सारांश
डॉक्टरांना भेट द्यायला लावणारा पाठदुखी हा एक सर्वसामान्य शारीरिक आजार आहे. कामावरून रजा घेण्या मागेसुद्धा हे एक महत्वाचे कारण असते. पाठदुखी तीव्र ( काही दिवस किंवा आठवडे असणारी) किंवा दीर्घकालीन ( ३ महिने किंवा अधिक वेळ टिकणारी) असू शकते. पाठदुखीच्या जागेवरून, दुखणे सौम्य किंवा तीव्र, वाढते आणि अधून-मधून किंवा अविरत आहे,यावरून त्याचे प्रकार ठरतात. पाय किंवा मांडीला बधिरता येणे आणि/किंवा झिणझिण्या येणे, हालचालींवर मर्यादा येणे,स्नायूंना ताठरपणा येणे, किंवा लघवी आणि शौचक्रियेवर नियंत्रण न राहणे,या सर्वांसोबतच वेदना असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. खालच्या भागातील पाठदुखीची कारणे सामान्यतः स्नायू तीव्रतेने अचानक अकुंचित होणे, जखम, पाठीच्या मणक्याच्या चकतीचे सरकणे किंवा हर्नियेट होणे, कणाला भेगा पडणे, सायटिका किंवा मज्जातंतूंच्या मुळाचे अकुंचन, वयामुळे होणारे हाडांचे आजार, ऑस्टीओपोरोसीस, स्वयंरोग प्रतिकारशक्तीचे विकार (एन्कीलुजिंग स्पोंडीलाईटीस), कणाचा स्टेनोसीस, कणाचे विकार आणि, कर्करोग ही आहेत. अधूनमधून, मानसिक तणावसुद्धा पाठदुखीला कारणीभूत ठरतो, जो वारंवार दुर्लक्षिला जातो. खालच्या पाठीचे दुखणे कधी कधी संदर्भित वेदना म्हणूनही गणल्या जातात ज्या वेदनेचा उगम मूत्रपिंड (उदाहरणार्थ: रेनल कॅलक्युलस, ट्युमर), गर्भाशय (उदाहरणार्थ : फायब्रोईड, मासिक पाळीच्या वेदना, आणि संतती) इथे असतो. कुठल्याही मूळभूत कारणांशिवाय असलेली तीव्र पाठीदुखी आराम आणि औषधोपचारांनी बऱ्या होतात. तीव्र वेदनेसोबत अचानकपणे हालचाली करायला कठीण जात असल्यास, खासकरून मणक्याच्या चकतीला भेगा जाण्याने किंवा सरकल्याने, शस्त्रक्रियेची तात्काळ गरज भासते,ज्यानंतर पारंपारिक उपचार केले जातात. दीर्घकालीन पाठदुखीला दीर्घकालीन व्यवस्थापन लागते ज्यात औषधोपचार, फिजिओथेरपी आणि, विशिष्ट व्यायाम सामील आहेत.