अँन्टिथ्रोम्बिनची कमतरता काय आहे?

अँन्टिथ्रोम्बिन हे एक प्रकारचे प्रथिने (प्रोटिन) आहे जे रक्तामध्ये आढळते. मुख्यत्वे, ते एक माइल्ड रक्त पातळ करणारे प्रोटिन म्हणून कार्य करते आणि रक्ताच्या अतिरिक्त गुठळ्या होण्यापासून प्रतिबंधित करते. कार्यात्मकरित्या, ते थ्रोम्बीन जे की रक्तात गुठळ्या तयार करते, या प्रोटीनच्या विरूद्ध कार्य करते.

अँन्टिथ्रोम्बिन प्रोटीनची कमतरता असणाऱ्या व्यक्तीच्या शिरांमध्ये (व्हेन्स थ्रोम्बोसिस) गुठळी होण्याची जोखीम असते.

अँन्टिथ्रोम्बिनची कमतरता अनुवांशिक असू शकते किंवा ही शरीरात निर्माण होऊ शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ज्या लोकांमध्ये अँन्टिथ्रोम्बिनची कमतरता असते त्यांना शिरांच्या मध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो. याला व्हीनस थ्रोम्बोसिस म्हणून ही ओळखले जाते. अशा व्यक्तींमध्ये, थ्रोम्बोसिसचा पहिला टप्पा किंवा रक्ताच्या गुठळ्या तयार होणे वयाच्या 40 वर्षाच्या आत होण्याची शक्यता असते, ज्या दरम्यान रक्ताचा थर त्यांच्या शिरांच्या आतल्या भिंतीशी चिकटून राहतो. सामान्यपणे, व्हिनस थ्रोम्बोसिस खालच्या अवयवात होतो. म्हणूनच, प्रभावित पायात खालील लक्षणे पाहिली जाऊ शकतात:

जर पायातील गुठळ्या तिथून मोकळ्या झाल्या आणि त्या फुफ्फुसाकडे गेल्या तर सामान्यतः संबंधित लक्षणे खालीलप्रमाणे आहेत

अँन्टिथ्रोम्बिनची कमतरता होण्याची मुख्य कारणं काय आहेत?

अँन्टिथ्रोम्बिनची कमतरता उपार्जित झाल्यास त्याची खालील कारणे असू शकतात:

अँन्टिथ्रोम्बिनची कमतरता अनुवांशिक देखील असू शकते. पुरुष आणि महिला दोघांना ही कमतरता होण्याचा धोका समान असतो. असामान्य जीनच्या अस्तित्वामुळे रक्तात अँन्टिथ्रोम्बिन प्रथिनांचे प्रमाण कमी होऊ शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

या अवस्थेचे निदान करण्यासाठी रुग्णाच्या शारीरिक लक्षणांचे परीक्षण केले जाते आणि इतर आरोग्यविषयक स्थितीची शक्यता निश्चित केली जाते. यानंतर, डॉक्टर रक्त तपासणी करण्याची शिफारस करतात, जे रक्तातील अँन्टिथ्रोम्बिनचे स्तर निश्चित करण्यात मदत करते. पण, इतर काही घटकदेखील अँन्टिथ्रोम्बिन पातळी कमी करण्यास जबाबदार असतात. म्हणून, मूळ कारणांची पुष्टी करण्यासाठी आणि अँन्टिथ्रोम्बिनची अनुवांशिक कमतरता हे कारण नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी वारंवार तपासण्यांची गरज भासू शकते.

अँन्टिथ्रोम्बिनची कमतरता प्रामुख्याने रक्त पातळ करणाऱ्या औषधे देऊन दूर केली जाते. याला अँटी-कॉग्युलंट्स देखील म्हणतात. पण, याचे डोज आणि वारंवारता व्यक्तिनुसार भिन्न असेल आणि कठोरपणे नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

Dr. Srikanth M

Hematology
25 Years of Experience

Dr. Kartik Purohit

Hematology
13 Years of Experience

Find Hematologist in cities

  1. Hematologist in Surat
Read more...
Read on app