ॲकलेसिया काय आहे?

ॲकलेसिया एक दुर्मिळ पण गंभीर विकार आहे जो अन्ननलिकेला (इसोफेगस) प्रभावित करतो. हा दोन्ही लिंगाना समान प्रमाणात प्रभावित करतो, आणि कोणत्याही वयात  होत असला तरी, 30-70 वर्षे वयोगटात हा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. सामान्यतः ॲकलेसिया विकसित होण्यासाठी अनेक वर्ष लागतात.

अन्न पोटाच्या दिशेने ढकलले जाण्यासाठी इसोफेगल स्नायू आलटून पालटून आकुंचन आणि प्रसरण (पॅरिस्टॅलिसिस म्हणून ओळखले जाते) पावत असतात. अन्ननलिकेचा खालचा भाग अंगठीप्रमाणे आकार असलेल्या स्नायूंच्या वाल्व्हने (लोअर एसोफगेयल स्पिन्चिटर) जोडलेला असतो, ज्याच्या प्रसारणामुळे अन्न पोटात जाते. ॲकलेसियामध्ये, या दोन्ही प्रक्रियाना समस्याग्रस्त होतात. अन्ननलिकेचे स्नायूंचे योग्यरीत्या आकुंचन आणि प्रसरण होत नाही आणि अंगठीसारखा स्नायूंचा वाल्व्हचे प्रसरण अपूर्णतेने होते किंवा होताच नाही, यामुळे अन्ननलिकेच्या खालच्या भागात अन्न अडकते आणि ज्यामुळे अस्वस्थ वाटणे आणि कसेसे होणे ही लक्षणे जाणवतात.

मुख्य चिन्हे आणि लक्षणे कोणती आहेत?

ॲकलेसिया असलेल्या लोकांना अन्न आणि द्रवपदार्थ (डिस्फेगिया) गिळण्यात त्रास होतो. उपचार न केल्यास, कालांतराने, स्थिती खराब होते आणि गिळणे अशक्य होऊ शकते. तसेच, उपचार न केल्यास कदाचित अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका असतो. म्हणून, ॲकलेसियाचे लक्षण दिसताच उपचार करणे आवश्यक आहे.

इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहे:

  • छातीत जळजळ.
  • गिळलेले अन्न अडकणे.
  • खोकल्याची उबळ.
  • अन्न खाल्ल्यानंतर वेदना किंवा अस्वस्थता.
  • अन्न गिळल्यानंतर उलटी होणे.
  • हळूहळू पण लक्षणीय वजन कमी होणे.

ॲकलेसियाची लक्षणे गॅस्ट्रोसेफेजल अन्न उलट्या दिशेने येणारा रोग (ज्यामध्ये पोटाची सामग्री अन्ननलिकेमध्ये परत येते), इसोफेगल छिद्र (अन्ननलिका फुटणे) आणि इसोफेगल कर्करोगासारखी असतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

इसोफेगल नसांना क्षती आणि त्यांच्या कार्यशक्ती कमी झाल्याने ॲकलेसिया होतो. शिवाय, स्नायूचा  व्हॉल्व आणि अन्ननलिका योग्यरित्या काम करत नाही.

ॲकलेसिया व्हायरल संक्रमणाशी, ऑटोइम्यून विकाय, आणि आनुवांशिकतेशी देखील लिंक्ड आहे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

ॲकलेसियाचा निदान सहसा याप्रकारे केला जातो:

  • बेरियम स्वॉल 
    एका साध्या पद्धतीत अन्ननलिकेतून बेरियम सल्फेट प्रवाहित केले जाते आणि एक्स रे घेतले जातात. हे इसोफेगलला  संरचनात्मकदृष्ट्या पाहण्यासाठी आणि पोटात अन्न पोहचण्यास किती वेळ लागतो हे जाणून घेण्यासाठी केले जाते.
     
  • इसोफेगल मॅनोमेट्री 
    या प्रक्रियेस 45 मिनिटे लागतात आणि  स्नायू व्हॉल्वच्या कार्यासह इसोफेगल स्नायूंची शक्ती आणि गतिशीलता तपासण्यासाठी ही केली जाते.
     
  • एंडोस्कोपी
    एक पातळ नलिका थेट घश्यातुन खाली अन्ननलिकेच्या आतून त्याच्या शेवटी स्नायूंच्या कड्यातुन आणि पोटापर्यंत चित्रित करण्यासाठी थेट टाकली जाते.

ॲकलेसियाचा बरा होऊ शकत नाही, परंतु उपचाराने लक्षणे दूर करण्यात मदत होते.

  • वैद्यकीय खबरदारी
    • नायट्रेट्स आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स इसोफेगल स्पिन्चटरवरील दबाव कमी करण्यात मदत करतात, जे गिळणे सुलभ करते.
    • एंडोस्कोपद्वारे स्नायूंच्या कड्यातून बोट्युलिनम विष (बोटॉक्स)चे  इंजेक्शन दिल्यास याला आराम मिळण्यास  मदत होते. पण, प्रभाव दीर्घ काळ टिकत नाही आणि बहुतेक लोकांना वारंवार बोटॉक्स शॉट्सची आवश्यकता भासते.
    • ऍनेस्थेसिया देऊन, अन्ननलिकेद्वारे एक फुगा सोडला जातो आणि नंतर अन्ननलिकेच्या खालच्या भागात व्हॉल्व्ह ओलांडण्यासाठी तो फुगवला जातो. याला बलून डायलेशन म्हटले जाते.
  • सर्जिकल केअर 
    सामान्य ऍनेस्थेसिया देऊन, लोअर इसोफेगल स्पिन्चटरचे तंतू कापले जातात. हे लॅपरोस्कोप वापरून केले जाते. ही पद्धत सुधारणेसाठी लागणारा कमी वेळ आणि रुग्णालयातील कमी वास्तव्य सुनिश्चित करते.

Medicines listed below are available for ॲकलेसिया. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Arya Vaidya Sala Kottakkal Kutajarishtam450 ml Arishta in 1 Bottle90.0
Read more...
Read on app