छातीत संसर्ग म्हणजे काय?
छातीत संसर्ग सामान्यतः श्वसनमार्गाच्या खालील भागाचा संसर्ग ज्यात फुफ्फुस आणि लघुश्वासनलिकावर प्रभाव पाडतो. या संसर्गामध्ये प्रामुख्याने ब्रॉन्कायटिस चा समाविष्ट असतो, ज्यामध्ये फुफ्फुसातील वातनलिकेवर सूज येते आणि निमोनिया ज्यामध्ये फुफ्फुसातील वायुकोनावर सूज येते. सर्व प्रकारच्या छातीत संसर्गामध्ये प्रामुख्याने सतत खोकला, सर्दी आणि ताप ही लक्षणे दिसून येतात. 2030 सालापर्यंत छातीत संसर्ग होणे हे जगातील सर्वांत सामान्य संसर्ग असल्याचा अंदाज आहे.
त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सतत येणारा खोकला हे छातीत संसर्गामध्ये दिसून येणारे सर्वात सामान्य लक्षण आहे, परंतु काही इतर चिन्हे आणि लक्षणे देखील दिसू शकतात जसे की:
- सतत ओला खोकला.
- हिरवा किंवा पिवळा म्यूकस (फ्लेगम).
- ब्रीथलेसनेस / श्वासोच्छवासास होणारा त्रास.
- ताप.
- खोकताना छातीत दुखणे किंवा अस्वस्थता.
- थकवा.
- स्नायू वेदना.
खोकला आणि श्वासोच्छवासास होणारा त्रास हा दम्याचा त्रास आहे असे काहींना वाटू शकते. छातीत संसर्गा चे लक्षणं दम्याच्या लक्षणांना अधिक खराब करु शकतात.
त्याचे मुख्य कारण काय आहेत?
छातीत संसर्ग अनेक कारणांमुळे होऊ शकते. लहान मुलांना, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना आणि गर्भवती महिलांना छातीत संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. ऑटोइंम्यून डिसऑर्डर आणि इंटरस्टिशियल फुफ्फुसांच्या आजारांसारख्या काही स्थितीमध्ये देखील छातीत संसर्गाचे पुनरुत्पादन होऊ शकते. छातीत संसर्गाचे सर्वसामान्य कारणे पाहुया:
- सतत होणारी सर्दी आणि फ्लू: यामुळे वातनलिकांमध्ये सूज आणि संसर्ग होऊ शकतो.
- प्रदूषित वायू आणि धूळ यांच्यात सतत संपर्कात: कोणत्याही प्रकारच्या प्रदूषण वातनलिकांच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात.
- सूक्ष्मजीवांमुळे संसर्ग: ब्रॉन्कायटिस सामान्यत: र्हायनोव्हायरस किंवा इन्फ्लूएंजा सारख्या व्हायरसमुळे होतो आणि काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये जीवाणूमुळेही होतो. निमोनिया हा सामान्यतः जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. तथापि, व्हायरस, मायकोप्लाझ्मा आणि बुरशी मुळेही निमोनिया होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
स्टेथोस्कोप वापरुन छाती ची तपासणी करून छातीत संसर्गाचे निदान करण्यास मदत होते. छातीचे परीक्षण करण्यासाठी खालील तपासण्या करायला सांगितल्या जाऊ शकतात जेणेकरून उपचारांची अंतिम आखणी केली जाऊ शकते:
- छातीचा एक्स-रे.
- थुंकीची चाचणी.
- पल्मनरी फंक्शनची स्पायरोमीटर वापरुन परीक्षण केले जाते.
- पल्स ऑक्सिमेट्री (रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी.
ब्रॉन्काइटिस तीव्र किंवा कधीकधी दीर्घकालीन असू शकतो. ब्रॉन्कायटिसचा सामान्यपणे खालील वापर करून उपचार केला जातो:
- नेबुलीझरचा वापर करून स्टेरॉईड्स घेता येतात.
- ओरल स्टेरॉइड्स.
- ओरल इंटरलेकिन इनहॅबीटर्स.
- ब्रोंकोडायलेटर्स.
निमोनियामुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांना अँटीबायोटिक्सच्या उच्च डोसचा वापर केला जाऊ शकतो जेणेकरून ते कारणीभूत जीवाणूंच्या विरोधात प्रभावी असतात. डॉक्टर सामान्यतः अँटीपीरेटिक्स (ताप-कमी उतरण्यास मदत करणारी औषधे) त्याचबरोबर निमोनियासाठी मॅक्रोलाइड किंवा बीटा-लॅक्टम अँटीबायोटिक्स सारखे औषधे सूचवू शकतात. याव्यतिरिक्त, दोन्ही प्रकारचे छातीत संसर्गासाठी, खालील स्व-देखभाल उपायांचा सल्ला दिला जातो:
- भरपूर पाणी प्या.
- विश्रांती घ्या.
- धूम्रपान टाळा.
- नेसल डिकॉन्गेंस्टंट चा वापर.
काही लक्षणे तीव्र असू शकतात किंवा ऑक्सिजनच्या आधाराची आवश्यकता असू शकते, छातीत संसर्गाचा सामान्यतः लवकर तपास करून आणि वेळेवर उपचाराने नियंत्रित केला जाऊ शकतो.