बार्टोनेलोसिस म्हणजे काय?

बार्टोनेलोसिस बार्टोनेला  प्रजातींमुळे होणारे काही जैविक संसर्ग आहेत. जगात, दर 1,00,000 प्रौढ लोकांमध्ये 6.4 तर 5-9 वर्षे वयोगटातील दर 1,00,000 मुलांमध्ये 9.4 प्रकरणांचीची नोंद झाली आहे. हा संसर्ग सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो. परंतु वय वर्षे 21 पेक्षा लहान असलेल्या व्यक्तींना याचा वारंवार त्रास होतो.

    याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

हा रोग स्वनियंत्रित आहे आणि लीम्फ नोड्सला सूज येणे व त्यानंतर ताप किंवा थकवा येणे ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. लक्षणे नेहमीच दिसतीलच असे नाही. ज्या व्यक्तीची रोग प्रतिकारकशक्ती कमी आहे त्याला हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

कॅट स्क्रॅच रोग:

  • काही दिवस अथवा आठवडे लक्षणे दिसणार नाहीत.
  • संसर्ग झालेल्या त्वचेवर लाल डाग दिसू शकतो आणि एक्स्पोझरनंतर तो वाढू शकतो.
  • न दुखणारा, खाज न येणारा पप्युल तयार होतो, जो दुर्लक्षित राहतो किंवा जखम मानल्या जातो.
  • इतर लक्षणांमध्ये स्नायू दुखणे, कणकण (मलेज), थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.
  • खूप कमी वेळा घसादुखी, भूक कमी होणे आणि वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात.

कॅरियन रोग:

  • या रोगाच्या दोन अवस्था आहेत: सडन अक्यूट अवस्था (ओरोया ताप) आणि क्रोनिक बेनाईन अवस्था (व्हेरुगा परूआना).
  • अचानक ताप येणे, हुडहुडी भरणे, अशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, अतिरिक्त घाम आणि निस्तेज त्वचा असेल तर ओरोया ताप अवस्था असते.
  • उपचार न झालेल्या व्यक्तींमध्ये व्हेरुगा परूआना आढळतो. त्वचेवर लहानशी लालसर जांभळी जखम दिसते जी नंतर गाठ बनते (नोड्यूलर होते.). तिथे रक्तस्त्राव होऊ शकतो, अल्सर किंवा फोड होऊ शकतो.

ट्रेन्च ताप:

  • एक्स्पोजरनंतर काही दिवसांनी किंवा अगदी 5 आठवडे लक्षणे दिसतात.
  • अचानक ताप येणे, डोकेदुखी, चक्कर येणे, हुडहुडी भरणे, अशक्तपणा तसेच पाय आणि पाठ दुखणे ही लक्षणे दिसतात.
  • तात्पुरत्या स्वरूपाचे त्वचेवरील पुरळ, तसेच प्लीहा किंवा यकृत प्रसरण पावलेले (आकार वाढलेला) आढळून येते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

बार्टोनेलोसिस हा बार्टोनेला प्रजातीच्या सूक्ष्मजंतूच्या संसर्गामुळे होतो.

कॅट स्क्रॅच रोग हा बार्टोनेला हेन्सलाइ मुळे होतो.

  • हा प्रामुख्याने मांजराने चाटणे, ओरबाडणे किंवा चावा घेण्याने होतो.
  • मांजरांच्या फ्लीजमुळे हा संसर्ग माणसांमध्ये पसरतो.
  • मोठ्या मांजरांपेक्षा मांजरीच्या पिल्लांकडून संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते जे सामान्यत: लक्षणं न दाखवणारे असतात.

कॅरियन रोग हा बार्टोनेला बसिलीफॉर्मिस मुळे होतो.

  • हा जीवाणू सँड फ्लायच्या चावण्याने पसरतो आणि रक्तप्रवाहात लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागास चिकटतो.
  • याची रचना मलेरियाच्या संसर्गा सारखीच असते आणि यापासून हिमोलीटिक ॲनिमिया होतो.

ट्रेन्च ताप हा बार्टोनेला क्विन्टानामुळे होतो.

  • हा जीवाणू मानवी शरीरात शरीराच्या लाऊसद्वारे पसरतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

एक्पोजरचा इतिहास तसेच निश्चित चिन्ह आणि लक्षणांच्या आधारे प्राथमिक निदान करता येते. निदानासाठी खालील चाचण्या केल्या जातात:

  • बॅक्टेरियल सेरोलोजी टेस्ट याचे पुष्टीकरण करणारी चाचणी आहे. आयजीएम आणि आयजीजी अँटीबॉडीजसाठी सामान्यतः इम्यूनोफ्लूरेसेंट अँटीबॉडी (आयएफए) चाचणी करण्यात येते.
  • बार्टोनेला संसर्गाची चाचणी घेण्यासाठी पॉलिमरेझ चेन रिॲक्शन (पीसीआर) वापरली जाऊ शकते. डीएनए सिक्वेन्सिंग नी याची पुष्टी केली जाऊ शकते.
  • वेस्टर्न ब्लोट टेस्टने सुद्धा निदान उत्तमरीत्या निश्चित करता येते.
  • कल्चर टेस्ट शक्य आहे, परंतु प्रयोगशाळेत जीवाणू वाढायला वेळ लागतो आणि ठराविक माध्यमांत ते असंवेदनशील असतात.

उपचार पद्धती:

  • कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये उपचारासाठी अँटीबायोटिक्स चा मुख्यत्वेकरून वापर केला जातो.
  • कॅट स्क्रॅच रोग आपणहून बरा होतो. वेदनेपासून आराम देणारी औषधे दिली जाऊ शकतात आणि लीम्फ नोड्स झालेल्या त्वचेला घरघुती गरम शेक दिला जाऊ शकतो.
  • कॅट स्क्रॅच रोगामध्ये इंसेफलायटीस सारखे कॉम्प्लिकेशन पूर्णपणे आणि स्वाभाविकपणे बरी होऊ शकते.

प्रतिबंधात्मक आणि स्वत:ची काळजी घेण्यासाठी करायचा गोष्टी:

  • भटक्या मांजरींकडून ओरखडले जाणे टाळावे. पाळीव मांजरांना घरातच ठेवावे.
  • मांजरींना हाताळल्यानंतर हात निट धुवावे.
  • पूर्ण बाहीचे कपडे घालावे.
  • फ्लीज आणि लाईससाठी प्रतिबंधात्मक औषध (रिपेलन्ट) वापरा.
Read more...
Read on app