सारांश

स्वमग्नता मेंदूच्या सुरुवातीच्या काळातील विकासाच्या समस्यांशी संबंधित आहे.सामान्यत:,सामाजिक परस्पर संवादातील अडचणीसह या स्थितीत वर्तनात्मक बदल दिसतात. लक्षणांमध्ये निकृष्ट सामाजिक कौशल्य असणे, एकच एक गोष्ट पुनः पुनः करणे,समजण्यास आणि भावना व्यक्त करण्यास सक्षम नसणे आणि निकृष्ट संप्रेषणकौशल्य यांचा समावेश होतो. वेगवेगळ्या स्तरांमुळे आणि भिन्न लक्षणांमुळे, यांत समाविष्ट अवस्थांची व्याख्या करण्यासाठी'स्वमग्नता वर्णक्रम'हा शब्द आता वापरला जातो. बालपणाच्या सुरुवातीच्या चरणांवर प्रारंभ होण्याने, मुलांची समाजात संवाद साधण्याची आणि इतर मुलांसोबतमिसळण्याची क्षमता स्वमग्नतेमुळे प्रभावित होते.इतरांमध्ये मिसळण्यात त्रास/संकोच होण्याच्या लक्षणाचे लवकर निदान आणि पडताळणी झाल्यास, ते ओळखून आणि त्यावर उपाय करून योग्यप्रतीकार व्यवस्था तयार करायला मदत होते, ज्यामुळे मुलांना स्वतःचे संगोपन स्वतः करण्यासाठी सक्षम करता येते.

Autism Treatment

स्वमग्नता कमी करण्यासाठी कोणतेही उपचार नाहीत. सर्व उपलब्ध उपचार पद्धतींचे उद्दीष्ट दुर्बलता कमी करणे आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि क्षमता वाढवणे हे आहे. उपचार बहुतेकदा सानुकूलित केले जातात आणि  अपस्मार व अतीचंचलता या सारख्या विशिष्ट लक्षणांसोबत स्वमग्नता असल्यास वापरले जातात.

स्वमग्नता वर्णमालेतील प्रत्येक व्यक्ती व तीच्या गरजाभिन्न असल्याने, त्यांच्यासाठी संरचीत केलेले उपक्रम व्यक्तीसापेक्षआहेत आणि परिभाषित संरचना असणे आवश्यक आहे. स्वमग्नता वर्णमालेतील बहुतेक व्यक्ती एकाग्रता न्यूनता व अतीचंचलता विकृती (एडीएचडी) सारख्या इतर विकारांची देखील चिन्हे दर्शवितात.

असे आढळून आले आहे की जलद उपचार सुरू केल्याने, परिणाम देखील जलद मिळतात. व्यक्तीची सांप्रत अवस्था आणि अपेक्षीत अवस्थांमधील अंतर कमी करण्यासाठी खूप कमी वेळ लागू शकतो. स्वमग्नतेच्या उपचारांच्या अनुपस्थितीत, जलद निदान आणि पडताळणीने तीव्रता कमी  होऊन मुलांना योग्य प्रतीकार यंत्रणा तयार करण्यास व स्वतःचे योग्य संगोपन करण्यास मदत होते.

