बेंबीत संसर्ग म्हणजे काय?
बेंबीत संसर्ग हा एक असा संसर्ग आहे जो सामान्यतः स्वच्छता न बाळगल्याने बेंबीत बॅक्टरीया किंवा बुरशीची वाढ झाल्यामुळे होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बेंबीत संसर्गाची लक्षणे खालील प्रमाणे असू शकतात:
- संक्रमित क्षेत्रातून डिस्चार्ज होणे.
- बेंबीच्या भोवती चट्टे येणे आणि लाल होणे.
- खाज सुटणे.
- बेंबीच्या त्वचेचे थर निघणे.
- बेंबीची त्वचा खराब झाल्यासारखी दिसणे.
- घाण वास येणे.
- बेंबीत गाठी होणे.
- बेंबीत दुखणे.
- बेंबीत हुळहुळ वाटणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
बेंबीत संसर्ग बेंबीत बॅक्टरीया किंवा बुरशीची वाढ झाल्यामुळे होतो. स्वच्छता न बाळगल्याने बॅक्टरीया किंवा बुरशीची वाढ जलद गतीने होते ज्यामुळे संसर्ग होतो. हा संसर्ग सामान्यपणे बेंबी टोचल्याने अथवा त्यावर काही खुली इजा झाल्याने होतो. विशेषतः, बेंबी टोचल्यावर होणारी जखम उघडी असल्यामुळे त्यामुळे बेंबीत संसर्ग होण्याचा धोका असतो.
मधुमेहाच्या रुग्णांना देखील बेंबीत संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो कारण रक्तात शुगर लेव्हल वाढल्याने बुरशी आणि बॅक्टरीयाची वाढ होते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
बेंबीत संसर्गाचे निदान करण्यासाठी डॉक्टर पहिले शरीराची पूर्ण तपासणी करतात. पण, कारणांच्या विस्तृत परिक्षणासाठी डॉक्टर संक्रमित क्षेत्राच्या भोवतालच्या त्वचेचा किंवा डिस्चार्जचा नमुना घेऊ शकतात. त्याचे परिक्षण करुन संसर्गाची पुष्टी केली जाते. डॉक्टर आहारात कमी शुगर असलेले अन्न आणि असेच आणखी बदल करण्याचा सल्ला देखील देतात. यामुळे उपचारात मदत होते. शिवाय संक्रमित क्षेत्र नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवल्याने उपचारात साहाय्य मिळते.
जे मधुमेहाचे रुग्ण आहेत,त्यांना रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे ज्याने संक्रमण कमी होते आणि भविष्यात त्याची पुनरावृत्ती टाळली जाते.