घरघर होणे (व्हिझिंग) - Wheezing in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

May 02, 2019

July 31, 2020

घरघर होणे
घरघर होणे

घरघर होणे (व्हिझिंग) म्हणजे काय?

श्वास घेताना फुफ्फुसांमधून येणाऱ्या शिट्टी सारख्या आवाजला घरघरणे किंवा व्हिझिंग असे म्हणतात. पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये श्वसनमार्गातील तीव्र संसर्ग किंवा इतर गैर-संक्रामक कारणांमुळे ही एक सामान्य समस्या होते. हे दम्या चे लक्षण असू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

घरघर होणे स्वतःच एक लक्षण आहे. शिवाय खालील नैदानिक ​​चिन्हे आणि लक्षणे यासह हे आढळू शकतात:

  • ब्रॉंकोस्पाझम - फुफ्फुसातील प्रतिबंधित वायुमार्ग.
  • श्वास घेण्यात अडचण.
  • श्वास घेताना शिट्टी सारखा आवाज होणे.
  • छातीत घट्टपणा होणे.
  • रात्री खोकला येणे.
  • हृदयाचे ठोके वाढणे.
  • वेगाने श्वास घेणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

व्हिझिंग खालील कारणांमुळे होऊ शकते:

  • ब्रॉन्कायोलायटीस - फुफ्फुसातील लहान वातनलिकांना सूज येणे ज्याला असे ब्रॉन्कियोल्स म्हणतात.
  • असंक्रामक कारणांमध्ये स्ट्रक्चरल किंवा कार्यात्मक श्वसनमार्गाच्या असामान्यतांचा समावेश आहे.
  • श्वसनमार्गात व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्ग.
  • दमा/ अस्थमा.
  • ॲलर्जी.
  • गॅस्ट्रो-एसोफेगल रिफ्लक्स डिझीज (जीईआरडी).
  • बाह्य कण.
  • इम्यूनोडेफिशियन्सी रोग.
  • ट्यूमर किंवा मॅलिग्ननसीज(कर्करोग).
  • वातावरणातील बदल.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

व्हिझिंगच्या निदानासाठी खालील पद्धती वापरल्या जातात:

  • शारीरिक तपासणी.
  • ब्रोंकोस्कोपी.
  • वायुप्रवाहातील अडथळाचे परीक्षण.
  • पल्स ऑक्सिमेटरी रीडिंग्स.
  • छातीचा एक्स रे.
  • हाय रिझोल्यूशनमध्ये गणना केलेले टोमोग्राफी (सीटी स्कॅन).
  • मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय).
  • घामाची  तपासणी.
  • बॅक्टेरियोलॉजिकल स्पुटम स्टडीज.
  • व्हायरल आणि मायकोप्लाझमा अँटीबॉडी पातळी.
  • इम्यून फंक्शनची तपासणी.

व्हिझिंगचा उपचार अंतर्निहित कारक घटकांवर अवलंबून असतो. सुरुवातीला एरोसोलच्या स्वरूपात बीटा 2 ॲगोनिस्ट्स व्यवस्थापित करणे उचित असते. तीव्र ब्रोन्कायोलिसिस असलेल्या शिशुंमध्ये, ज्यांना श्वसनविकार सिंड्रोम आहे, त्यांना ऑक्सिजन थेरपी देतात. सिडेटिव्हसने श्वासोच्छवासा सिंड्रोमचा त्रास वाढू शकतो आणि त्यामुळे ते टाळले पाहिजे. पुनरावृत्ती होणाऱ्या व्हिजिंगचा उपचारात्मक पर्याय पहिल्यांदा होणाऱ्या व्हिजिंगच्या उपचारांपेक्षा वेगळा असतो. पुनरावृत्ती होणाऱ्या व्हिजिंग साठी पॅरेंटेरल किंवा मौखिक कॉर्टिकोस्टिरॉईड्सच्या प्रथम-श्रेणी एजंटचा उपयोग केला जातो. व्हायरसमुळे  श्वसनक्रियात संसर्ग असल्यास अँटीव्हायरल उपचार सुरु केले जातात. व्हिझिंग व्हिटॅमिन डी संबंधित असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचा कमतरतेमुळे व्हिझिंग वाढते आणि पूरक देणे फायदेशीर ठरते.



संदर्भ

  1. E. Kathryn Miller et al. Wheezing exacerbations in early childhood: evaluation, treatment, and recent advances relevant to the genesis of asthma . J Allergy Clin Immunol Pract. 2014 Sep-Oct; 2(5): 537–543. PMID: 25213046
  2. Lisa Noble Weiss. The Diagnosis of Wheezing in Children. Am Fam Physician. 2008 Apr 15;77(8):1109-1114. American Academy of Family Physicians.
  3. Yehia M. El-Gamal, Shereen S. El-Sayed. Wheezing in infancy. World Allergy Organization Journal, 2011, 4:21
  4. Kana Ram Jat, Sushil Kumar Kabra. Wheezing in children with viral infection & its long-term effects. Indian J Med Res. 2017 Feb; 145(2): 161–162. PMID: 28639590
  5. Prithi Sureka Mummidi et al. Viral aetiology of wheezing in children under five. Indian J Med Res. 2017 Feb; 145(2): 189–193. PMID: 28639594
  6. Bener A, Ehlayel MS, Bener HZ, Hamid Q. The impact of Vitamin D deficiency on asthma, allergic rhinitis and wheezing in children: An emerging public health problem. J Fam Community Med [serial online] 2014 [cited 2019 Jun 28];21:154-61.

घरघर होणे (व्हिझिंग) साठी औषधे

Medicines listed below are available for घरघर होणे (व्हिझिंग). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.