जुलाब - Diarrhoea (Loose Motions) in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

January 27, 2019

April 27, 2023

जुलाब
जुलाब

सारांश

अतिसार सामान्यत: गळती किंवा पाण्यासारखे मल हे म्हणून ओळखले जाते, हा पचनतंत्राचा विकार आहे. एखाद्या व्यक्तीला दिवसातून तीन किंवा जास्त (किंवा नेहमीपेक्षा जास्त) द्रव किंवा पाण्यासारखे मल झाल्यास अतिसार असल्याचे म्हटले जाते. दरवर्षी जगभरात बालपणातील अतिसाराची सुमारे 1.7 अब्ज प्रकरणे आहेत. त्यामुळे, 5 वर्षांच्या वयाखालील मुलांमध्ये बालपणातील अतिसार कुपोषणाचे मुख्य कारण आहे. भारतात, अतिसार हा दरवर्षी 300,000 लोकांचा मृत्यू (त्याच वयोगटाच्या मुलांमध्ये एकूण मृत्यूपैकी 13%) असणा-या मुलांमध्ये मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. तीव्र अतिसार सामान्यपणे विषाणू, जिवाणू आणि परजीवीमुळे होतो. अतिसारामुळे संक्रमण झालेले पाणी दूषित पाणी आणि अयोग्य हाताळणीद्वारे पसरते. अशाप्रकारे, खराब वैयक्तिक आणि पर्यावरणीय स्वच्छता संक्रमणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अतिसाराच्या गंभीर प्रकरणात शरिरातील पाणी जलद गतीने कमी होऊ शकते आणि इलेक्ट्रोलाइट्समुळे निर्जलीकरण होऊ शकते. म्हणून, वेळेवर उपचार न केल्यास गंभीर अतिसारापासून जीवही धोक्यात येऊ शकते.   अतिसारामुळे एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांमध्ये, वाचण्याची शक्यता खूप कमी असते आणि  एचआयव्ही-नकारात्मक मुलांपेक्षा सुमारे 11 पट जास्त आहे. लस थेरपी (रोटाव्हायरस लसीकरण), स्तनपान,  आणि स्वच्छता यासारख्या उपचारांमुळे बालपणाच्या अतिसाराची घट कमी होते.

जुलाब (अतिसार) काय आहे - What is Diarrhea in Marathi

अतिसार एक लक्षण आहे जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संक्रमण दर्शवते. हे जीवाणू, विषाणू तसेच परजीवीमुळे होऊ शकते. तथापि, इतर आरोग्यविषयक परिस्थितीमुळेही जुलाब होऊ शकतात. पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दरवर्षी 500,000 पेक्षा अधिक मृत्यूसाठी अतिसार रोग जबाबदार आहेत, यामुळे जगभरातील मुलांमध्ये ते मृत्यूचे दुसरे मुख्य कारण ठरते. दिवसाकाठी मुलांमध्ये 2000 हून अधिक मृत्यूंसाठी अतिसार जबाबदार आहे, जे बालपणातील मलेरियामिझेल्स, आणि एड्स एकत्र करून त्यापेक्षाही अधिक आहे. तीव्र अतिसार बरेच दिवस काही आठवड्यात टिकू शकतात. यामुळे गंभीर द्रवपदार्थ हानी आणि निर्जलीकरण होऊ शकते, ज्याचा वेळेमध्ये उपचार केला जात नाही तो घातक देखील असू शकतो.

अतिसार काय आहे?

अतिसार एक अंतर्निहित गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकाराचे लक्षण आहे. दिवसात तीन किंवा अधिक जुलाब होत असल्याचे यात दिसून येते. काही लोकांना दिवसातून वारंवार शौच  होतो. याचा अर्थ असा नाही की त्यांना अतिसार आहे.

जुलाब (अतिसार) ची लक्षणे - Symptoms of Diarrhea in Marathi

अतिसार स्वतःतच एक अंतर्निहित गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकाराचे लक्षण आहे. तथाती, त्यात लक्षणे देखील असू शकतात जसे की:

इतर गंभीर लक्षणे सैल शौचेशी संबंधित असू शकतात. यात समाविष्ट आहेतः

डॉक्टरांना अशा वेळेस नक्की भेटावेः

  • अतिसार दोन दिवसांपेक्षा अधिक टिकणें
  • निर्जलीकरणाची लक्षणें असणें.
  • उदर किंवा रेक्टममध्ये तीव्र वेदना.
  • शौच काळे किंवा कडक असणें.
  • 102°F पेक्षा अधिक ताप.

लहान मुलांमध्ये, जुलाबाद्वारे वेगाने निर्जलीकरण होऊ शकते. म्हणून, जर 24 तासांच्या आत लक्षणे सुधारत नसतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणेंच चांगले राहील.

