मेंदूच्या रक्तवाहिनीची अवाजवी वाढ काय आहे?
मेंदूच्या रक्तवाहिनीची अवाजवी वाढ ही अशी परिस्तिथी आहे ज्यामध्ये मेंदूतील कमकुवत क्षेत्रात धमन्यांच्या भिंतींजवळ सूज किंवा फुगवटा निर्माण होतो. हृदयातून शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्त पोहोचवणार्या नलिकांना धमनी म्हणतात .मेंदूच्या रक्तवाहिनीची अवाजवी वाढ मेंदूत कुठेही होऊ शकत असली तरी विशेषतः त्या क्षेत्रामधे होण्याची शक्यता जास्त असते जिथे रक्त वाहिन्यांचे विभाजन होते. ब्लेब किंवा गळू ज्यात रक्त असते,फाटल्यामुळे रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्रावाचे शरीरावर घातक परिणाम होतात आणि त्यामुळे मृत्यु देखील होऊ शकतो.
भारतात,मेंदूच्या रक्तवाहिनीची अवाजवी वाढ किंवा सेरेब्रल एन्युरीझम सामान्यत: 35 ते 60 वर्षांच्या लोकांमध्ये आढळते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मेंदूच्या आघात न पोहोचलेल्या रक्तवाहिनीची अवाजवी वाढ तेव्हा दिसते, जेव्हा ती मोठ्या होतात आणि मेंदूच्या शेजारील नसा किंवा उतींना दाबू लागते. याची लक्षण पुढील प्रमाणे आहेत:
- दुहेरी दृष्टी किंवा दृष्टी नष्ट होणे.
- डोळ्यात वेदना होणे.
- डोके दुखी.
- चेहऱ्याच्या वेदना.
- अशक्तपणा.
- सुन्नपणा.
- बोलताना किंवा लक्ष केंद्रित करताना अडचण येणे.
- तोल न सांभाळता येणे.
बऱ्याचदा रक्तस्राव होईपर्यंत कोणतेही लक्षण दिसत नाही. अशावेळेस रक्तवाहिन्यांतून थोड्या प्रमाणात रक्ताची निघते आणि त्यामुळे डोकेदुखी होते.
अवाजवी वाढ होऊन फुटलेल्या रक्तवाहिन्यांमधील उद्भवणारी लक्षणं खालील प्रमाणे आहेत:
- तीव्र डोकेदुखी.
- मानेत कडकपणा जाणवणे.
- मळमळ आणि उलटी होणे.
- प्रकाश संवेदनशीलता.
- शुद्ध हरपणे.
- गोंधळ.
- फिट्स.
- शरीराच्या एका बाजूला पक्षघात होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
धमनीच्या भिंतीतील क्षेत्राचा अशक्तपणा हा स्नायूंच्या थराचा अभाव किंवा नुकसान झाल्यामुळे होतो. कारण अद्याप स्पष्ट नसले तरी जोखीमपूर्ण घटक खालील प्रमाणे आहेत:
- 40 वर्षाच्या वरचे वय.
- मेंदूच्या रक्तवाहिनीची अवाजवी वाढीचा कौटुंबिक इतिहास.
- धूम्रपान.
- उच्च रक्त दाब.
- जन्म झाल्यापासून कमकुवत धमन्यांची भिंत.
- किडनीचे रोग,एकाधिक सिस्ट्स.
- हृदयातील छिद्र (जन्मजात हृदय रोग).
- औषधांचा दुरुपयोग.
- मेंदूला दुखापत.
- धमनीच्या भिंतीचा संसर्ग.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
आपल्याला समजणारे पहिले लक्षण म्हणजे अचानक आणि असह्य डोकेदुखी आहे ज्याच्या उपचारासाठी डॉक्टर वैद्यकीय इतिहासाची आणि शारीरिक तपासणी करतात. रप्चर न झालेले एन्युरिझम आणि मेंदूतील रक्ताचा गळती निश्चित करण्यासाठी, एमआरआय आणि सीटी सारख्या इमेजिंग चाचण्या डॉक्टर सुचवू शकतात. लक्षणे असलेल्या रप्चर झालेल्या एन्युरिझम चे सीटी स्कॅनवर नकारात्मक परिणाम आल्यास, लंबर पँचर (जेथे सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा नमुना गोळा केला जातो आणि रक्त तपासले जाते) केले जाते. रक्तवाहिन्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी डिजिटल सबस्ट्रॅक्शन अँजियोग्राफी (डीएसए-DSA) देखील केली जाते.
मेंदूच्या रक्तवाहिणीची अवाजवी वाढ चा आकार, स्थान, लक्षणे आणि तीव्रतेनुसार उपचार वेगवेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीसाठी औषधं आवश्यक नाही. रप्चर ची जोखीम कमी असल्यास, नियमित तपासणी करून व्यक्तीचे काळजीपूर्वक परीक्षण केले जाते. रप्चरची शक्यता कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदल जसे धूम्रपान सोडणे किंवा उच्च रक्तदाबाचा उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. अनरप्चर्ड ब्लेबसाठी सामान्यत: औषधं दिली जातात. शस्त्रक्रिया रप्चर झालेल्या अवाजवी वाढ झालेल्या रक्तवाहिनीचे आणि रप्चरपासून बचाव करण्यास मदत करते. शस्त्रक्रियेमध्ये वाढलेल्या रक्तवाहिन्यांमधे स्प्रिंगसारखी जाळी बसवली जाते ज्यामुळे त्याचे रप्चर टाळता येते किंवा उष्णतेची उर्जा वापरता येते आणि वाढलेल्या रक्तवाहिन्या काढून टाकून आसपासच्या रक्तवाहिन्यां जोडल्या जातात.