सारांश
मेंदूची गाठ म्हणजे मेंदूच्या पेशींची असामान्य वाढ. या गाठी हानीरहित (सौम्य) किंवा कर्करोगास कारणीभूत (घातक) होऊ शकतात. मेंदूच्या आत ज्या गाठी बनतात त्यांना प्राथमिक मेंदूची गाठ म्हटले जाते. दुस-या प्रकारची गाठ किंवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर, जे शरीराच्या इतर भागामध्ये कर्करोग होऊन मेंदूच्या भागाकडे सरकल्याने होतो. मेंदूतील गाठीची लक्षणे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात उदा. गाठीचा आकार, गाठीच्या वाढीची गती आणि गाठ असलेले स्थान. मेंदूतील गाठीच्या काही प्रारंभिक आणि सामान्य लक्षणांमध्ये डोकेदुखीचे बदलते व्यवहार, वारंवार आणि तीव्र डोकेदुखी, बोलण्यातील समस्या आणि शरीराचा संतुलन राखण्यात अडचण यांचा समावेश होतो. गाठीवरील उपचार गाठीचा प्रकार , आकार व स्थान यांवर अवलंबून असतात.