ब्रॅडिकार्डिया (हृदयमंदता) काय आहे?
ब्रॅडिकार्डिया किंवा हृदयमंदता अशी परिस्तिथी आहे जिथे एका व्यक्तीचे हृदय प्रति मिनिटाला 60 पेक्षा कमी ठोके देते. एका स्वस्थ व्यक्ती मधे हृदयाचा दर 60-100 च्या दरम्यान असतो.सामान्यतः ॲथलीट्स आणि वृद्ध लोकांमध्ये कमी ह्रदय दर दिसतो. काही तरुण आणि निरोगी व्यक्तींमध्ये ब्रॅडिकार्डिया (हृदयमंदता) देखील दिसू शकतो शकतो. हे तोपर्यंत सामान्य असतो जोपर्यंत इतर काही लक्षणे अनुभवत नाही.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ब्रॅडकार्डियाशी संबंधित सामान्यपणे दिसणारी चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- अशक्तपणा.
- थकवा.
- भोवळ येणे.
- मळमळ.
- घाम येणे.
- गोंधळ.
- श्वासनास त्रास होणे.
- कमी रक्तदाब.
- सौम्य ते तीव्र छातीत वेदना.
कधीकधी आपण कोणतेही लक्षणं अनुभवत नाही.
याची मुख्य कारणं काय आहेत?
ब्रॅडिकार्डिया (हृदयमंदता) होण्याची मुख्यतः दोन कारणं आहेत. ते आहे:
-
आंतरिक कारणे (म्हणजे, अंतर्गत घटकांमुळे):
- वाढलेलं वय.
- हृदय विकाराचा झटका.
- ऑटोइम्यून रोग (जेव्हा प्रतिरक्षा प्रणाली स्वस्थ ऊतींवर हल्ला करते)उदाहरणार्थ सिस्टमँटीक लुपस, रु्हुमेटोईड आर्थराईटीसआणि स्क्लेरोडर्मा इत्यादी.
- मस्क्युलर डिस्ट्रॉफी (वाया घालवणे).
- हृदयाचे संक्रमण.
- हृदयाच्या शस्त्रक्रिया.
- स्लिप ॲप्नीया (झोपतांना श्वास घेण्यास त्रास होणे).
- आनुवांशिकता.
- सायनोॲट्रियल नोड( हृदयाच्या नियमित लयीसाठी जबाबदार नर्व्ह फायबर)डिसफंक्शन.
-
बाह्य कारणे (म्हणजे,बाह्य घटकांमुळे)
- खोकला.
- उलट्या.
- लघवी करणे.
- मल जाणे.
- बीटा ब्लॉकर्स, कॅल्शियम चॅनेल अवरोधक (दोन्ही उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी) आणि अँटी-अरिदमिक औषधे (मोठ्याने, अनियमित आणि वेगवान हृदय दरासाठी) सारखी औषधे.
- हायपोथायरॉईडीझम (शरीरात थायरॉईड संप्रेरक ची पातळी कमी होणे).
- कमी झालेले शरीराचे तापमान (हायपोथॅर्मीया).
- मेंदूला दुखापत,मेरुदंडाला किंवा नसांना दुखापत.
- पोटॅशियमच्या पातळीमध्ये असंतुलन.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तुमचे डॉक्टर तुमची वैद्यकीय परिस्थिति आणि घेत असलेल्या औषधांचा तपशीलवार इतिहास घेईल आणि ज्यांचा ह्रदयाचा दर कमी असेल अशा लोकांमध्ये शारीरिक तपासणी केली जाईल.ब्रॅडिकार्डियाची (हृदयमंदता) पुष्टी करण्यासाठी, डॉक्टर इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) नावाची एक विशेष तपासणी करतील, ज्यामुळे हृदयाच्या लयीमध्ये असामान्यता आढळेल.इतर चाचण्या केल्या जाऊ शकतात, उदा., रक्त तपासणी (हायपोथायरॉईडीझम किंवा इलेक्ट्रोलाइट असंतुलन शोधणे), स्लीप ॲप्निआ साठी चाचणी, इलेक्ट्रोफिजियोलॉजी चाचणी (अनियमित हृदयाचा ठोक्याचे अचूक कारण जाणून घेणे) आणि तणाव चाचणी (कामामधे किंवा तणावामधे हृदयाच्या प्रतिसादाचा शोध घेणे)
आपल्याला पूर्वी कोणतीही लक्षणे दिसली नाहीत तरीही ब्रॅडिकार्डिया नियमित तपासणी दरम्यान ओळखला जाऊ शकतो.
सामान्यतः कोणत्याही संबंधित लक्षणांशिवाय त्यांना उपचार दिले जात नाहीत. ब्रॅडिकार्डियाची लक्षणे कारणांनुसार बदलत असतात. जर कमी हृदयाचा दर एखाद्या विशिष्ट औषधामुळे झाला असेल तर त्याचा डोज कमी केला जातो किंवा पूर्णपणे थांबविला जातो. सायनस नोड डिसफंक्शनच्या बाबतीत, हृदयाचा ठोका सामान्य करण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो.