बींज इटिंग डिसॉर्डर (सतत खाण्याचा आजार) म्हणजे काय?
बींज इटिंग डिसॉर्डर (सतत खाण्याचा आजार) हा काहीसा दुर्लक्षित परंतु गंभीर विकार आहे, ज्याचे वरचेवर अनियंत्रित भूक लागणे आणि त्यानंतर अपराधीपणासारखी मानसिक प्रतिक्रिया देणे असे स्वरूप असते.
हा विकार तरुणांमध्ये सर्वात सहज आढळणाऱ्या विकारांपैकी एक आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहे?
हा विकार जडलेली व्यक्ती कमी कालावधीत सर्वसाधारण प्रमाणापेक्षा जास्त अन्नाचे सेवन करते. त्यानंतर ते आपल्या या कृतीसाठी सामान्यत: तणावग्रस्त, अपराधी भावनेने ग्रस्त किंवा स्वत:वर रागावलेले असतात.
याची इतर लक्षणे अशी आहेत:
- व्यक्ती अस्वस्थ होईपर्यंत खातो.
- बकाबका खाणे.
- लाज वाटत असल्याने इतरांसोबत खाण्याचे टाळणे तसेच आपल्या खाण्याबद्दल गुप्तता पाळणे.
- तणाव, चिंता किंवा राग आला असताना खाणे आणि अतिरिक्त खाल्ल्यानंतर अपराधी वाटणे.
पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा विकार जास्त आढळतो तसेच इतर वयोगटापेक्षा विशीतील आणि तिशीतील लोकांना जास्त प्रभावित करतो.
याची मुख्य कारणे काय आहेत?
अतिरिक्त खाणे (बींज इटिंग) हे वर्तणूक आणि मानसिक घटकांवर अवलंबून असल्याने निश्चित कारणे सांगता येत नाहीत परंतु जोखीमेचे घटक ओळखता येतात.
- लठ्ठपणा चा अतिरिक्त खाण्याशी (बींज इटिंग) घनिष्ट संबंध आहे कारण बींज इटिंग डिसॉर्डर (सतत खाण्याचा आजार) असलेले जवळजवळ 30% लोकं लठ्ठ असतात. वजनाची समस्या हे एक कारण असू शकते तसेच या विकारातील गुंतागुंतीमुळे हे चक्र निर्माण होते.
- आनुवंशिक जडणघडण: संशोधकांनुसार मेंदुतील डोपामाइनच्या हाय लेव्हलमुळे लोकं जास्त खातात. याचे कारण डोपामाइनची संवेदनशीलता असून खाल्ल्याने असे लोकं जिंकल्याची व आनंदाची भावना अनुभवतात.
मानसिक घटक जसे की तणाव, नैराश्य, एकटेपणा, स्वाभिमानाशी निगडीत समस्यांमुळे व्यक्ती चांगले वाटावे म्हणून खाण्याकडे वळते. म्हणून ते या विकाराला प्रभावित करणारे मुख्य कारणं म्हटले जाऊ शकतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
बीईडी चे निदान प्राथमिकतः बाधित व्यक्तीने हा त्रास असल्याचे मान्य करण्यावर अवलंबून आहे.
- एका व्यक्तीची वागणूक आणि गैरसोयीच्या परिस्थितीत त्यांची प्रतिक्रिया तपासून, तज्ञ डिसऑर्डर चे निदान करु शकतात.
- शिवाय खाण्यापिण्याच्या सवयी, जेवणाच्या वेळा आणि वजन सुद्धा निदानात मदत करतात.
याचा उपचार सायकोलॉजिटल थेरपी, काउन्सेलिंग, वजन कमी करायला व्यायाम आणि औषधे यात समन्वय साधून होतो
- कॉग्निटिव्ह बिहेव्हियर थेरपीचा उपयोग करुन तज्ञ बींज इटिंग मागील कारण शोधू शकतात. असे करुन ते तणाव, चिंता आणि रागाचे कारण शोधले जाऊ शकतात.
- एका विशिष्ट परिस्थिती मुळे खाण्याची इच्छा होत असल्यास काउन्सेलिंग सेशन्स घेऊन त्याचे निवारण केले जाऊ शकते.
- वजन कमी करुन स्वाभिमान आणि आपल्या शारीरिक इमेजच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात.
- मानसिक आरोग्य सुधारायला वरील थेरपी सोबत अँटडिप्रेसंट्सचा उपयोग केल्याने मानसिक आरोग्य छान राहते.
- एका ठराविक वेळेस डॉक्टरने सुचवलेले खाऊन सुद्धा मानसिक आजार ठीक होऊ शकतो.