  • वर्तणूक व्यवस्थापन उपचार
    या पद्धतीचा उद्देश योग्य वर्तनाची सक्ती करणे आणि चुकीचे किंवा समाजअमान्य वर्तन कमी करणे हे आहे.  अयोग्य वर्तणूक बदलून योग्य वर्तणूक स्थित करण्यासाठी, महत्वाचे प्रतिसाद प्रशिक्षण आणि सकारात्मक वागणूक व आधार यांचा समावेश असलेली, विविध साधने वापरली जातात.
  • संज्ञानात्मक वर्तणूक उपचार
    उपचारांच्या या पद्धतीत,वर्तनाला, विचारांना आणि भावनांना केंद्रित केले जाते आणि व्यक्तीला समस्या ओढावणारी अवस्था व भावना निर्माण करणारेविचार आणि वर्तन ओळखण्यास मदत करते. हे त्यांना जाणीवा ओळखण्यास आणि चिंता विकाराच्या अवस्थांना तोंड देण्यास मदत करते.
  • सामूहिक एकाग्रता उपचार
    हा उपचाराचा एक महत्त्वाचा पैलू आहे कारण तो परस्परसंबंध आणि सुसंवादावर लक्ष केंद्रित करतो. उपचारांची ही पद्धती स्थायी परिणाम करते, ज्यामूळे ही प्रभावशाली आहे. यांत,संवाद संप्रेषण व भाषेचा वापर आणि एकत्रीतपणे केली जाणारी एकाग्रता,यावर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे.लोकांकडे व वस्तूंकडे  बघणे आणि त्यांच्या दरम्यान दृष्टीक्षेप बदलणे, हि संकल्पना उपयोगात आणण्याचा येथे समावेश होतो.
  • कार्यक्रियाउपचार
    कार्यक्रिया उपचार,मुलांच्या क्षमतांवर व गरजांवर काम करून,नियमित कार्ये व रोजची दिनचर्या पूर्ण करण्याच्या आवश्यकतेवर लक्ष केंद्रित करते. मुलांचे स्वतंत्रपणे कपडे बदलणे व जेवण करणे, स्वतःची काळजी घेणे व संवाद साधणे, आणि इतर शारिरीक क्रिया करायच्या बाबींवर चिकीत्सक काम करतात.
  • शारीरिक उपचार
    स्वमग्नता वर्णक्रमाच्या पीडितांना शारीरिक हालचाली न करता येणें ही एक व्यापक समस्या असल्यामुळे बहुतेकांवर शारीरिक उपचार केले जातात. ही पद्धती सामर्थ्य वाढविण्यासाठी आणि शारीरिक ठेवण सुधारण्यासाठी व शारीरिक हालचालींच्या कौशल्यांमध्ये वाढ करण्यात मदत करते. तथापि, हे उपचार शारीरिक हालचालींमध्ये लक्षणीय सुधारणा करतात हे सिद्ध करणारे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत.
  • सामाजिक कौशल्य प्रशिक्षण
    सामाजिक कौशल्य प्रशिक्षण मुलांच्या वर्तणूक बांधणीवर जोर देते आणि त्यांना अधिक समावेशी परस्परसंवादाचा अनुभव घेण्यास सक्षम करते. ते अपेक्षीत वर्तणूक नमुन्यांवर भर देते आणि त्यांत बळकटीआणते. काही कौशल्यांमध्ये संवाद सुरू करणे, छेडछाड हाताळणे आणि क्रीडापटूंचे सर्वोत्तम गुण दर्शविणे यांचा समावेश होतो.
  • वाचा-भाषा उपचार
    हे उपचार सर्वसाधारण संभाषण अनुभवण्यास सक्षम करण्यासाठी,शाब्दीक आणि शब्दरहीत संवाद दोन्हीवर लक्ष केंद्रित करते. व्यक्तींना त्यांच्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करणे, वस्तूंना नावे देणे, अर्थपूर्ण वाक्ये तयार करणे आणि व्यवस्थीत उच्चारण करणे हे सर्व करावयास लावणे हे उद्देश आहेत. यातदृष्टीक्षेप संपर्कआणि हावभाव वाढवणे,संदेशांद्वारे संवाद साधण्यासाठी चिन्हांची भाषा वापरणे देखील समाविष्ट आहे.
  • पोषण उपचार
    स्वमग्नता असलेल्या व्यक्तिंना निरनिराळ्या पद्धतीचे पौष्टिकतेचे सल्ले दिले जातात. त्यांच्यापैकी काहींना खरोखरच त्यांचे समर्थन करणारे वैज्ञानिक पुरावे आहेत. स्वमग्नता असलेल्या लोकांना निरोगी आणि संतुलित आहार आणि पुरेसे पोषण मिळते आहे याची खात्री करणे हे या उपचाराचे प्रयोजन आहे. स्वमग्नता असणारे लोक विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा (उदाहरणार्थ नरम आणि तरल पदार्थ) तिटकारा करतात. बर्याचदा, स्वमग्नता असलेले लोक आहाराशी मानसीक नाते जोडतात, ज्याने त्यांना मळमळ किंवा वेदनाहोतात. काही अभ्यासातून असे सूचित केले गेले आहे की स्वमग्नता असलेल्या लोकांची हाडे बारीक असतात. पोषणविषयक कमतरता नाहीत याची तजवीज केल्याने या समस्याहाताळता येतात.
  • स्वमग्नतेमधीलऔषधे
    सांगायचे झाल्यास स्वमग्नतेसाठी कोणतीही मान्यताप्रप्त औषधं नाहीत. काही बाबतीत, तज्ञ,स्वमग्नता असलेल्या विशिष्ट व्यक्तींमध्येकाहीअवस्थांचीलक्षणे दिसत असल्यास औषधे लिहून देऊ शकतात. नैराश्यरोधक, क्षोभरोधक, चिंता विकाररोधक आणि अतीचंचलतेसाठी उत्तेजक हे औषधांचे काही प्रकार आहेत ज्यांचा कदाचित सल्ला दिला जाऊ शकतो.
  • इतर अनेक उपचार एकत्रित केलेगेले आहेत आणि त्या त्या वेळच्या गरजांनुसार बदलले आहेत. अभ्यासातील कमतरता भरून काढण्यासाठी शाळा आधारित उपचार, पालकांच्या माध्यमांतूनचे उपचार आणि सामुहीकएकाग्रतेचे उपचारहे त्यापैकी काही आहेत. तथापि, प्राथमिक कौशल्यांचेसंच आणि वर्तनात्मक समस्या हाताळणे समान असते.

