किडनी खराब होणे म्हणजे काय?
किडनीचे प्राथमिक कार्य म्हणजे रक्तातील टाकाऊ द्रव्य काढून टाकणे; जेणेकरून ते मूत्रमार्गे शरीराबाहेर फेकले जाऊ शकते. जेव्हा किडनी योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते आणि मूत्राचे निर्माण अत्यल्प किंवा पूर्णपणे बंद होते तेव्हा त्याला किडनी (मूत्रपिंड) खराब होणे असे म्हटले जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
किडनी खराब होण्याची सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- शरीरातील मूत्र उत्पादन कमी आणि द्रव प्रतिधारण कमी होणे. यामुळे हात, पाय किंवा अगदी तोंडावर सुद्धा सूज येते.
- श्वसनाचा त्रास, मळमळ आणि उलट्या देखील सामान्य आहेत.
- एखाद्या व्यक्तीची भूक कमी होणे, मानसिक गोंधळ आणि अशक्तपणा सारखी इतर काही लक्षणे दिसू शकतात.
- पिडीत व्यक्ती उच्च रक्तदाब, हाताची संवेदना कमी होणे आणि जखम बरी व्हायला वेळ लागणे अशी लक्षणे देखील अनुभवू शकतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
खालील मुख्य कारणांमुळे हा त्रास होतो:
- किडनीला कमी रक्तपुरवठा होत असल्यास त्याने किडनीचे नुकसान होते आणि किडनी खराब होऊ शकते.
- मूत्रवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यास किडनीकडून मुत्राशयाकडे मूत्र सहजतेने प्रवाहित होऊ शकत नाही. कालांतराने, मूत्र एका किंवा दोन्ही किडनीमध्ये गोळा होते ज्यामुळे किडनीला सूज येते (हायड्रोनेफ्रोसिस). यामुळे किडनी खराब होऊ शकते.
- केमिकल्स किंवा जड धातू मुळे झालेली इजा किंवा ग्लोमेरुलोनेफ्रायटिस ज्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणाच किडनीच्या ऊतींवर हल्ला करते यामुळे किडनी खराब होऊ शकते.
- किडनी खराब होण्याची जोखीम वाढविणारे काही घटक पुढील प्रमाणे आहेत:
- आत्यंतिक निर्जलीकरण.
- कमी रक्तदाब.
- ॲस्पिरिन सारखी औषधे.
- मधुमेह
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
किडनी खराब होण्याचे निदान करण्यासाठी खालील तपासण्या केल्या जातात:
- डॉक्टर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर सूज आणि इतर लक्षणे तपासतात.
- युरिया, पोटॅशियम आणि सोडियमच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी रक्त आणि मूत्र तपासणी केली जाते. क्रिएटिनची पातळी माहिती करुन घेणे देखील महत्त्वाचे आहे.
- जर तुमच्यात किडनी खराब होण्याची लक्षणं आढळली, तर तुमचे डॉक्टर ग्लोम्युलर फिल्टरिंग रेट (GFR) तपासणीचा सल्ला देतात. ही ती गती आहे आहे ज्याने किडनीतून रक्त फिल्टर होते. किडनी खराब झाल्यास ती खूप कमी होते.
- इतर चाचण्यांमध्ये किडनीचे अल्ट्रासाऊंड, एमआरआय, सीटी स्कॅन आणि पोटाचा एक्स-रे घेतला जातो.
किडनी खराब होण्यावरील उपचारः
- किडनी वरील उपचार मूळ कारणांवर उपचार करणे आणि किडनीचे एकूण आरोग्य सुधारणे यावर लक्ष केंद्रित करतात.
- आहारात बदल करून मुख्यतः, द्रव, मीठ आणि प्रोटिन्स चे सेवन कमी करण्याची डॉक्टर शिफारस करतात.
- रोगप्रतिकारक औषधे शरीरातील द्रव प्रतिधारण टाळतात. कॅल्शियम सप्लिमेंट्स रक्तातील पोटॅशियमची पातळी राखण्यात मदत करतात.
- डायलिसिस ही एक प्रक्रिया आहे जिथे मशीनद्वारे रक्त फिल्टर केले जाते. विकाराच्या तीव्रतेनुसार, आठवड्यातून अनेक वेळा डायलिसिसची आवश्यकता भासू शकते.