांस संसर्ग होण्यापासून संरक्षित करू शकता:
- प्रभावित डोळा स्पर्श न करता.
- व्यवस्थित हात धुणे.
- रुमाल आणि सौंदर्यप्रसाधने शेअर करणे टाळा.