स्वमग्नतेसाठी जीवनशैली व्यवस्थापन

प्रारंभिक वर्षांमध्ये स्वमग्नतेशी सामना करणे हे वैयक्तिक आणि कुटुंबासाठी परिश्रम आणणारे असू शकते. अवस्थेचे नावीन्य व त्याचे परिणाम, अनुभवाचे स्वरूप व आव्हाने आणि आवश्यक प्रकारचे सहाय्य यामुळे ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारेपरिणामकारक होऊ शकते. तथापि, सुरूवातीच्या चरणांवर योग्य प्रकारची आणि मोलाची सेवा, वेळेत व त्वरित देणे,कळीचे आहे.

स्वमग्नतेच्या व्यवस्थापनांमध्येखालीलप्रमाणे 2 प्रमुख प्रकारची नियोजने आहेत:

  • शैक्षणिक व्यवस्थापन
    स्वमग्नता वर्णमालेच्या सीमारेखेवर किंवा वर्णमालेत खूप खालीअसलेल्या लोकांमध्ये, मुख्यप्रवाहातीलचे शिक्षण एक संभाव्य पर्याय असू शकतो.शिकण्याची,सामाजिक संवाद व इतरांचे अनुकरण,अशी साधने वापरून मुलांना शिकण्याचे इतर पर्याय उपलब्ध झाल्याने मोठ्या संधी मिळण्यात मदत होते. तथापि, गंभीरस्वमग्नता असलेल्या लोकांमध्ये, अशा मुलांचा हाताळण्यासाठी सुसज्ज असलेल्या विशिष्ट शाळेची निवड करणे महत्वाचे आहे आणि त्यांना तुलनेने स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण क्षमतासाध्य करून देण्यासाठी आवश्यक आहे. स्वमग्नता असलेल्या मुलांमध्ये वैयक्तिकरित्या कार्य करण्याने त्यांच्या संकल्पनांवर काम करता येते. त्यांच्या क्षमता बळकट करण्यासाठी त्यांना सक्षम करता येते. ते स्वतः संधी शोधूनकदाचित आपल्या भविष्याचा मार्ग मोकळा करू शकतात. 
  • वर्तणूक व्यवस्थापन
    स्वमग्नता असलेली मुले अंदाजांवर जगतात. म्हणून त्यांच्याबाबतीत संरचित शिक्षण पद्धती आंमलात आणली जाते. ही शिक्षणपद्धती वैयक्तिक कौशल्ये आणि पर्यावरण यांची एकाच वेळी बांधणी करण्यावर कार्य करते. या पद्धतीने व्यक्तीस कामांचेनियोजन करणे, व्यवस्था करणे आणि कामे अनुक्रमित करणे यांत मदत होते.वैयक्तिक स्तरावर आवश्यक असलेल्या बदलांसाठीची तयारी करणे, नियोजन वेळापत्रके तयार करणे आणि धोरणांचा विकास करणे ही वर्तणूक व्यवस्थापनातील काही प्राथमिक उद्दिष्टे आहेत.
  • स्वमग्नता असलेल्या व्यक्तीचे जीवनशैली व्यवस्थापन करणे ही आजीवन प्रक्रिया आहे. सुरुवातीपासून, वेळेवर हस्तक्षेप झाल्यास प्रौढ वयात ते स्वतंत्र जीवन जगण्यास सक्षम असतील. सकारात्मक आणि आधारभूत वातावरण प्रदान केल्यास त्यांना अधिक समाधानकारक जीवन जगण्यास मदत होईल.

Dr. Sumit Kumar.

Psychiatry
9 Years of Experience

Dr. Kirti Anurag

Psychiatry
8 Years of Experience

Dr. Anubhav Bhushan Dua

Psychiatry
13 Years of Experience

Dr. Sumit Shakya

Psychiatry
7 Years of Experience

Medicines listed below are available for Autism. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Kairali Manasamitram Gulika100 Gulika in 1 Box1380.0
Aadvik Camel Milk Powder I Freeze Dried, Chocolate Flavor, Pack of 30g x 5 Sachets, 150g150 gm Powder in 1 Box576.0
Read more...
Read on app