शँक्रॉइड काय आहे?

शँक्रॉइड हा एक अत्यंत गंभीर संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे जननेंद्रियात फोड (अल्सर) होतो. हेमोफिलस ड्युक्रेयी ह्या जिवाणूमुळे शँक्रॉइडसाठी होतो. हे लैंगिक किंवा अलैंगिक संपर्कांद्वारे प्रसारित होऊ शकते. सुंता केलेले पुरुष आणि स्त्रियांच्या तुलनेत सुंता न केलेल्या पुरुष आणि स्त्रीयांमध्ये हे अधिक सामान्य आहे आणि सेक्स वर्कर्समध्ये आणि विकसनशील देशांमध्ये अधिक पाहिले जाते. ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही-HIV) च्या प्रसरणासाठी शँक्रॉइड हा एक जोखीम घटक आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

शँक्रॉइडची लक्षण चार दिवसांत दिसत असली तरी क्वचितच, जिवाणूंचा संपर्क तीन दिवसांपेक्षा कमी असला तरी लक्षात येतात. संसर्ग झालेल्या जागेवर पस ने भरलेली लाल गुठळी बघितली जाऊ शकते. ही जननेंद्रियात किंवा गुदाजवळ असू शकते. मग गुठळी उघड्या जखमेमध्ये रूपांतरित होते ज्याचे कोपरे बोचक असतात आणि अल्सर मऊ असतो. अल्सर बहुतेकदा स्त्रियांमध्ये असंवेदनशील असतो पण पुरुषांमध्ये अत्यंत वेदनादायी असू शकतो. कमरेच्या भोवती असलेल्या लिम्फ नोड्समध्ये पुरुषांना वेदना आणि सूज देखील होते.हे सामान्यतः एका बाजूला होते परंतु दोन्ही बाजूंना देखील होऊ शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

शँक्रॉइड खालील कारणांमुळे होतो:

  • शँक्रॉइडच्या उघडया जखमे सोबत थेट संपर्क.
  • शँक्रॉइडमध्ये असलेल्या पसाचा थेट संपर्क.
  • व्यावसायिक सेक्स वर्कर्स सारख्या उच्च-जोखीम असलेल्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध.
  • एकापेक्षा अधिक भागीदारांसोबत शारीरिक संबंध.
  • शँक्रॉइड असलेल्या व्यक्तीसोबत योनी, गुदा किंवा तोंडावाटे सेक्स केल्याने.

याचे उपचार आणि निदान कसे केले जातात?

शँक्रॉइडचे निदान सामान्यतः अल्सर असलेल्या क्षेत्राचे आणि रक्ताचे नमुने तपासून केले जाते. संकलित नमुने शँक्रॉइडच्या जिवाणूंची उपस्थिती पहायलासाठी तपासली जातात. क्लिनिकल निदानामध्ये समाविष्ट असलेले अचूक पाऊल पुढील प्रमाणे आहेत :

  • जननेंद्रिय अल्सरची उपस्थिती तपासण्यासाठी शारीरिक चाचणी.
  • लिम्फ नोड्समधे सूज, जे सामान्यतः शँक्रॉइडमधे आढळते.
  • सिफलीस ची अनुपस्थिती.
  • हर्पिस सिंपलेक्स व्हायरस पॉलिमरेस चेन रिएक्शन (एचएसव्ही पीसीआर -HSV PCR) चाचणी नकारात्मक असणे.

यशस्वी उपचार, लक्षणे दूर करते आणि रोगाचा प्रसार प्रतिबंधित करते. उपचारांमध्ये अँटीबायोटिक थेरपी समाविष्ट आहे, जी संसर्ग पूर्णपणे नाहीसे करते. डॉक्टरांनी दिलेला उपचारांचा कोर्स पूर्ण करा. आपल्या साथीदारास देखील उपचारांची आवश्यकता असू शकते. संपूर्ण उपचार आणि अल्सर बरा होण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा असू शकतो आणि तो अल्सरच्या आकारावर अवलंबून असतो. सुंता न केलेल्या किंवा एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्ह पुरुषांपेक्षा सुंता केलेल्या किंवा एचआयव्ही (HIV) निगेटीव्ह पुरुषांमध्ये या उपचाराचा चांगला परिणाम दिसून येतो.

Read more...
Read on app