जुलाब (अतिसार) चा उपचार - Treatment of Diarrhea in Marathi

वेगवेगळ्या प्रकारच्या अतिसारासाठी उपचार पद्धती खालीलप्रमाणे आहेत:

  • तीव्र अतिसार 
    तीव्र अतिसारवर सहज मिळणारी  औषधे दिली जाऊ शकतात.तथापी,  रक्तस्त्राव  किंवा अतिसाराने ताप असल्यास, अशी औषधे देऊ नयेत. जर अतिसार दोन दिवस टिकत असेल तर डॉक्टरांना भेटणेच चांगले आहे.
  • मुलांमधील तीव्र अतिसार 
    सहज मिळणार्र्या औषधांनी बालपणातील अतिसारासाठी हानिकारक परिणाम होऊ शकतात, विशेषत: नवजात आणि शिशूंमध्ये. औषध देण्यापूर्वी डॉक्टर किंवा शिशुरोगतज्ञांचा सल्ला घ्या. लक्षणे 24 तासांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास, डॉक्टरकडे जा.  
  • तीव्र आणि स्थायी अतिसार 
    तीव्र आणि स्थायी अतिसाराचा उपचार कारणावर अवलंबून असतो. परजीवी आणि जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे किंवा रोखणारी अनेक प्रतिजैविअक निर्धारित केली जातात. क्रोहन्स रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि इरिटेवल बॉव्हेल सिंड्रोममुळे होणार्या अतिसारांसाठी विशिष्ट औषधे देखील निर्धारित केली जातात.

जीवनशैली व्यवस्थापन

काही जीवनशैलीतील बदल त्वरित अतिसार लक्षणांचे निराकरण करू शकतात आणि भविष्यात टाळतात. यात समाविष्ट आहेः

  • संक्रमणाची शक्यता कमी करणे:
    • शौचेनंतर साबणाने हात धुवा.
    • स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर हात धुणे आणि डायपर बदलल्यानंतर हात धुणे.
    • उकडलेले किंवा बाटलीबंद पाणी पिणे.
    • गरम पेय पिणे
    • नवजात शिशु आणि मुलांना वयोमर्यादेप्रमाणें आहार देणे.
    • 6 महिने पर्यंत केवळ स्तनपान.
    • खाद्य पदार्थांची योग्य साठवण आणि  हाताळणी.
  • टाळणे:
    • नळाचा पाणी पिणें.
    • पेय, रस आणि बरफ तयार करण्यासाठी नळाच्या पाणी वापरणे.
    • पॅश्चराइझ न केलेले दूध पिणे
    • रस्त्याच्या कडेला खाणे
    • कच्चे आणि न शिजवलेले अन्न आणि मांस खाणे.
    • मद्यपान
    • मसालेदार पदार्थ
    • सफरचंद आणि नाशपातीसारखी फळे.
    • कॅफिनयुक्त पेय
    • दुग्धजन्य पदार्थ
    • डाईट कोला पेय, कृत्रिम गोडी असलेले पेये, कॅंडीज आणि गम.
  • निर्जलीकरण रोखण्यासाठी:
    • ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस ) 
      ओआरएस सोल्यूशन हे पाणी आणि इलेक्ट्रोलाइटचे मिश्रण आहे जे एखाद्या व्यक्तीला अतिसारमुळे द्रव कमी झाल्यावर दिले जाते. कारण काहीही असो , अतिसारसाठी हा सर्वोत्तम उपचार आहे.रेडीमेड ओआरएस सॅशे औषधांच्या दुकानांत मिळतात, परंतु जर ते उपलब्ध नसतील तर 1 लिटर पाण्याचे योग्य पाणी (उकडलेले आणि थंड केलेले) मध्ये 6 चमचे साखर आणि 1/2 चमचे मीठ मिसळून एक ओआरएस द्रावण तयार केले जाऊ शकते. 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रत्येक जुलाबानंतर किमान 1/4 ते 1/2 कप ओआरएस प्यावे.   2 वर्षापेक्षा मोठी मुले प्रत्येक शौचेनंतर ओआरएसच्या अर्ध्या ते पूर्ण कप घेऊ शकतात.
    • पूरक 
      व्हिटॅमिन ए6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील एचआयव्ही संक्रमित मुलांमध्ये अतिसारात शिफारस केली जाते. अतिसार टाळण्यासाठी काही वेळा विटामिन ए, झिंक आणि इतर जीवनसत्त्वे एकत्रित केले जातात.
    • रोटाव्हायरस लसीकरण 
      अतिसार रोग रोखण्यासाठी तोंडावाटे रोटावायरस लस मुलांना एकाधिक डोसमध्ये दिले जाते. या लसींनी मुलांमध्ये रोटाव्हायरस संसर्ग झाल्यामुळे हॉस्पिटलायझेशनच्या घटना कमी केल्या आहेत.


संदर्भ

  1. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Diarrhoeal disease.
  2. Lakshminarayanan S & Jayalakshmy R. Diarrheal diseases among children in India: Current scenario and future perspectives. Journal of Natural Science, Biology, and Medicine. 2015 Jan;6(1):24. PMID: 25810630
  3. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Global Diarrhea Burden
  4. Liu L, Johnson HL, Cousens S, Perin J, Scott S, Lawn JE, Rudan I, Campbell H, Cibulskis R, Li M, & Mathers C. Global, regional, and national causes of child mortality: an updated systematic analysis for 2010 with time trends since 2000. The Lancet. 2012 Jun 9;379(9832):2151-61. PMID: 22579125
  5. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Diarrhea.
  6. The Mother and Child Health and Education Trust [Internet] Rehydration project; Oral Rehydration Solutions: Made at Home

जुलाब साठी औषधे

Medicines listed below are available for जुलाब. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for जुलाब

Number of tests are available for जुलाब. We have listed commonly prescribed tests below: